Join : Whats App Channel
समुपदेशनाला इंग्रजीत Counselling असेही म्हणतात. प्राचीन काळापासून समुपदेशन मानव समाजात विद्यमान राहिले आहे. समुपदेशन हे व्यक्तिनिष्ठ असते असे समजले जाते.
समुपदेशन ची व्याख्या:
समुपदेशन शब्द दोन व्यक्तीच्या त्या संपर्काच्या सर्व परिस्थितीचा समावेश करतो ज्यामध्ये एका व्यक्तिला त्याच्या स्वत: च्या तशाच पर्यावरणामध्येअपेक्षाकृत प्रभावी समायोजन करण्यास मदत करते. - Robins
समुपदेशन आणि मार्गदर्शन हे दोन्ही वेगवेगळे मतप्रवाह आहेत काही तज्ञांच्या मते मार्गदर्शन आणि समुपदेशन हे वेगवेगळे आहे. मार्गदर्शन ही एक व्यापक संकल्पना असून समुपदेशन हा मार्गदर्शनातील एक भाग आहे. समुपदेशन करण्यासाठी दुसर्याचे मन समजून घेण्याची गरज असते. तसेच त्याच्या विचारांचा आदर करणे ,अनेक वेगवेगळ्या विचारापैकी एका विचाराची निवड करणे आणि त्याचे समाधान करणे आवश्यक असते.
समुपदेशन ही अधिक मानसिक विश्लेषण प्रक्रिया आहे. एखादा व्यक्ती आपला आत्मविश्वास हरवलेला असेल तर त्याला समुपदेशन करून त्याला परत परिस्थिति शी लढायला तयार करता येते. जे व्यक्ती इतर लोकांमध्ये मिसळत नाहीत,अचानक वर्तनात बदल होतो,अबोलपणा,जीवनातील समस्यांना कंटाळून गेलेले अशा व्यक्तींना समुपदेशनाची गरज पडते.
समुपदेशन करण्याची गरज सगळ्याच क्षेत्रात पडते. समुपदेशन प्रक्रियेमुळे समस्या वर उत्तर मिळते. सुसंवाद साधला जातो आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते.
समुपदेशक म्हणजे काय?
समुपदेशन करणार्या व्यक्तीला समुपदेशक असे म्हणतात.समुपदेशक होण्यासाठी मानसशास्र,मार्गदर्शन आणि समुपदेशन पदवी व योग्य ते शिक्षण पूर्ण करावे लागते. समुपदेशन करणे हा व्यवसाय जरी असला तरी हे काम एक जबाबदार व्यक्ती म्हणून पार पाडावे लागते.
कारण एका भरकटलेल्या व्यक्तीला योग्य दिशा देण्याचे काम समुपदेशक करत असतो,त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात बदल होतो,म्हणून समुपदेशक होण्यासाठी काही कौशल्य आत्मसाद करणे आवश्यक आहे.
समुपदेशकाला मानसशास्र विषयाचे संपूर्ण ज्ञान आणि अभ्यास असणे आवश्यक असते. तसेच संवाद साधण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करता आला पाहिजे.
ज्या व्यक्तीला समुपदेशन करणार आहात त्या व्यक्तीची केस हिस्ट्री समजून घेणे आवश्यक असते. तसेच वेगवेगळे आव्हाने गेण्याची क्षमता असावी लागते. समस्या सोडवण्याचे कौशल्य आपल्याकडे असणे आवश्यक असते.
समुपदेशनाची गरज:
समुपदेशनाची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गरज वाढत चालली आहे.कारण प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे.समुपदेशन हे वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारे करण्यात येते.त्या त्या क्षेत्रातील समुपदेशक उपलब्ध आहेत.समुपदेशन हि काळाची गरज असून औद्योगिक,सामाजिक,शैक्षणिक,वैयक्तित,वैवाहिक,नोकरी ,करिअर अशा प्रत्येक क्षेत्रात समुपदेशनाची आवश्यकता असते.
Join : Whats App Channel