हर घर तिरंगा वर 10 ओळी मराठी निबंध.
![]() |
Har Ghar Tiranga |
1. 'हर घर तिरंगा' ही भारतात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त' सुरू करण्यात आलेली मोहीम आहे.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून हा कार्यक्रम संपूर्ण भारतभर राबवण्यात येणार आहे.
2. घरोघरी तिरंगा वाटप करण्यात येणार आहे.तसेच सर्व सरकारी कार्यालये,शाळा महाविद्यालये याठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
3. नागरिकांमध्ये देशभक्ती जागृत करणे, एकोपा वाढीस लावणे,हे त्याचे ध्येय आहे.
4. भारतीय राष्ट्रीय ध्वजाबाबत जनजागृती करणे, हा त्याचा उद्देश आहे.
5. भारतातील सर्व नागरिकांना 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
6. या मोहिमेत लोकांना 13 ते 15 ऑगस्ट 2022 रोजी ध्वजारोहण करण्याची विनंती करण्यात आली आहे.
7. राष्ट्रीय ध्वज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेची घोषणा केली.
8. ही मोहीम आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करेल.
9. माननीय गृहमंत्र्यांनी या कार्यक्रमास मान्यता दिली.
10. सर्वत्र भारतीयांना त्यांच्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी प्रेरित करणे हा यामागचा उद्देश आहे.