स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव।हर घर तिरंगा अभियान मराठी माहिती.
![]() |
"हर घर तिरंगा" मराठी माहिती |
"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" म्हणजेच स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने सरकारतर्फे आयोजित 'हर घर तिरंगा' ही मोहीम राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली लोकसहभागाची मोहीम आहे.
ब्रिटीश सरकारच्या जाचापासून भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा अनेक ब्रिटीश, युरोपियन तज्ञांचा असा विश्वास होता की भारत फार काळ स्वातंत्र्य टिकवून ठेवू शकणार नाही.कारण भारत देश हा खूप मोठा आणि बहुभाषिक राष्ट्र आहे. गेली 75 वर्षे आपण पाहत आहोत की आपल्या भारत देशात वेगवेगळ्या भाषा,वेशभूषा,राहणीमान,जीवन,वेशभूषा,जरी वेगवेगळी असली तरी भारताची लोकशाही खूप मजबूत आहे.
भारत देश हा मजबूत लोकशाहीचे जगातील सर्वात मोठे उदाहरण आहे.भारत देश जरी वेगवेगळ्या जातीपातीमध्ये विभागाला गेला असला तरी ,वेगवेगळ्या धर्माचे लोक,वेगवेगळ्या भाषा बोलणारा समाज हा एकत्र आणि बंधुभावाने राहतो आहे,कारण भारताची लोकशाही खूप मजबूत आहे. कितीही कठीण प्रसंग या देशावर आले तरी त्यांना सामोरे जाण्याची तयारी भारतामध्ये आहे.
जगातील एक महासत्ता असलेला देश म्हणून भारताकडे पहिले जाते.आणि म्हणून या सगळ्यात, स्वातंत्र्याच्या लढ्याचे स्मरण करण्याचा, आपल्या लोकशाहीअभिमान आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांचा, त्याच्या कामगिरीबद्दल स्वतःची प्रशंसा करण्याचा,"हर घर तिरंगा",या निमित्ताने भारत सरकार ने हे कार्यक्रम संपूर्ण भारत देशात ठराविक वेळेत नियोजित पद्धतीने 'आझादी का अमृत महोत्सव' च्या रूपाने संपूर्ण देशभरात साजरा होत आहे.
यावर्षी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशवासियांनी घरोघरी राष्ट्रध्वज "तिरंगा" फडकवण्याची मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेला "हर घर तिरंगा" असे नाव देण्यात आले आहे. लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करणे हा यामागचा उद्देश आहे. हा आदेश नसून एक सार्वजनिक मोहीम आहे, हे येथे समजून घेणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव।हर घर तिरंगा अभियान मराठी माहिती
"हर घर तिरंगा" मोहिमेअंतर्गत पुढील महिन्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त तीनही दिवस (13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट) देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आझादीच्या अमृत महोत्सवांतर्गत देशातील सर्व मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि प्रशासक यांच्यासमवेत या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेतला.
"हर घर तिरंगा" या अभियानांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत लोकसहभागातून सर्व घरांमध्ये तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे. ज्यामध्ये सर्व सरकारी आणि खाजगी आस्थापनांचा समावेश असेल. यासोबतच सर्व नागरिकांना त्यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा दाखवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव।हर घर तिरंगा अभियान मध्ये तुम्ही कसे सामील होऊ शकता?
लोकसहभागातून 20 कोटींहून अधिक घरांवर तिरंगा फडकवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यात सर्वसामान्यांच्या घरांसोबतच सरकारी आणि खासगी आस्थापनांचाही समावेश असेल.तसेच सर्व भारतीयांनी,शाळा,कॉलेज,महाविद्यालये,शासकीय संस्था कार्यालये कर्मचारी,यांना सर्वाना भारताचा तिरंगा हा सोशल मिडीयावर उदा.facebook,Tweeter,इत्यादी. शासनच्या नियमाप्रमाणे शेअर करून जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.सर्व समाजाला "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव","हर घर तिरंगा"अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशभरात ध्वजांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.1 ऑगस्ट 2022 पासून देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री सुरू होईल. तसेच शाळेत सुद्धा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सेल्फी विथ फ्लॅग म्हणजे काय।स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव।हर घर तिरंगा योजनेसाठी वेबसाइट
ध्वजाच्या पुरवठा आणि विक्रीसाठी राज्य सरकारांनी विविध भागधारकांशी करार केले आहेत. भारतीय राष्ट्रध्वजाचीही रत्न पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे.भारत सरकारने ध्वज पुरवठा करण्याची प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी विविध ई-कॉमर्स वेबसाइट आणि स्वयं-मदत गटांशी करार केला आहे.
पोस्ट ऑफिसमधूनही ध्वज खरेदी करता येतील. पोस्ट ऑफिसमध्ये ध्वजाची किंमत २५ रुपये ठेवण्यात आली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने हर घर तिरंगा योजनेसाठी लोकांना अधिक उत्साही आणि जागरूक करण्यासाठी एक वेबसाइट सुरू केली आहे. ज्यामध्ये देशाचा कोणताही नागरिक झेंडा लावू शकतो आणि आपली देशभक्ती दाखवण्यासाठी तिरंगा ध्वजासह सेल्फी काढू शकतो आणि या वेबसाइटवर पोस्ट करू शकतो.
संस्कृती मंत्रालयाने https://harghartiranga.com/ ही वेबसाइट सुरू केली आहे. जिथे कोणीही 'ध्वज पिन' करू शकतो आणि त्यांची देशभक्ती प्रदर्शित करण्यासाठी 'झेंड्यासह सेल्फी' देखील पोस्ट करू शकतो. देशातील नागरिकांना 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या प्रोफाइलवर तिरंगा लावण्याचे आवाहन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव।हर घर तिरंगा योजना अंमलबजावणी
"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव", "हर घर तिरंगा" कार्यक्रमाची अंमलबजावणी व्यवस्थित व सुरळीत पार पडण्यासाठी शासनाने अधिकृत परिपत्रक काढलेले आहे.तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालायामार्फत कार्यक्रमाचे नियोजन परिपत्रक सर्व शासकीय कार्यालये यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहे.
यावेळी दिल्ली सरकार 15ऑगस्टच्या दोन आठवडे आधी स्वातंत्र्याचा उत्सव सुरू करत आहे.सर्व भारतील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या मध्ये सामील होणार आहे. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेची प्रभातफेरी सोबतच मोठ्या उत्सवाची तयारीही केली जाते. दिल्ली सरकार संपूर्ण दिल्लीतील शालेय मुलांच्या मदतीने सुमारे 100 कार्यक्रम आयोजित करणार आहे. दिल्ली शहरातील उड्डाणपूल, रस्ते, अंडरपास आणि सरकारी इमारती रोषणाईने आणि सुशोभित केल्या जातील.
केवळ दिल्ली सरकारच नाही तर विविध राज्य सरकारे यानिमित्ताने विविध कार्यक्रम करणार आहेत. या दिवसाचे सेलिब्रेशन खास बनवण्यासाठी दिल्ली सरकारने बुरारी मैदानावर जगातील सर्वात मोठ्या मानवी ध्वजाचा विक्रम करण्याची तयारी केली आहे. याशिवाय 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकाच्या घरी तिरंगा फडकवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्व गावे,ग्रामपंचायत, मंडळे आणि नगरपालिकांमध्ये झेंडे वितरित केले जातील. राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्ती या विषयावरील चित्रपट सर्व सिनेमागृहांमध्ये शाळकरी मुलांना मोफत दाखवले जातील .
देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाला तिरंगा घरी लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आझादीचा अमृत महोत्सव लोकसहभागाच्या भावनेने साजरा करणे हा या मोहिमेमागील संकल्पना असल्याचे पंतप्रधान म्हणतात.
13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक नागरिक घरोघरी तिरंगा ध्वज फडकवणार आहे. या मोहिमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जुलै रोजी ट्विट केले होते की, यावर्षी देशातील प्रत्येक नागरिक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे, ज्यामध्ये भारतातील प्रत्येक व्यक्ती 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवेल. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागेल.आपण सर्व एक आहोत,भारतीयांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम,देशाविषयी आदर प्रेम वाढीस लागेल,देशाच्या प्रगतीसाठी सहकार्य मिळेल.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव।हर घर तिरंगा अभियानांतर्गत ध्वजारोहण करण्याचा नियम
15 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने 20 कोटी घरांमध्ये लोकसहभागातून तिरंगा ध्वज फडकविण्याचे राष्ट्रीय अभियान "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव","हर घर तिरंगा"अभियान उपक्रम सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने राष्ट्रध्वजाशी संबंधित काही नियम आणले आहेत. जाणून घेऊया त्या नियमांबद्दल .
जर कोणी या नियमानुसार तिरंगा ध्वज फडकावला नाही तर त्यांच्यावरही कडक कारवाई होऊ शकते. यासाठी भारत सरकारने जारी केलेला ध्वज संहिता 2002 तयार करण्यात आला आहे.
राष्ट्रध्वजाचा वापर, फडकावणे आणि प्रदर्शनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे सांगण्यात आलेले आहेत आणि ही मार्गदर्शक तत्त्वे 26 जानेवारी 2002 रोजी लागू झाली. या अभियानांतर्गत प्रत्येक घरोघरी तिरंगा मोहिमेत लोकसहभागाने तिरंगा ध्वज फडकवायचा आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा.
2. कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला सलाम करण्यासाठी देखील ध्वज खाली केला जाऊ नये.
3. ध्वजाचा वापर पोशाख, गणवेश म्हणून केला जाऊ नये किंवा कोणत्याही रुमाल, उशी किंवा इतर कापडावर ध्वज छापला जाऊ नये.
5. ध्वजावर कोणतीही सूचना, जाहिरात, शिलालेख लिहू नये.
6.याशिवाय, ध्वजाचा वापर वाहन, ट्रेन, विमानाचे छत झाकण्यासाठी केला जाणार नाही.
7. त्याच बरोबर इतर कोणताही ध्वज भारतीय ध्वजाच्या समान उंचीवर फडकता कामा नये.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव।हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे।Har Ghar Tiranga Certificate Download
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव।हर घर तिरंगा या मोहिमेत नोंदणी कशी करायची आणि हर घर तिरंगा प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे ते पाहू.
- सर्व प्रथम तुम्हाला harghartiranga.com या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- आता वेबसाइटचे होमपेज तुमच्या समोर ओपन होईल. ज्यामध्ये तुम्हाला Pin a flag वर क्लिक करावे लागेल.
- क्लिक केल्यानंतर, तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल.
- आता NEXT वर क्लिक करावे लागेल किंवा तुम्ही तुमचा जीमेल आयडी देखील सुरू ठेवू शकता.
- NEXT केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल आणि तुमची नोंदणी पूर्ण होईल.
- आता तुमचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.