किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती,क्रेडिट कार्ड कसे काढावे.

किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे?


किसान क्रेडिट कार्ड योजना।Kisan credit card All Information In Marathi
किसान क्रेडिट कार्ड 

किसान क्रेडिट कार्ड (Kisan credit card) योजना संपूर्ण मराठी माहिती आपण खालील प्रमाणे पाहूया.

 

"शेतीची उपकरणे व अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांकडून अधिकच्या व्याज दराने कर्ज घ्यावे लागते.कधी कधी तर असं हे कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना अवघड होऊन बसतं.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज घेणे सुलभ सोपे व्हावे यासाठी भारत सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना  (Kissan credit card) सुरू केले आहे."

 

किसान क्रेडिट कार्ड योजना महाराष्ट्र जर शेतकऱ्यांकडे हे किसान क्रेडिट कार्ड (Kisan credit card) असेल तर शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने कर्ज मिळते.या सुविधेचा फायदा पशुपालक आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो.त्यांनाही या कार्डच्या माध्यमातून चार टक्के इतक्या अल्प दरात कर्ज मिळते. 


🎯किसान क्रेडिट कार्ड योजना चे उद्दिष्टे

  • किसान क्रेडिट कार्ड  योजना पीएम किसान सम्मान निधि योजना यशस्वी झाल्यानंतर ही योजना हाती घेण्यात आलेली आहे. 
  • किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा क्षेत्रफळानुसार एक लाख ते तीन लाखापर्यंत मर्यादित कर्ज किसान क्रेडिट कार्ड मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. 
  • किसान क्रेडिट कार्ड योजना या कार्डवर घेतलेल्या कर्जाचे व्याजदर हे 7% दराने असणार आहेत. परंतु एक वर्षाच्या आत बँकेने दिलेल्या वेळेत भरल्यास 3%  व्याजदर सूट देण्यात येत असते.
  • किसान क्रेडिट कार्ड योजना वर एक लाखाच्या आत कर्ज घेतल्यास त्याला व्याजदर लागत नाहीत.
  • Kisan credit card हे शेतकर्‍यांना अपत्कालीन कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी उपयोगी पडते. 


🎯किसान क्रेडिट कार्ड योजना चे फायदे

  • किसान क्रेडिट कार्ड योजना ची पात्रता .
  • किसान क्रेडिट कार्ड (Kisan credit card) साठी आवश्यक कागदपत्रे.
  • किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे.


किसान क्रेडिट कार्ड  योजना लाभ आणि वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे 

  • किसान क्रेडिट कार्ड योजना वर विनातारण एक लाख 60 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध होते.
  • नियमित कर्ज भरले असतील तर 3 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना चार टक्के व्याज दर असतो.
  • तीन लाखापर्यंतच्या किसान क्रेडिट कार्डवर सर्व प्रक्रिया शुल्क माफ असते.
  • एक पानाचा फॉर्म भरून तुम्ही तुमच्या पी एम किसान निधी योजनेचे पैसे ज्या बँकेत येतात,तिथे जमा करणे आवश्यक असते.
  • 15 दिवसाच्या आत किसान क्रेडिट कार्ड वरती एक लाखाच्या आत रक्कम घेतल्यास व्याज लागत नाही.
  • विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
  • किसान क्रेडिट कार्ड (Kisan credit card) कोणाला मिळते तर,पी एम किसान (P M Kisan) सन्मान निधी योजना लाभार्थी यादी मध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे,तसेच या योजनेचा ज्या शेतकर्‍यांना लाभ भेटत आहे त्यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan credit card) दिले जाते.


🔰किसान क्रेडिट कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे 

  • जमिनीची कागदपत्रे उदा.आठ अ आणि सातबारा.
  • अन्य बँकेतून कर्ज घेतले नाही म्हणून शपथपत्र. 
  • कर्ज घेण्यासाठी आधार कार्ड .
  • पॅन कार्ड .
  • तीन फोटो आवश्यक असतात.किसान credit card yojana online apply किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा.
  • किसान क्रेडिट कार्ड दोन प्रकारे काढता येतो.ऑनलाईन आणि ऑफलाईनकिसान क्रेडिट कार्ड ऑनलाइन कसे काढावे?तर किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
  • किसान क्रेडिट कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी संबंधित आणि अधिकृत  वेबसाईट ला भेट द्यावी आणि सर्व माहिती भरून अर्ज करता येतो. 
  • किसान क्रेडिट कार्ड ऑफ लाईन काढण्यासाठी तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज भरून बँकेत पी एम किसान निधी चे पैसे जमा होतात त्याठिकाणी तो जमा करावा लागतो, अर्ज केल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड 15 दिवसाच्या आत तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळते.

वरील लेखात आपण किसान credit card yojana in marathi।किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहितीवरील माहितीमध्ये काही बदल अथवा सूचना असल्यास आमच्याशी संपर्क करावा,धन्यवाद.. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने