क्रेडिट कार्ड Credit Card चे फायदे आणि तोटे.

क्रेडिट कार्ड फायदे आणि तोटे. 

Credit Card All information in Marathi।क्रेडिट कार्ड चे फायदे आणि तोटे
क्रेडिट कार्ड 

Credit Card All information in Marathi भरतासारख्या देशात सुद्धा क्रेडिट कार्डधारकांची संख्येत वाढ होत चालली असून क्रेडिट कार्ड हे डिजिटल आर्थिक व्यवहार करण्यासाठी खूप उपयोगी असून,आपल्या खात्यात पैसे शिल्लक नसतील तरी आपण ऑनलाईन ई कॉमर्स साईट (Online e-commerce site) म्हणजे Amazon, Flipkart इ.वरून शॉपिंग Shopping करू शकतो आणि नंतर ठराविक मुदतीत ते बँकेचे पैसे परत करू शकतो,म्हणजे बँक तुम्हाला तुमच्याकडे पैसे नसतील तरील उधार किंवा छोटे कर्ज म्हणून तात्पुरती पसे देत असते.

क्रेडिट कार्ड विषयी अनेक प्रश्न विचारले जातात,जसे क्रेडिट कार्ड म्हणजे काय?,क्रेडिट कार्ड कसे काढावे?क्रेडिट कार्ड काढण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात?कोणत्या बँक क्रेडिट कार्ड देतात?कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड चांगले आहे?क्रेडिट कार्डचा काय उपयोग होतो?क्रेडिट कार्ड वापरण्याचे काय फायदे आहेत?क्रेडिट कार्ड वापरण्याचे काय तोटे आहेत?क्रेडिट कार्ड काढण्यासाठी काय करावे लागते? आपण क्रेडिट कार्ड विषयी काही प्रश्नाचे उत्तरे मिळतात का ते बघूया. कृपया संपूर्ण लेख वाचावा. 

Credit Card क्रेडिट कार्ड हे बँकेने आपल्या ग्राहकाला पुरवलेली डेबिट कार्ड प्रमाणेच  सुविधा आहे.क्रेडिट कार्ड आपल्याला बँक आपल्या खात्यावर जर पैसे नसतील तर आपल्या क्रेडिट वर म्हणजे आपण बँकेचे सर्व व्यवहार चोख केलेले असतील तर बँक आपल्याला जे कार्ड देते त्याला क्रेडिट कार्ड म्हणतात.

क्रेडिट कार्ड च्या सहाय्याने आपण आपल्या खात्यावर पैसे शिल्लक नसतील तरी क्रेडिट कार्ड वापरुन तुम्ही खरेदी करू शकता,फक्त ते तुम्हाला बँकेने दिलेल्या मुदतीत परत कर्वे लागतात.थोडक्यात बँकेने तुम्हाला कर्ज घेण्यासाठी दिलेली सुविधा होय,क्रेडिट कार्ड शक्यतो परदेशात,प्रवासात,किंवा ऑनलाईन खरेदी साठी जास्त प्रमाणात वापरले जाते. 

क्रेडिट म्हणजे काय?

Credit (क्रेडिट) म्हणजे मराठीमध्ये क्रेडिटला "पत"असे म्हणतात.

बँकेत आपली पत ही आपण आपल्या बँकेतील खात्यावरील केलेले व्यवहार यावर अवलंबून असते.तुम्ही जर एखाद्या बँकेतून कर्ज घेतले आणि ते वेळेवर कोणतीही तक्रार न करता व्यवस्थित फेडले तर तुमची त्या बँकेत एक प्रकारे क्रेडिट तयार होते.त्यासाठी बँकेतील तुमच्या खात्यावरील व्यवहारात पारदर्शकता असावी लागते. 

बँकेचे क्रेडिट कार्ड कसे काढतात. 

Credit Card (क्रेडिट कार्ड) कसे काढावे? क्रेडिट कार्ड काढण्यासाठी काय करावे लागते असे प्रश्न आपल्या मनात येत असेल तर क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते असणार्‍या बँकेत क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो,कधी कधी बँकेकडून आपल्याला विना अर्ज करता कॉल करून बोलावले जाते.क्रेडिट कार्ड हवे आहे का बँकेकडून वारंवार फोन केला जातो.मला सुद्धा फोन करून क्रेडिट कार्ड दिले गेले होते. 

SBI Credit Card (एस बी आय) सारखी बँक क्रेडिट कार्ड आपल्या ग्राहकांना फोन कॉल करून देते,तसेच ग्राहक क्रेडिट कार्ड काढण्यासाठी संबंधित बँकेत जाऊन बँक मॅनेजरला अर्ज करू शकतात.क्रेडिट कार्ड काढण्यासाठी कागदपत्र लागत नाहीत असा माझा अनुभव आहे कारण क्रेडिट कार्ड देताना ते आपल्या खात्याची योग्यता तपासतात.म्हणजे आपले खाते त्या बँकेत असतेच.त्यामुळे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी जास्त कागदपत्र लागत नाहीत,आपल्या पत्यावर क्रेडिट कार्ड पोस्टाने घरी पाठवले जाते. 

क्रेडिट कार्ड देणार्‍या बँक कोणत्या आहेत तर क्रेडिट कार्ड अनेक बँका देतात जसे  SBI Bank Credit Card ,HDFC Bank Credit Card, Axis Bank Credit Card, ICICI Bank Credit Card, BOI Bank Credit Card इ. 

क्रेडिट कार्ड  वापरण्याचे फायदे. 

  • Credit Card Benefits (क्रेडिट कार्ड) चे फायदे आहेत,जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड चा वापर व्यवस्थित व लिमिट मध्ये केला तर क्रेडिट कार्ड च महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला मोफत बँकेचे पैसे ठराविक कालावधीसाठी वापरायला मिळतात. 
  • वैद्यकीय म्हणजे दवाखान्याचे अचानक तुम्हाला बिल भरायचे असल्यास तेव्हा तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही क्रेडिट कार्ड ने ते बिल ,पेमेंट भरू शकता. 
  • आपल्याला अचानक आर्थिक अडचण आल्यास आपण अशा वेळी क्रेडिट कार्ड चा वापर करू शकता. 
  • आपल्या महिन्याच्या खर्चाची तपासणी करता येते. 
  • रोख रक्कम जवळ बाळगण्याची गरज पडत नाही.त्यामुळे पैसे चोरी होण्यापासून सुटका मिळते. 
  • नियंत्रित वापर आणि वेळेत क्रेडिट कार्ड चे बिल भरले तर क्रेडिट कार्ड फायद्याचे ठरते. 
  • क्रेडिट कार्ड वर साधारणपणे 50 दिवसापर्यत् पैसे वापरायला मिळतात. 
  • प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड वर ऑफर देत असते,उदा सहलीला जाणे,हॉटेल बुकिंग,ऑनलाईन शॉपिंग साठी क्रेडिट कार्ड वर ऑफर दिल्या जातात. 
  • क्रेडिट कार्ड च्या वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालना मिळते.वेळेत बिल भरल्यास आपला सीबील स्कोअर वाढण्यास मदत मिळते. 
  • परदेशात गेल्यावर तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरणे फायद्याचे ठरते. 
  • क्रेडिट कार्ड धारकांना विविध सणासुदीच्या कला सवलत किंवा ऑनलाईन खरेदीवर ऑफर मिळतात. 

क्रेडिट कार्ड वापरण्याचे तोटे. 

  • तुमच्या माहिती साठी सांगतो मी स्वत:एका बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले होते,परंतु मी ते कार्ड न वापर करता माझ्या अकाऊंट वरील पैसे कटींग करून घेतले गेले,बँकेत गेल्यावर कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन अथवा चौकशी करण्यास बँकेने टाळाटाळ केली व मला जवळजवळ क्रेडिट कार्ड चा कोणत्याही प्रकारे वापर न करता चार पाच हजार रुपये तोटा झाला. मला बँक के कडून टोल फ्री नंबर देण्यात आला.
  • त्यांना मी विनंती केली की मला कार्ड बंद करायचे तर ,त्यांनी मला संगितले कार्ड बंद करण्यासाठी हे डायल करा ते डायल करा पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला ते काय बोलतात,ते सुद्धा निट समजत नव्हते ,आता यात आपल्याला समजत नाही ही आपली चूक असेल,पण त्यांनी कार्ड बंद केले नाही , शेवटी मी वारंवार ईमेल करून ते बंद करून घेतले. 
  • तुम्हाला जर खूपच आवश्यक असेल तरच क्रेडिट कार्ड घ्या अन्यथा क्रेडिट कार्ड घेण्यापासून चार हात लांब राहाल तेवढे फायद्याचे ठरेल. 
  • क्रेडिट कार्ड खरेदीवर बँक वार्षिक चार्जेस लावत असते,त्यामुळे आपला फायदा ऐवजी तोटा होतो,आपण जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर क्रेडिट कार्ड कस्टमर केअर कधीही फोन करून आपल्याला विचलित करत असतात आणि आपल्या चालू कामात अडथळा आणतात. 
  • क्रेडिट कार्ड चे व्यवहार स्वत: करा इतरांना व्यवहार करायला क्र्दित कार्ड देऊ नका अन्यथा फसवणूक होऊ शकते. 
  • क्रेडिट कार्ड कसे वापरावे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर,क्रेडिट कार्ड वापरण्याचे तोटे खूप आहेत.
  • क्रेडिट कार्ड वर केलेल्या खरेदीचे बिल बँकेने दिलेल्या मुदतीच्या आत भाने आवश्यक असते.जर तुम्ही मुदतीत बिल भरले नाहीत तर बँक दंड आकारते,तो दंड खूप मोठा असतो.वेगवेगळे दुप्पट तिप्पट व्याज दर लावले जातात,त्यामुळे ग्राहकांना त्याचा खूप मोठा तोटा सहन करावा लागतो. 
  • क्रेडिट कार्ड च लिमिटेड आणि योग्य उपयोग केला नाही तर तुम्ही कर्जबाजारी होऊ शकता.
  • क्रेडिट कार्ड वर एक प्रकारे वैयक्तिक कर्ज दिलेले असते त्याचे व्याज दर खूप असत्तात. 
  • कधी कधी छुपे कर आकारले जातात याविषयी ग्राहकांना माहिती नसते. 
  • क्रेडिट कार्ड चे बिले वेळेत भरले नाही तर जास्त व्याजदर लावले जातात. 
  • आपण जर वेळेत बिल भरेले नाही तर आपला क्रेडिट स्कोअर खराब होतो आणि मग आपल्याला पर्सनल लोन मिळण्यास अडचण येते. 
  • अनावश्यक खर्च करण्याची सवय लागते,आणि आपले दर महिन्याला आर्थिक तोटा होतो व कर्जबाजारी होऊन बसतो. 
  • मी क्रेडिट कार्ड बंद केले परंतु क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी सुद्धा बँक सहकार्य करत नाही,तसेच खूप तारेवरची कसरत करावी लागते.त्यामुळे शक्यतो क्रेडिट कार्ड घेऊच नये असे मी सांगू शकतो.
(वरील माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे हे लक्षात घ्यावे.)
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने