दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा (10th and 12th Supplementary Exam 2023) चे हॉल तिकीट 'या' संकेतस्थळावर आजपासून होणार उपलब्ध ..

दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा चे हॉल तिकीट 'या' संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध होणार..


दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा (10th and 12th Supplementary Exam 2023) चे हॉल तिकीट 'या' संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध होणार..

10th and 12th Supplementary Exam 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै ऑगस्ट 2023 मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in  या अधिकृत वेबसाईट वर बुधवारी 5 जुलै 2023 पासून सकाळी 11 वाजल्यापासून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या लॉगिन मधून प्रवेश पत्र घेता येऊ शकेल. 

Join : Whats App Channel

तसेच प्रवेश पत्र घेण्यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधने आवश्यक असून त्या संदर्भात सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.


शाळा महाविद्यालयांना दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षाबाबत सूचना:

दहावी बारावी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेश पत्र प्रिंट काढून विद्यार्थ्यांना सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांनी द्यायचे असून हे प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंट काढून देताना विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारची शुल्क घेण्यात येऊ नये.


तसेच प्रवेश पत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा, प्राचार्याचा शिक्का स्वाक्षरी करणे आवश्यक असेल. असे सूचनेमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे


प्रवेशपत्र मध्ये विषय आणि माध्यम बदल असतील तसेच प्रवेश पत्रातील छायाचित्र स्वाक्षरी विद्यार्थ्यांचे नाव या दुरुस्ती असल्यास शाळा महाविद्यालयांनी त्यांचे स्तरावर योग्य कार्यवाही पूर्ण करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवावी किंवा समक्ष त्वरित संपर्क करणे आवश्यक आहे.


विद्यार्थ्याकडून प्रवेश पत्र गहाळ झाल्यास संबंधित शाळा महाविद्यालयाने पुनश्च प्रिंट काढून त्यावर द्वितीय प्रत असा शेरा देणे आवश्यक असेल असे सुचनेमध्ये सांगण्यात आलेले आहे.


हे वाचा : Distance Learning म्हणजे काय, Distance Learning चे वैशिष्ट्ये..


दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा (10th and 12th Supplementary Exam 2023) चे हॉल तिकीट


www.mahahsscboard.in  या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध होणार आहेत.

Join : Whats App Channel

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने