निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना महागाई वाढ देण्याबाबत शासन निर्णय जारी..
Pensioners/Family Pensioners News : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक 1 जानेवारी 2023 पासून महागाई वाढीचा दर 38% वरून 42% सुधारित करण्यात यावा या संदर्भात शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.
(ads2)
सदर महागाई वाढ दिनांक 1 जानेवारी 2023 पासूनच्या थकबाकीसह माहे जुलै 2023 च्या निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतना सोबत रोखीने देण्यात यावी. तसेच प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी द्येय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहनार आहे.
ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेले आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी आणि कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यांच्यामधील निवृत्तीवेतनधारक कुटुंब/ निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारंस लागू राहील. हा शासन निर्णय जिल्हा परिषद निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना सुद्धा लागू राहील.