राज्यातील तरुणांना MPSC चे मोफत प्रशिक्षण, आता मिळणार दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतन...

राज्यातील तरुणांना MPSC चे मोफत प्रशिक्षण, मिळणार दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतन...



राज्यातील तरुणांना MPSC चे मोफत प्रशिक्षण, आता मिळणार दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतन...

BARTI : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत इच्छुक व पात्र युवक युवा तिकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत यामध्ये एमपीएससी परीक्षेच्या मोफत पूर्व प्रशिक्षण तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोठी संधी असून, एमपीएससीच्या मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संविस्तर बातमी खालीलप्रमाणे.


महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी परीक्षेसाठी मोफत अनिवासी प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबवण्यात येणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्रातील इच्छुक व पात्र तरुणांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 जुलै 2023 पर्यंत असणार आहे.





प्रशिक्षणासोबत दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतन मिळणार...

उमेदवारांची MPSC प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असून यामध्ये उमेदवाराची चाचणी परीक्षा 30 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणामध्ये रोज चार तास आणि त्यापेक्षा जास्त कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दरमहा 80 टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणाला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 9000 विद्यावेतन देण्यात येणार आहे आणि विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज व विशेष शैक्षणिक साहित्य व पुस्तकांसाठी प्रति विद्यार्थी याप्रमाणे पंचवीस हजार रुपये  देण्यात येणार आहेत.


प्रशिक्षण घेणाऱ्यांना प्रशिक्षण कालावधीमध्ये कोणतीही शासकीय निम शासकीय खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही. ज्या उमेदवारांनी यापूर्वी BARTI पुणे मार्फत राज्य लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा प्रशिक्षण व यूपीएससी नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेतले आहे, त्यांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार नाही. असे BARTI यांनी सांगितले आहे.



ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक खालीलप्रमाणे



अधिकृत संकेतस्थळ



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने