जागतिक रेडक्रॉस दिन म्हणजे काय? तो कसा साजरा करतात?
![]() |
World Red Cross Day |
जगात अनेक थोर विचारवंत होऊन गेले अनेक विचारवंतानी मानवता हि एकच जात आहे. असे म्हटले आहे.मात्र तत्कालीन समजात या विचारला मूर्त रूप देणारी कोणतीही संस्था नव्हती.काही लोक वैयक्तिक पातळीवर काम करत असतील ती गोष्ट वेगळी अशीच उदात्त विचार घेऊन एक चळवळ उदयास आली ती म्हणजे रेडक्रॉस चळवळ होय.
जागतिक रेड क्रॉस दिन कधी साजरा करतात?
दरवर्षी 8 मे हा दिवस जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. रेड क्रॉस ही एक संस्था असून जगातील सर्वच देशांमध्ये सेवाभावी संस्था म्हणून कार्यरत आहे.रेड क्रॉस मानतवादाची पुरस्कार करणारी संघटना म्हणून ओळखले जाते. ही संस्था राजकीय जात-पात धर्म यांचा आधार वर कुठलाही मतभेद करत नाही.
जागतिक रेड क्रॉस दिनाचा इतिहास
रेड क्रॉस मोहिमेस जन्म देणारे जीन हेन्री ड्यूनेन्ट यांचा जन्म 8 मे 1828 रोजी झाला होता. त्यांचा हा जन्मदिवस जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांची आठवण म्हणून संपूर्ण जगभरात आठ मे हा दिवस जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो.
जीन हेन्री ड्यूनेन्ट यांचा 1910 मध्ये स्विझरलँड मध्ये मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूनंतरही रेड क्रॉस चा कार्य थांबलं नाही. गेल्या दीडशे वर्षांपासून ही संस्था कार्य करत आहे. नैसर्गिक आपत्ती उडवल्यास ही संस्था त्यांना मदत करते. सध्या 186 देशांमध्ये रेड क्रॉस समिती कार्य करत आहे.
भारतीय रेड क्रॉस दिनाची पार्श्वभूमी.
पहिल्या महायुद्धाच्या सुमारास भारताचा रेड क्रॉस चळवळीशी संबंध आला. भारतात 1920 साली पार्लमेंटरी एक च्या अंतर्गत भारतीय रेड क्रॉस चे गठन करण्यात आले. यामध्ये जवळजवळ एक कोटी रुपये देणगी मिळाली आणि या चळवळीचा भारतात काम सुरू झालं बंगालचा दुष्काळ पडला असताना या संस्थेचे बचाव कार्य खूप मोठे असून नंतर सर्वत्र देशभरात रेड क्रॉस च्या शाखा संघटित करण्यात आल्या भारतीय रेड क्रॉस संस्थेची राज्य, जिल्हा व देश पातळीवर शाखा स्थापन करण्यात आलेले आहेत भारतीय रेड क्रॉस संस्थेचे कामकाज स्वयंसेवक पाहतात.
रेड क्रॉस दिन साजरा करण्याचा उद्देश.
रेड क्रॉस संस्थेचे बोधचिन्ह कोणते?
रेड क्रॉससंघटनेचे कार्य:
रेड क्रॉस या संघटनेची कार्य आजारी सैनिक व लढाईमध्ये जखमी झालेल्यांना मदत करणे नैसर्गिक आपत्तीमध्ये सहकार्य करणे मानवनिर्मित आपत्ती मध्ये मदत करणे, थलेसेमिया कर्करोग अनेमिया यासारख्या आजारासाठी औषध उपचार तसेच रक्तपुरवठा करणे आरोग्य विषयक जनजागृती आणि सुधारणा करणे इत्यादी कार्य संघटना करत असते