महाराष्ट्रातील सात आश्चर्य!
आपल्या महाराष्ट्रातील सात आश्चर्य कोणती? ठाऊक आहे का? मोठा इतिहास आणि वारसा असलेलं हे राज्य अनेक अर्थाने प्रगतीपथावर आहे.
1. लोणार सरोवर:
बुलढाणा जिल्ह्यत असलेलं उल्कापात होऊन तयार झालेलं अप्रतिम सरोवर.
2. अजिंठा-वेरूळ लेणी :
जागतिक वारसा असलेली ही लेणी छ. संभाजीनगर पासून जवळच आहेत.
3. कास पठार:
साताऱ्याजवळ असलेलं हे पठार विविध रंगाच्या छोट्या फुलांनी बाहेरून आलेलं असतं.
4. छ. शिवाजी महाराज टर्मिनस:
मुंबईमध्ये असलेलं CST या नावाने प्रसिद्ध ब्रिटिशकालीन रेल्वे टर्मिनस
5. पाणचक्की:
छ. संभाजीनगर शहरातील पाण्यावर चालणारी चक्की.
6. विश्व विपश्यना पॅगोडा:
मुंबईमधील गोराईजवळील हा पॅगोडा केवळ एका खांबाच्या साह्याने उभा आहे.
7. रायगड किल्ला:
महाराजांची राजधानी आणि पूर्वेकडील जिब्राल्टर या नावाने ओळखला जाणारा किल्ला.
नवीन नवीन बातम्या मिळवण्यासाठी खालील What's App ग्रुप ला जॉईन व्हा.