Acidity म्हणजे नेमकं काय?
![]() |
Acidity म्हणजे काय? |
"इनो ऑन ऍसिडिटी गॉन आयुर्वेद अँटासिड, गॅस और ऍसिडिटी में तुरंत राहत... " अश्या जाहिराती नेमक्या जेवणाच्यावेळी टीव्हीवर येतात, आणि आपल्याला ऍसिडिटीची जाणीव करून देतात.
मुळात आजच्या काळात प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला ऍसिडिटीचा त्रास आहे. जळजळ, ऍसिडिटी, पित्त, मळमळ, घशाशी येणं, छातीत आग अश्या समस्या अनेकांना भेडसावत आहेत.
ऍसिडिटी, ज्याला ऍसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग (GERD) म्हणूनही ओळखले जाते, हा एक असा विकार आहे जेथे पोटातील ऍसिड अन्ननलिकेत परत जाते, ज्यामुळे चिडचिड आणि अस्वस्थता निर्माण होते.
पोटातील ऍसिड अन्न पचनास मदत करण्यासाठी आवश्यक आहे, परंतु जेव्हा ते अन्ननलिकेमध्ये परत जाते, तेव्हा छातीत किंवा घशात जळजळ होऊ शकते.
Acidity कशामुळे होत असते?
जास्त प्रमाणात खाणे, मसालेदार किंवा आम्लयुक्त पदार्थांचे सेवन, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, गर्भधारणा आणि काही वैद्यकीय परिस्थिती यासारख्या विविध कारणांमुळे एसिडिटी होऊ शकते.
ऍसिडिटी ही जीवनशैलीत बदल केल्यास आणि नीट वेळेत औषधोपचार घेतल्यास बरी केली जाऊ शकते. उपचार न केल्यास, यामुळे एसोफॅगिटिस, अल्सर आणि कडकपणा यासारख्या गुंतागुंत होऊ शकतात.
मनाने घेतलेल्या औषधानी सुद्धा त्रास होऊ शकतो. शक्यतो डॉ किंवा वैद्यांचा वेळीच घेतलेला सल्ला आणि जीवनशैलीतला बदल हा ऍसिडिटी पासून मुक्ती साठी फायदेशीर ठरतो.