लवकर नैसर्गिक पद्धतीने घरी आंबा कसा पिकावाल?
![]() |
आंबा पिकवण्याची पद्धत! |
मित्रानो, सध्या बाजारात अनेक अनेक ठिकाणी आंबा विकायला आलेला दिसून येतो. साधारण आपल्या भारतात एप्रिल ते जून हे तीन महिने आंबा या फळाची बाजारात आवक जावक मोठ्या प्रमाणात सुरु असते, कारण याच दिवसात आंबा खाणे योग्य असते. तसेच हा आंब्याचा सिजन समजला जातो. या तीन महिन्यात आंबा बाजारात उपलब्ध होतो. त्यातील जून महिन्यात शक्यतो जास्त खाणे योग्य नाही. कारण जून मध्ये बऱ्याचठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होते आणि पाऊस पडल्यावर आंबे खाऊ नये असे म्हणतात,कारण आजारी पडण्याचे लक्षणे असतात.
नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवण्याची सोपी पद्धत:
आंबा हा झाडावरून उतरवण्याच्या अगोदर त्यातील बी परिपक्व झालेली असावी. म्हणजे गावाकडे त्याला आंबा पाडाला लागला असे म्हणतात. म्हणजे झाडावर आंबे पिकलेल्या अवस्थेत काही प्रमाणात सापडतात. शक्यतो कैरी परिपक्व असावी. कैऱ्या झाडावरून उतरवताना अलगत उतराव्या.
कैरीला जो देठ असतो तो पूर्णपणे न काढता फळापासून एक इंच ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे कैरी किंवा फळाचा चिक हा फळाला लागणार नाही, जर चिक कैरीला लागला तर आंबा पिकल्यावर त्या ठिकाणी काळा चिकाचा डाग पडतो,आंबा खराब होण्याची शक्यता असते. तसेच बाजारात विक्रीला मार खातो.
कैरी अलगत उतरवणे आणि तिला इजा न होता तसेच घासून न देता घरी आणावी. कैरी घरी आणल्यावर त्यांना दोन ते तीन तास मोकळ्या हवेत ठेवावी.
ज्या ठिकाणी कोरडी आणि स्वच्छ जागा असेल तेथे दाट गवताचा थर टाकावा. गवतावर एक एक कैरी ओळीत ठेवावी. शक्य असेल तर मध्ये मध्ये गवत टाका.
पूर्ण एक थर कैरी वर जाड गवताचा थर टाकून त्यावर आणखी एक थर कैरी मांडणी करूनपरत गवताचा दाट थर टाकू शकता. कैऱ्या एकमेकांना घासणार नाही किंवा गवतापासून इजा होणार नाही असे गवत वापरावे.
हे सर्व झाल्यावर त्यावर काही निकामी पोती चोहो बाजून संपूर्ण फळे झाकतील अशा पद्धतीने झाकून ठेवावी. शक्यतो फळांना हवा लागणार नाही, तसेच परत परत ती उघडले जाणार नाही असे नियोजन करावे. साधारणपणे हिरवा आंबा पिकायला 10 ते 12 दिवस लागतात. आंबा पिकायला लागल्यावर त्याचा रंग पिवळा होतो.
कैऱ्याला पिकल्यावर गोड सुगंध यायला सुरवात होते. तेव्हा आपण समजून घ्यावे की आंबे नैसर्गिक आणि योग्य पद्धतीने पिकले आहेत. आंबे पिकण्यासाठी उष्ण हवामान आवश्यक असते. थंड ठिकाणी आंबा पिकायला घालू नये. अशा पद्धतीने आपण आपल्या नैसर्गिक पद्धतीने घरी आंबा पिकवू शकतो.
नवीन अपडेट बातम्यासाठी खालील What's app group जॉईन करा.