तंत्रस्नेही शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023
![]() |
शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धा |
अलीकडील काळात ऑनलाईन शिक्षणाला खूप महत्व प्राप्त होताना दिसून येत आहे. या धर्तीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचा शासन निर्णय निर्गमित झाला असून यामध्ये या शासन निर्णय नुसार शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 नियोजन देण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रात सध्या ICT तंत्रज्ञानाचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत आहे. त्यामुळे डिजिटल शिक्षणाला महत्व प्राप्त झाले आहे. कोविड19 च्या काळात अनेक शिक्षक व विद्यार्थी पालक यांनी ऑनलाईन शिक्षणाचा उपयोग केला आहे. त्यात Video निर्मिती तसेच online पद्धतीने तासिका घेऊन अभ्यासक्रम शिकवला गेला. विद्यार्थी डिजिटल साधने वापरून अभ्यास करताना दिसून येत आहेत. शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसून येतात. राज्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या नुसार 2,89,560 शिक्षक तंत्रस्नेही झाल्याचे आढळून आलेले आहे.
आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!
तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण हे आनंददायी वाटत आहे. मनोरंजनात्मक व्हीडीओ,पीपीटी, पीडीएफ,पोस्टर्स, ई साहित्य यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई साहित्य निर्मिती ची चळवळ उभा राहावी यासाठी सर्व व्यवस्थापन,सर्व माध्यमे,व व्यवस्थापनाच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी राज्यस्तर दर्जेदारशैक्षणिक व्हिडीओ निर्मिती खुल्या स्पर्धा शासनामार्फत आयोजित केल्या जाणार आहेत. सदरचा स्पर्धेचा तपशील खालील शासन निर्णय PDF मध्ये दिलेला आहे.