जाणून घ्या ! बुद्ध पौर्णिमा आणि गौतम बुद्ध यांच्याविषयी माहिती.

बुद्ध पौर्णिमा 2023 माहिती मराठी.


बुद्ध पौर्णिमा 2023 माहिती मराठी.
बुद्ध पौर्णिमा


भारतात अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. प्रत्येक धर्मीय लोक आपल्या धर्मातील विशिष्ट सन साजरे करतात. त्यातला एक सन म्हणजे बुद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती होय. या वर्षी बुद्ध पौर्णिमा 5 मे रोजी असून ती सर्वत्र भारतभर साजरी केली जाते.


Join : Whats App Channel


बुद्ध धर्माचे लोक दर्वर्षी हा सन साजरा करतात. भारताबरोबरच  नेपाल ,श्रीलंका ,आशिया ,म्यानमार थायलंड ,बांगलादेश यासारख्या अनेक  देशात हा सन मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.


गौतम बुद्ध यांच्याविषयी थोडक्यात माहिती.


गौतम बुद्ध हे बुद्ध धर्माचे संस्थापक होते. वयाच्या 19 व्या वर्षी गौतम बुद्धांनी आपल्या घराचा त्याग केला.जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी आणि त्यामागचे कारण शोधण्यासाठी त्यांनी आपल्या सर्व सुख सुविधांचा त्याग केला. गृहत्याग केल्यावर तथागत गौतम बुद्धांनी 7 वर्षे कठीण तपश्चर्या केली. बोधगया  येथील पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.त्या झाडाला बोधी वृक्ष असे म्हटले जाते. त्यादिवशी वैशाख पौर्णिमा होती तेव्हापासून तो दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. 


या दिवशी बुद्ध धर्माचे अनुयायी घरी किंवा विहारात जाऊन बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करतात. घरात दिवे लावतात. गौतम बुद्धांनी जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी गृहत्याग केला. त्यांनी चार आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग सांगितले.


आपण त्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे आपल्या जीवनातील दु:ख नाहीसे करण्यासाठी स्वत: मधील वाईट गुणांचा त्याग केला पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने