राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निबंध.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक प्रसिद्ध संत होते. त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. त्यांनी केलेले कार्य आजही सर्वाना मार्गदर्शक ठरते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून त्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले. त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेत आपली काव्यरचना केली.
Join : Whats App Channel
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा परिचय:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव माणिक होते परंतु त्यांच्या गुरुंनी यांचे नाव तुकडोजी असे केले. त्यांनी विदर्भ आणि संपूर्ण भारतात राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी प्रयत्न केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी आपले योगदान दिले. भारत छोडो आंदोलनात त्यांना अटक झाली होती.
समाजातील सर्व घटकांचा विकास कसा होईल याकडे त्यांनी लक्ष दिले. खेडेगाव स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गावे आणि खेडे हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे.जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तन आणि भजन यातून लोकांच्या मनावर बिंबवले. महिलांविषयी आदर आणि आपुलकी तसेच समाजातील सर्व घटक हे समान असून त्यांना सर्वाना समान वागणूक मिळाली पाहिजे. तसेच तरुण वर्गाला योग्य शिक्षण आणि संस्कार मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य आजही खूप प्रेरणादायी समजले जाते.
Join : Whats App Channel