ज्ञान दिन।डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती.

ज्ञान दिन मराठी माहिती.


ज्ञान दिन।डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती.
ज्ञान दिन

नमस्कार, या पोस्ट मधून आपण ज्ञान दिन म्हणजे काय? ज्ञान दिन कधी साजरा केला जातो? ज्ञान दिन का साजरा करतात? ज्ञान दिन केव्हापासून साजरा करण्यात येतो या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.


Join : Whats App Channel


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल आहे, या दिवशी संपूर्ण जगभरात त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक ज्ञानी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व होऊन गेले. संपूर्ण जगाला ज्ञान देणारे एक अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. 


14 एप्रिल हा दिवस ज्ञान दिन म्हणून 2017 पासून महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने साजरा करण्याचे ठरवले असून डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचे प्रतिक मानले जाते.


गेल्या अनेक दिवसांपासून आंबेडकरवादी विचारांचे लोक 14 एप्रिल हा दिवस ज्ञान दिन म्हणून साजरा करत असत, त्यांचे मागणी होती कि 14 एप्रिल हा दिवस ज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात याव म्हणू महाराष्ट्र शासनाने 14 एप्रिल हा दिवस ज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.


डॉ. बाबसाहेब आंबेडकर हे जगातील अनेक शिकलेल्या व्यक्तींपैकी एक असून त्यांनी एकूण 32 विविध पदव्या मिळवल्या आहेत. अनेक विषयांवर अभ्यास आणि प्रभुत्व असलेले हे एक थोर विचारवंत होते. 


वाचा: 

ताज्या बातम्या..

करिअर संधी..

पदभरती..

शैक्षणिक बातम्या..

सरकारी योजना..

शासन निर्णय..

Join : Whats App Channel

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने