Easter Sunday Meaning In Marathi.
![]() |
ईस्टर संडे |
Easter Sunday हा सन ख्रिस्चन बांधवांचा सन असून हा सन इतर सर्व धर्मांचे लोक सुद्धा साजरा करून आनंद व्यक्त करतात. संपूर्ण जगभरात हा सन साजरा करण्यात येतो. Easter Sunday सणाची माहिती या पोस्ट मधून आपण घेऊया. ईस्टर संडे म्हणजे काय? ईस्टर संडे कधी साजरा केला जातो? ईस्टर संडे का साजरा करतात?
Join : Whats App Channel
दरवर्षी गुड फ्रायडे नंतर तिसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे ईस्टर संडे होय. गुड फ्रायडे या दिवशी येशूंना क्रूस वर लटकवण्यात आले होते. गुड फ्रायडे या दिवशी येशूंना क्रूस वरती लटकवण्यात आले होते. म्हणून हा दिवस दुःखाचा दिवस म्हणून साजरा करतात आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू पुनर्जीवित झाले, म्हणून ईस्टर संडे हा दिवस साजरा केला जातो.
ईस्टर संडे म्हणजे काय?
ईस्टर संडे म्हणजे पुनरुत्थान, प्रभू उठले आहेत!
ख्रिस्ती समाजाचा ख्रिसमस नंतरचा सर्वात मोठा सण म्हणजे ईस्टर संडे होय. या दिवशी लोक इतर लोकांना शुभेच्छा देतात. जसे ख्रिसमस ला सांता लहान मुलांना भेटवस्तू देतो. तसेच ईस्टर संडेला ईस्टर बनी लहान मुलांना भेटवस्तू देतो.
ईस्टर संडेला रंगबिरंगी अंडी का सजवतात?
ईस्टर संडेला अंड्याला विशेष असे महत्त्व आहे. नवीन आयुष्य सुरू होण्याचे प्रतीक म्हणून अंड्याला खूप महत्त्व दिले जाते. येशूंना नवीन जन्म घेतला म्हणून अंड्याला महत्त्व आहे. अशी एक परंपरा आहे. इस्टर बनी आदल्या दिवशी लहान मुलांना रंगीबेरंगी सजवलेली अंडे घराच्या कानाकोपऱ्यात लपवून ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ती अंडी मुले शोधतात व त्यातील गिफ्ट व चॉकलेट खाऊन फस्त करतात म्हणून ईस्टर संडेला अंड्याला विशेष महत्त्व आहे . वेगवेगळ्या देशात हा सन वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात.