21 मार्च: जागतिक वन दिन मराठी माहिती .

जागतिक वन दिन मराठी माहिती .


जागतिक वन दिन का साजरा केला जातो?
जागतिक वन दिन 


आज आपली पृथ्वी लोकसंख्या वाढीने त्रस्त आहे. वाढते प्रदूषण हि जगासमोर सर्वात मोठी समस्या असून, जंगलांचा होणारा ऱ्हास, तसेच वनाचा संभाळ करणे, जैवविविधता टिकवणे यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. 

Join : Whats App Channel


जागतिक वन दिन का साजरा केला जातो?


दरवर्षी 21 मार्च हा दिवस जागतिक स्तरावर जागतिक वन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हा जागतिक स्तरावर साजरा होणारा दिवस असून विविध ठिकाणी शाळा ,महविद्यालये,संस्था,संघटना हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करतात. या दिवशी वनाचे महत्व,तसेच लोकांमध्ये जाणीव आणि जागृती होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.


जगातील वन संरक्षणाच्या बाबतीत अनेक परिसंस्थात जीवसृष्टीचे अस्तित्वात धोका निर्माण झाला आहे. लोकसंख्येतील अविरत आणि बेसुमार वाढ तसेच, अफाट बुद्धिमत्ता व मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यावरणात वाटेल तसे बदल घडवून आपण आपल्या ऱ्हासाकडे वाटचाल करत आहोत.


मानव अनेक प्रकारांनी वनक्षेत्राचा नाश करत आहे. निसर्गाला दुर्बल तिकडे नेत आहे. त्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पशुपक्षी कीटकनाशक होत आहेत. औषधी वनस्पती व वन्य प्राण्याचा काही जाती नष्ट होत आहेत. 


वने म्हणजे पृथ्वीची फुफ्फुसे होत. पण मानवाने अंदा धुंद जंगल तोड करून ही फुफ्फुसे आपण नष्ट करून टाकले आहेत. वने ही माणूस व निसर्ग या दोघांच्या सुदृढ भवितव्यासाठी बहुमूल्य आहे. वृक्ष कार्बनडॉक्साईड शोषण घेऊन ऑक्सिजन सोडतात. जमिनीची धूप थांबवतात. जलसंधारण करून जलचक्र सुस्थितीत ठेवतात आणि लाखो सजीवांच्या प्रजातींना आश्रय देतात.


वने म्हणजे जीवन असून आपण त्याचं नाश करत आहोत, हे आपल्या सर्वांचे लक्षात आले पाहिजे. गेल्या 50 वर्षात जगातील निम्मी वृक्षराची म्हणजेच सुमारे तीन अब्ज हेक्टर जमिनीवरील जंगले नष्ट केली गेली आहेत. आज चिपको आंदोलन करणारे हजारो सुंदरलाल बहुगुणा उभे राहण्याची व बिश्नोई समाजाचे अनुकरण करण्याची गरज आहे.


शहरीकरण औद्योगीकरण रसायन वापर रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर यामुळे जमिनीचा कस कमी होत असून जमीन नापीक होत आहे. लोकसंख्येच्या वाढीमुळे जल व वायू प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण हाच मार्ग आहे. वनांचा नाश थांबवण्यासाठी भारत सरकारने 1952 मध्ये एक कायदा मंजूर केला त्यानुसार देशाच्या 33% भूभागावर वने असणे आवश्यक आहे. परंतु आज जंगलतोडीमुळे ही प्रमाण सात ते आठ टक्के एवढेच बाकी आहे.


असाच वनांचा ऱ्हास होत राहिला तर, भावी पिढ्यांचे भवितव्य धोक्यात येईल. म्हणून श्री संत तुकाराम महाराज म्हणतात. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे"  जनजागृतीसाठी 21 मार्च जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. 

Join : Whats App Channel

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने