जागतिक हवामान दिन.
![]() |
जागतिक हवामान दिवस |
1950 साली जागतिक हवामानशास्त्र संघटना स्थापन झाली. ही संस्था स्थापन होण्यासाठी पुढाकार घेणारे 31 देशात भारतही समाविष्ट होतो. स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवरील नैसर्गिक बदलांशी असतो. हे आपल्या ध्यानात आले. हवामानाचे महत्त्व समजावे तसेच याविषयी जाणीव आणि जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो.
हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्पर संबंधातून निर्माण होणारी वादळी, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट या सर्व घटनांची कालमापनानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र असे म्हणतात.
वातावरणातील या घडामोडीचे निरीक्षण करून त्यांचा अभ्यास करणे त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भावी भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणी हे हवामान शास्त्रज्ञांची प्रमुख काम असते. 23 मार्च हा दिवस जागतिक हवामानशास्त्र, जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा होतो. इसवी सन पूर्व सातव्या शतकात बेबीलोन मध्ये ढगाच्या रचनेवरून हवामानाचा अंदाज वर्तवला जात असे दिसून येते.
Join : Whats App Channel
ग्रीस चीन व भारतात विविध नैसर्गिक निरीक्षणांचा व खगोलशास्त्राचा वापर हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी केला जात असे. भारतीय ज्योतिष शास्त्रातील निरीक्षणा नुसार हस्त,मृग नक्षत्राच्या राशीतील स्थानानुसार पाऊस कधी पडणार याचा अंदाज घेतला जात असे. परंतु हे ठोकताळे दरवेळी अचूक असतील असे घडत नसे. ज्योतिषाच्या अभ्यासानुसार त्यात फरकही होण्याची शक्यता असते.
इसवी सन 1922 मध्ये लुईस फ्रायरिचर्डसन या हवामान शास्त्रज्ञाने अंदाज वर्तवण्यासाठी सांख्यिक पद्धत सुचवली. या पद्धतीने नुसार निरीक्षणांच्या सांख्यिक विश्लेषणानुसार सारखेपणा शोधून त्यानुसार काही प्रमाणात हवामान अंदाज वर्तवता येऊ लागले. मात्र ही आकडेवारी मोठी असे संगणकाच्या शोधाने हवामानाचा अभ्यास स्वीकार झाला.
हवामान निरीक्षणाचा उपयोग करून अंदाज वर्तवण्याची सांख्यिक पद्धतीने गणिते करून त्यानुसार अंदाज वर्तवण्याचे काम संगणक करू लागले. यानुसार नकाशे तयार करण्याचे काम संगणक करू लागले. हवामान निरीक्षणासाठी अनेक प्रकारची साधने वापरली जातात. या साधनांच्या मदतीने हवामान विषयी घटनेचे भौगोलिक स्थान तिची तीव्रता, वेग प्रकार त्याच्यामुळे होणारे तापमानातील बदल अशा निरीक्षणाची नोंद केली जाते.हे उपकरणे जमीन समुद्र आणि वातावरणाची तिन्ही ठिकाणी निरीक्षणासाठी नियुक्ती केली जातात.
जमिनीवरील साधने ही प्रामुख्याने हवामान वेधशाळांमध्ये असतात. रडार ठिकठिकाणी उभारलेले रडार रेडिओलरीच्या साह्याने विविध प्रकारच्या वृष्टीचा पाऊस, गारा इत्यादीचा अभ्यास करतात. यातील वाऱ्याचा वेग व दिशा याची नोंद घेता येते. समुद्राच्या पाण्यावरील साधने समुद्राच्या पाण्यावर हेलकावे खाणाऱ्या फुग्यांसारख्या तरंगणाऱ्या वस्तूंना बांधलेली उपकरणे पाणी व वारा या दोन्ही वर्तणुकीची नोंद करतात. वातावरणात सोडली जाणारी फुगे यांच्या साह्याने पृथ्वीच्या वातावरणात सोडली जाणारी रेडिओ संच तेथील विविध घटकांची निरीक्षणे रेडिओ लहरीद्वारे पृथ्वीवर पाठवतात.
अवकाशात पृथ्वीप्रदक्षिणा करणारे काही मानवधर्मित उपग्रह खास हवामान निरीक्षणासाठी असतात व बदलांवर लक्ष ठेवून ते बदल कळवत राहतात. याशिवाय चक्रीवादळाचा अभ्यास करण्यासाठी त्या हवामान ठिकाणी सुरक्षित अंतरावरून घिरट्या घालत नोंदी करण्यासाठी सोडली जातात. ही एक प्रकारची ऊर्जा हवामान वेधशाळा असतात.
वाचा:
पदभरती..
Join : Whats App Channel