10 वी नंतर केले जाणारे ITI मधील हे कोर्स ठरत आहेत वरदान!
मुलानो! घाबरून जाऊ नका सध्या वाढत्या शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्या आणि लोकांच्या वाढत्या गरजा यांचा अभ्यास करून खालील ITI कोर्स हे आताच्या काळात गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी जीवनाचा आधार ठरत आहेत.
मुलानो! घाबरून जाऊ नका सध्या वाढत्या शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्या आणि लोकांच्या वाढत्या गरजा यांचा अभ्यास करून खालील ITI कोर्स हे आताच्या काळात गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी जीवनाचा आधार ठरत आहेत. कारण हे सर्व कोर्स कमी पैशात आणि कमी कालावधीत पूर्ण केले जाऊ शकतात. जाणून घ्या या कोर्स विषयी संपूर्ण माहिती.
1. Electrician:
इलेक्ट्रीशियन शब्द आपण सर्वांनी ऐकलेला आहे. कारण आपल्या घरात अनेक प्रकारच्या विजेवर चालणाऱ्या वस्तू असतात. त्या खराब झाल्यावर आपल्याला लगेच इलेक्ट्रीशियन ची गरज पडत असते. हा आयटीआय कोर्स खूप चांगला कोर्स असून यामध्ये जास्त कुशल असणे आवश्यक नसते. हा कोर्स तुम्ही 10 नंतर सुद्धा करू शकता.
2. Fitter:
फिटर चा कोर्स हा आयटीआयसाठी फिटरचा कोर्स कमीतकमी 2 वर्षे लागतो आणि 10 वी नंतर योग्य प्रकारे सुरू करू शकता.
3. Carpenter:
कारपेटर अभ्यासक्रम हा एक आय टी आय कोर्स असून हा कमी कुशल उमेदवारांसाठी देखील आहे. हा कोर्स 10 नंतर केला जाऊ शकतो. कारपेंटर आयटीआय कोर्स किमान 2 वर्षांचा आहे .
4.Foundry Man:
फाउंड्री मॅन फक्त 1 वर्षासाठी एक कोर्स आहे.हा कोर्स 10 वी पास वर सुद्धा केला जाऊ शकतो. कमीत कमी शिक्षण पूर्ण करून सुद्धा हा कोर्स आपण पूर्ण करू शकता.
5. Book Binder:
महाराष्ट्र आणि केरळसारख्या राज्यांमध्ये पुस्तके बांधणीसाठी आयटीआय अभ्यासक्रम उपलब्ध आहे. बुक बाइंडर कोर्स अभ्यासक्रमाचा कालावधी फक्त 1 वर्ष असू शकतो. त्यामुळे हा कोर्स सुद्धा खूप फायद्याचा असतो.
6. Plumber:
प्लंबर हा एक चांगला आय टी आय कोर्स असून या कामाला अधिक महत्व प्राप्त होत आहे. कारण वाढते शहरीकरण यामध्ये मागणीनुसार प्लंबिंग काम कमी अधिक असू शकते. आपण सहजपणे एक प्रमाणित प्लंबर होऊ शकता. त्यासाठी अभ्यासक्रम 2/ 3 वर्षाचा आहे. आपण आपल्या आवडीनुसार निवड करू शकता.
7.Sample Maker:
नमुना निर्माता (Sample Maker) एक औद्योगिक फाउंड्री कोर्स आहे. आपल्याला फक्त 10 वी परीक्षा द्यायची आहे आणि कोर्सचा कालावधी 2 वर्षे आहे. हे अभ्यासक्रम भारतातील 5 राज्यांमध्ये दिले आहेत.
8. Mason building constructor
बांधकाम करणे हे एक कष्ट करून केले जाणारे काम आहे यात सुद्धा 8 पास असणे आवश्यक असते हा कोर्स करून तुम्ही तुमचा उदार निर्वाह चालू शकता. यात आपल्या ज्ञानाच्या आधारावर आणखी पुढे काही गोष्टी कामाच्या अनुभवातून शिकू शकता.
9. Advanced Welding:
भारतात आयटीआयसाठी वेल्डिंगचे अभ्यासक्रम 1 वर्ष आणि 2 वर्षांपर्यंत चालते. आपण आपले 10 वी उत्तीर्ण केले असेल तरी आयटीआय कोर्स करू शकता. हा एक डिप्लोमा कोर्स आहे.
10. Wireman:
वायरमेन जॉब्स सहजगत्या उपलब्ध आहेत हा सुद्धा एक चांगला कोर्स असून आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा कोर्स 1 वर्षासाठी आहे. आपण10 वी नंतर हा कोर्स करू शकता.
या व्यतिरिक्त आणखी काही असे ITI कोर्सेस उपलब्ध आहेत त्यांची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत.