International Women's Day Information In Marathi.

आंतरराष्ट्रीय महिला दिन मराठी माहिती.


महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 


International Women's Day Information In Marathi.
आंतरराष्ट्रीय महिला दिन

पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा करण्यात येतो? 


दिनांक 28 फेब्रुवारी 1990 रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला, असला तरीही सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनानुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला आहे.


आंतरराष्ट्रीय महिला दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी:


संपूर्ण अमेरिका आणि युरोप सहित जवळजवळ संपूर्ण जगभराच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्री पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. 1890 मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्क संदर्भात "द नॅशनल अमेरिकन असोसिएशन" स्थापना झाली. परंतु ही असोसिएशन सुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती.


दक्षिणेकडील देशांना मतदात्यांना त्यापासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरीत मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायलाच हवा अशा प्रकारे आवाहन त्या करीत होत्या, अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि देशांतरीत कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला.


1907 मध्ये स्टुड गार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तेने सर्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली.


8 मार्च 1908 रोजी न्यूऑर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्री कामगारांनी रूट गर्ल्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष, सर्व प्रौढ स्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी ही जोरकसपणे केली. 


अमेरिकन कामगार स्त्रियांचे या व्यापक कृतीने लारा झेड या अतिशय प्रभावीत झाली. 1910 मध्ये कोपन हेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लारा यांनी मांडला तो पास झाला. यानंतर युरोप अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये व 1919 साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.


भारतात मुंबई येथे पहिले पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साज साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केल. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. 


स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांची स्वरूप बदलत गेले. तशा स्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता सर्वत्र 8 मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.


1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरवले १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा यासाठी आवाहन केले. काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात. तसेच आनंद साजरा करतात.

नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने