जागतिक मुद्रण दिन मराठी निबंध.
जागतिक मुद्रण दिन हा एक मुद्रण कलेचा संदर्भातील महत्वाचा दिन आहे, जागतिक मुद्रण दिन म्हणजे काय? जागतिक मुद्रण दिन का साजरा केला जातो. याविषयी संविस्तर माहिती या पोस्ट मधून आपण घेणार आहोत.
![]() |
जागतिक मुद्रण दिन |
दरवर्षी 24 फेब्रुवारी म्हणजेच जोहान्स गटेनबर्ग Johannes Gutenberg यांचा जन्मदिवस हा जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो. जोहान्स गटेनबर्ग हा एक जर्मन लोहव्यवसायिक, सुवर्णकार, मुद्रक आणि प्रकाशक होता. त्यानेच जगाला आधुनिक मुद्रण कलेची देणगी दिली. त्याच्या फिरते यांत्रिक छपाई मानकामुळे मुद्रण क्रांती घडून येऊ शकली, जी आधुनिक कालखंडाचे एक महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे. जोहान्स गटेनबर्ग यांनी लिहिलेले गटेनबर्ग बायबल हे जगातील पहिले छापील पुस्तक मानले जाते.
Join : Whats App Channel
मुद्रण कलेचा शोध:
जर्मनीतील जोहान्स गटेनबर्ग या व्यक्तीने सण 1455 मध्ये मुद्रण कलेचा शोध लावला. त्यांनी छापलेले 42 ओळीचे लॅटिन बायबल पहिलं छापील पुस्तक होय. त्या स्मरणार्थ 24 फेब्रुवारी हा जोहान्स गटेनबर्ग यांचा जन्मदिवस दरवर्षी जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो.
मुद्रण कलेचा शोध हा मानवी जीवनातील क्रांतिकारी शोध असून या शोधामुळे ज्ञान प्रसाराला गती मिळाली. साहित्य प्रकाशाला वेग आला, नियतकालिके निघाली, वृत्तपत्रे सुरु झाली, वृत्तपत्रे, लोकशिक्षण, सामाजिक व राजकीय प्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. लाकडाच्या अक्षराचे ठसे शिळा प्रेस, शिशाच्या अक्षराचे खिळे, स्क्रीन प्रिंटिंग, सायक्लोस्टाईल अशी प्रगती करत मुद्रण कला डिजिटल प्रिंटिंग विकासाच्या उच्च अवस्थेला पोहोचली आहे.
मानवाने मध्ययुगातून आधुनिक युगात प्रगती साधली आहे. सर्व छपाईच्या कलेमुळे असे घडले. याचे सर्व श्रेय छपाई केलेचा संशोधक जोहान्स गटेनबर्ग ला जाते. भारतामध्ये मुद्रण कला 1556 साली सुरू झाली. पोर्तुगाल मधून जहाजावरून छपाई यंत्र प्रथम गोव्यात आले. भारतीयांना धर्मांतरासाठी उद्युक्त करण्यासाठी धर्मप्रसार करण्यासाठी बायबलच्या प्रति छापण्याकरता हे छपाई यंत्र भारतात आणलं. तंत्राचा प्रसार गोव्यातून भारताच्या इतर भागांमध्ये झाला कोचीन पुडीकाईल,अंबेलकडू, त्रांकेबार यासारख्या किनारी प्रदेशांमध्ये छापखाने सुरू झाले.
महाराष्ट्रामध्ये 1882 मध्ये मुद्रणास सुरुवात झाली. यावर्षी अमेरिकन मिशन ने मुंबई येथे मुद्रानालय सुरू केले. श्रीरामपूर येथून देवनागरी लिपीचे काही खेळही आणले गेले. 1917 साली महाराष्ट्रात छापलेले पहिले पुस्तक उपलब्ध झाले आहे. या मुद्रणालयात नोकरीस असलेले टॉमस ग्रहन हे मातृका तयार करण्यास शिकले. टॉमस ग्रहन देवनागरी आणि गुजराती लिप्यांचे साचे बनवून त्यांच्या मातृका तयार केल्या. अमेरिकन मिशनचे गणपत कृष्णाजी पाटील हे टॉमस ग्रहन यांच्याकडून मातृका करणे शिकले.
इ.स.1827 मध्ये त्यांनी स्वतःचे मुद्रणालय सुरू केले. पाटील यांनी चून खडकावरून समपृष्ठ छापाई केली. त्यांनी यंत्र तयार करून पंचांगाची छपाई केली. तसेच त्यांनी अक्षर मुद्रणालय ही सुरू केले. इ.स. 1931 च्या खेरीस मोनोटाइप यंत्रावर देवनागरी लिपीची जुळणी शक्य झाली.
Join : Whats App Channel