गजानन महाराज मराठी माहिती.
गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर संत होते. गजानन महाराज यांच्यामुळे शेगाव हे एक मोठे तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आलेले आहे. शेगाव हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असून ते संत गजानन महाराज यांचे तीर्थक्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. गजानन महाराज हे दत्त सांप्रदायाचे असून जगभरातून त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोक शेगाव येथे दाखल होतात.
![]() |
गजानन महाराज |
गजानन महाराज यांच्या जन्माविषयी अचूक माहिती नाही, परंतु त्यांचे 30 व्या वर्षी ते प्रकट झाले असे सांगितले जाते.1878 मध्ये फेब्रुवारीच्या 23 तारखेला ते प्रथम दिसले असे सांगतात. त्यांचे भक्त हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा करतात.
गजानन महाराज यांचे कार्य व प्रकट दिन:
भक्तीमार्गाने देवापर्यंत सहज पोहचता येते असे ते सांगत असत. गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी "श्रीगजानन विजय" ग्रंथामध्ये लिहिले आहे. गजानन महाराज प्राकट दिनाच्या दिवशी शेगाव येथे यात्रा भरते. अनेक भक्त या ठिकाणी गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जातात.
लोकांना भक्तिमार्ग दाखवण्यासाठी त्यांचे योगदान खूप मोठे होते. तसेच महाराजांनी भक्तिमार्ग,कर्ममार्ग,योगमार्ग यांचा संदेश जनतेला दिला. हे तीन मार्ग जीवाला ज्ञान प्राप्त करून देतात असा संदेश दिला.
गजानन महाराज हे ब्रम्हचारी आणि संन्याशी होते. ते दिगंबर अवस्थेत असत. त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमंती केली लोकांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी चांगली शिकवण दिली.
गजानन महाराज यांनी भ्रमंती केली त्यात कोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्या मध्ये वस्र्हीन ,ऊन,वारा,पाऊस, यांची चिंता न करता फिरत राहिले लोकांना भक्तिमार्गाचे ज्ञान देत राहिले.
गजानन महाराज यांचे भजन:
जय गजानन श्री गजानन
माऊली आमचे श्री गजानन
जय गजानन श्री गजानन
सद्गुरू आमचे श्री गजानन
जय गजानन श्री गजानन
जय गजानन श्री गजानन
नेती उद्धरून श्री गजानन
जय गजानन श्री गजानन
परब्रम्हा पूर्ण श्री गजानन
जय गजानन श्री गजानन
श्री गजानन जय गजानन.
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.