मकर संक्रांती: भोगी Bhogi सणाचे महत्व आणि वैशिष्ट्ये.
![]() |
Makar Sankranti: Bhogi |
Bhogi हा मकर संक्रांती च्या अगोदर एक दिवस दिवशी साजरा केला जातो, हा चार दिवसांचा उत्सव असतो. जो सूर्याचे मकर (मकर) राशीत संक्रमण झाल्यावर सुरु होतो. मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात म्हणजे दरवर्षी 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी ला साजरा करण्यात येतो.
Bhogi हा प्रामुख्याने शेतकरी वर्गाचा सण आहे. कारण शेतातील पिके कापणीला आलेले असतात,सुगीचे दिवस असतात. कापणीच्या हंगामाच्या शेवटी साजरा करण्याचा आणि पाऊस आणि प्रजनन क्षमतेचा देव मानला जाणारा हिंदू देव भगवान इंद्र यांना श्रद्धांजली वाहण्याची ही एक वेळ समजली जाते. Bhogi च्या सणाला थंडी खूप असल्याने लोक आगटी पेटवतात आणि भगवान इंद्राची प्रार्थना करतात.
या सणाला घरेही स्वच्छ करतात आणि जुने कपडे, घरातील वस्तू आणि यापुढे उपयोगी नसलेल्या इतर गोष्टींची विल्हेवाट लावतात. भोगीचा उत्सव हा एक आनंदाचा प्रसंग आहे जो गाणे, नृत्य आणि मेजवानीद्वारे साजरा केला जातो. लोकांनी एकत्र येऊन नवीन वर्षाची सुरुवात साजरी करण्याची आणि त्यांना मिळालेल्या आशीर्वादाबद्दल आभार मानण्याची ही Bhogi सन आहे.
Makar Sankranti: Bhogi Festival 2023 महाराष्ट्रात कसा साजरा करतात.
महाराष्ट्रात Bhogi सणाला विशेष महत्व असून Bhogi सन हा मकर संक्रांतीच्या अगोदर एक दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रात भोगी च्या दिवशी सर्व घरात भोगीची भाजी बनवली जाते,त्यासोबत बाजरी ची भाकरी बनवून खाली जातो.
Bhogi च्या दिवशी सकाळी उठून सर्व परिवारातील सदस्य स्नान करतात, शक्यतो हा सन महिलांसाठी विशेष महत्वाचा आहे. कारण दुसर्या दिवशी संक्रांत असल्याने संक्रांत हा सन महाराष्ट्रात महिला चा सन म्हणून ओळखला जातो. कारण या सणाला हळदी कुंकू चा कार्यक्रमाचे सर्वत्र आयोजन केले जातो.
Bhogi च्या सणाच्या दिवशी सर्व भाज्यांची एकत्रित काप घेऊन भोगीची भाजी बनवली जाते तिला या दिवशी विशेष महत्व आहे. या भाजीत तीळ, गाजर,वाटाणा, डिंगरी, वांगे, बोरे,रानातील रानभाज्या यांचा वापर केला जातो. भाकरीला तीळ लाऊन या भाजीसोबत खातात.