14 जानेवारी: डॉ.सी.डी. देशपांडे जन्मदिन,भूगोल दिन.
![]() |
भूगोल दिन |
डॉ.सी.डी. देशपांडे यांच्या स्मरणार्थ 14 जानेवारी या दिवशी जन्मदिन म्हणून भूगोल दिन साजरा केला जातो. डॉ.सी.डी. देशपांडे हे एक शिक्षक, शिक्षणतज्ञ , लेखक, व भूगोल तज्ञ होते. त्यांचा जन्म 14 जानेवारी 1912 रोजी महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव चंद्रशेखर धुंडिराज देशपांडे असे होते. त्यांनी भूगोल या विषयाला शास्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत.
मुंबई विद्यापीठात स्वतंत्र भूगोल विभागाची स्थापना करण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले.त्यांच्या प्रयत्नांनीच "National Association of Geographers India" ची स्थापना झाली. त्यामुळे या भूगोल महर्षीच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी 14 जानेवारी भूगोल दिन साजरा करण्याचे अगत्याचे ठरते.
14 जानेवारी भूगोल दिनाचे महत्व:
भूगोल दिन या सोबत 14 जानेवारीला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.यात सूर्याच्या उर्जेचे संक्रमण होते. त्यामुळे ऋतूमध्ये बदल होण्याचा हा दिवस असतो.या दिवशी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते.भूगोलिक प्रदर्शन ,सहल, भौगोलिक साहित्याचे प्रकाशन केले जाते.
भूगोल तज्ञ यांचे व्याख्याने आयोजित केले जातात. भूगोल हि विज्ञान शाखेची जननी समजली जाते. 18 व्या आणि 19 व्या शतकात अनेक भौगोलिक संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत.
भारतात भूगोलाची एक शाखा खागोलशास्र निर्माण करण्यात आलेले आहे. भूगोल दिनाच्या निमित्ताने भूगोल विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि महत्व समजावे यासाठी या दिनाचे खूप महत्व आहे. त्यामुळे भूगोलाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन निर्माण होतो.