YouTube App Update 2022 in Marathi.

YouTube मध्ये नवीन Updates काय आहेत?

YouTube मध्ये सतत नवीन नवीन Update येत असतात.आता नवीन आलेले या अपडेट विषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया.


YouTube update
YouTube


YouTube Pinch to Zoom.

YouTube मध्ये आता आपण फोटो झूम करतो त्याचप्रमाणे Video सुद्धा Zoom करून पाहू शकता. यात आपण जवळजवळ 8x झुम करू शकता आणि Video मधील ठराविक भाग मोठा करून सुद्धा पाहता येऊ शकतो. हा पर्याय YouTube APP मध्ये फुलस्क्रीन Video पाहत असताना वापरता येईल.


YouTube Rounded Thumbnails & buttons.

YouTube वरील सर्व Thumbnel व Buttens आता बाजूने गोलाकार असतील. आता हा डिझाईन ट्रेंड झाला असून राऊंडेड कॉर्नरमुळे पाहताना डोळ्यांना कमी त्रास होतो किंवा तो कंटेंट पाहणं सोपं होतं आणि त्यांना मॉडर्न लुक सुद्धा मिळतो.


YouTube Subscribe button updates.

YouTube मध्ये Suscribe Buttens ला नवे रूप देण्यात आलं असून पूर्वीच्या फक्त लाल रंगात उपलब्ध असलेल्या बटनऐवजी नव्या डिझाईननुसार खास आकर्षक रंग देण्यात आला आहे.


YouTube Darker Dark theme.

डार्क थीममध्ये आता आणखी डार्क मोड उपलब्ध करून देण्यात आला असून, यामुळे Video पाहत असताना आपल्या फोनची बॅटरी सुद्ध काही प्रमाणात वाचेल.


YouTube Playlist design updates.

यूट्यूबवर आता नेहमीच्या व्हिडिओसाठी आणि शॉर्ट्स व लाईव्हसाठी स्वतंत्र Tab Option देण्यात आला असून, यामुळे चॅनल पाहत असताना होणारी सरमिसळ थांबेल. Videos टॅबवर जास्त लांबीचे व्हिडिओ Shorts टॅबवर कमी लांबीचे उभे व्हिडिओ आणि Live टॅबमध्ये जुने लाईव्ह केलेले व्हिडिओ दिसतील. हा बदल आपल्याला सर्वाना पाहता येईल.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने