दिवाळी: भाऊबीज सणाची मराठी माहिती.

भाऊबीज: सणाचे महत्व, कशी साजरी करतात.

भारत देश हा विविधतेतून एकता दर्शवणारा देश असून ,भारतात विविध सन साजरे केले जातात. हे सर्व सन एकता,प्रेम,आदर,आणि श्रद्धा याविषयी नवीन गोष्टी शिकवतात. अशाच भाऊबीज हा एक दिवाळीच्या सणातील एक महत्वाचा भाऊ बहिणी च्या प्रेमाचा आणि एकमेकांच्या आदराचा सन आहे.

दिवाळी: भाऊबीज सणाची मराठी माहिती.
भाऊबीज

दिवाळी: भाऊबीज सणाची मराठी माहिती.

Bhaubij sanachi mahiti,भाऊबीज हा सन दिवाळीच्या सणाच्या दिवसात येणार एक भाऊ बहिण यांचा सण आहे. हा सन कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी असतो,दिवाळी सणातील हा दिवस तिसरा किंवा चौथादिवस असतो. या सणाला हिंदीमध्ये भाईदूज असेही म्हणतात.


Join : Whats App Channel


भाऊबीज या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ जातो किंवा बहिण आपल्या माहेरी भावाला भेटायला येते.या दिवशी बहिण भावाला गोडधोड जेवण करते.सायंकाळी चंद्रकोर दिसल्यावर बहिण प्रथम चंद्र्कोरेस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो.


कायस्थ समाजाचे लोक यादिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपल्या बहिणीला तिच्या घरी जाऊन वस्र आणि अलंकार देऊन सत्कार केला होता अशी आख्यायिका सांगितली जाते. म्हणून या दिवसाला यमद्वितीया सेही म्हणतात.


भाऊबीज सणाचे महत्व:

भाऊबीज सणाला बहिण आपल्या भावाला ओवाळून त्याला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी मनोमन प्रार्थना करते. तसेच बहिण भावाच्या मस्तकाला गंधाचा टिळा लाऊन त्याला त्याच्या कार्यात यश मिळो अशी प्रार्थना करते.


भाऊ आपल्या यशाशक्ती प्रमाणे दागिने,कपडे,भेट म्हणून देतो. या दिवशी आपल्या बहिणीच्या हातचे जेवण  करावे असे सांगितले जाते.


जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबाला ओवाळण्याची पद्धत आहे. भाऊबीज हा सन बहिण भाऊ यांच्या आपुलकी,मान,आणि आदर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस समजला जातो.


Join : Whats App Channel


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने