नरकचतुर्दशी म्हणजे काय?
दिवाळीच्या सणातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी होय. या दिवशी अभ्यंगस्नानाला विशेष महत्व असून, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
![]() |
नरकचथूर्दशी आणि अभ्यंगस्नान |
दीपावली: नरकचतुर्दशी आणि अभ्यंगस्नान महत्व:
नरकचतुर्दशी दरवर्षी अश्विनी कृष्णा चतुर्थी चा दिवस होय.नरकचतुर्दशी ही दिवाळीच्या अगोदर म्हणजे धनत्रयोदशी चा दुसरा दिवस होय.
शरद ऋतू चा शेवट आणि हेमंत ऋतूची सुरुवात या दिवशी होते.पुढील येणारे दिवस थंडी म्हणजे हिवाळ्याचे असतात.
नरकचतुर्दशी चे महत्व थोडक्यात.
नरकचतुर्दशी दिवस दिवाळीच्या सनातील महत्वाचा दिवस आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुर नावाच्या राक्षसा च्या त्रासापासून पृथ्वीवरील लोकांना मुक्त केले.
नरकासुर नावाच्या राक्षसा ने सर्व पृथ्वी वर विध्वंस केला होता. त्याच्या त्रासाला सर्व लोक कंटाळून गेले होते अशा वेळी भगवान श्रीकृष्ण यांनी या राक्षसाचा वध केला. म्हणून या दिवसाला नरकचतुर्दशी असे म्हणतात. या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.
अभ्यंगस्नान म्हणजे काय?
अभ्यंगस्नान म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी लवकर उठून अंगाला तेलाने आणि उटणे लावून मालिश करून औक्षण करणे होय.
अभ्यंगस्नान का करतात? नरकचतुर्दशी या दिवशी जो व्यक्ती जो व्यक्ती अभ्यंगस्नान करेल तो निरोगी जीवन आणि काम, क्रोध, पिडा यापासून मुक्त होईल असे सांगितले जाते.
सकाळी अंगणात रांगोळी काढून तेलाचे दिवे लावतात,तसेच संध्याकाळी दिवे लावले जातात.दिवाळीच्या सुरुवातीचे नरकचतुर्दशी आणि अभ्यंगस्नान याला खूप महत्व असून सर्व भारतामध्ये हे सन मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.