Social Media Marketing करण्याचे आर्थिक फायदे.
पैसे कमावण्यासाठी अनेक वेगवेगळ्या संधी नव्याने निर्माण होत असून,या तंत्रज्ञानाच्या जमान्यात सोशल मिडिया मार्केटिंग हि एक पैसे कमवण्यासाठी मोठी संधी आहे.
![]() |
सोशल मीडिया मार्केटिंग |
सोशल मिडिया मार्केटिंग म्हणजे काय?
Social Media Site, Websites, Blogs आणि वेगवेगळे Social Platform च्या मदतीने मार्केटिंग करणे म्हणजेच सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing) होय.
How to make a lot of money doing Social Media Marketing? सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing) हे एक आजच्या काळातील पैसे कमवण्याचे चांगले साधन असून,अनेक लोक सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing) करून पैसे कमवत आहेत.
आपण सर्वजण इंटरनेट आणि सोशल मिडिया चा उपयोग करत आहोत. कारण आता सर्वांकडे जवळजवळ स्मार्टफोन आहे. सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing) मध्ये सोशल मिडीयावर आपले फक्त पेज किंवा प्रोफाईल बनवून पैसे कमावता येत नाहीत तर त्यासाठी आपल्याला अभ्यास आणि आपल्याकडील असणारे कौशल्य यांचा प्रभावी वापर करणे आवश्यक असते.
Social Media Marketing चे प्रसिद्ध Platform:
सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing) साठी अनेक विविध Platform आहेत. आपल्यासाठी योग्य Platform कोणता त्याची निवड खूप महत्वाची असते. आपण काही महत्वाचे आणि जगभरात प्रसिद्ध सोशल मिडिया साईट विषयी माहिती पुढीलप्रमाणे घेऊया.
- Facebook Marketing.
- YouTube Marketing.
- Instagram Marketing.
- Pinterest Marketing.
- Snapchat Marketing.
- Twitter Marketing.
- LinkedIn Marketing.
वेगवेगळ्या कंपन्या आपल्या Products विषयी माहिती आणि प्रचार प्रसार व जाहिरात देण्यासाठी या Platform चा उपयोग करतात. यात आपण आपल्या Profile चा उपयोग करून Social Media Marketing करू शकता.
आपल्याकडील असणारे उत्पादन आपण या सोशल मिडीयावर जाहिरात देऊन ग्राहक वाढवू शकता, लोकांना आकर्षित करू शकता. वरील सर्व प्रसिद्ध Social Media Marketing करण्यासाठी सर्वात प्रसिद्ध Platform आहेत.
Social Media Marketing मध्ये यशस्वी होण्यासाठी:
- योग्य Social Media Site ची निवड करणे.
- तुमच्या बिजनेस साठी कोणता Platform चांगला आहे हे ओळखा.
- तुमची Profile चांगली भरा.
- लोकांचा विश्वास जतन करा.
- Social Media Site Platform वर Active रहा.
- लोकांच्या गरजा ओळखा.
- आपले ओडियन्स च्या संपर्कात राहा.
- आपले कंटेंट युनिक आणि चांगल्या दर्जाचे असू द्या.
- वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे द्या,प्रतिसाद द्या.