व्हिसा।Visa Information In Marathi.

व्हिसा: वापर आणि नियम.

Visa काय आहे,व्हिसा चा वापर कुठे आणि कसा करावा लागतो? याविषयी आपण संविस्तर माहिती या लेखाच्या मदतीने घेणार आहोत.

Visa Information In Marathi
Visa Information In Marathi

व्हिसा एक प्रकराची परवानगी आहे. जी आपल्याला इतर देशात ठराविक देशात राहण्याची व प्रवास करण्याची परवानगी देते. 

VISA Full From: 

“Visitors International Stay Admission.”

आपल्याला व्हिसा मिळवण्यासाठी प्रत्येक देशातील नियम वेगवेगळे असतात. आपल्याला व्हिसा मिळवण्यासाठी सबंधित दूतवासाकडे ऑनलाईन अर्ज करावा लागतो.किंवा काही देशाचा व्हिसा मिळवण्यासाठी काही देशाची परवानगी मिळवावी लागते. 

व्हिसा वेगवेगळ्या कारणासाठी दिला जातो. भारतात व्हिसा जसे पर्यटन करण्यासाठी, व्यवसाय व्हिसा, संक्रमण व्हिसा, तात्पुरता कामगार व्हिसा, विद्यार्थी व्हिसा असे वेगवेगळे कारणासाठी व्हिसा दिला जातो.

व्हिसा देण्याचे काही वेगवेगळे नियम असतात. असे काही देश आहेत कि तेथे जाण्याअगोदर तुमच्याकडे व्हिसा असणे गरजेचे आहे. 

Visa व्हिसाचे काही नियम.

  • काही ठिकाणी त्या देशात गेल्यावर तुम्हाला व्हिसा दिला जातो.
  • काही देशात जाण्यासाठी व्हिसाची गरज पडत नाही.
  • व्हिसा काढण्यासाठी काय आवश्यक असते?
  • व्हिसा काढण्यसाठी आपल्याकडे पासपोर्ट असणे आवश्यक आहे.
  • व्हिसा साठी अर्ज.
  • पासपोर्ट साईज फोटोग्राफ.
  • पुढील प्रवासाचे तिकीट.
  • व्हिसासाठी आवश्यक रक्कमेची पूर्तता केल्याची पावती.
  • काही देशासाठी ठराविक काही गोष्टी व्हिसा मिळवण्यासाठी जोडाव्या लागतात. Travel Health Policy.
  • तुम्ही जेवढ्या कालावधीसाठी दुसऱ्या देशात राहणार आहात,त्या कालावधीसाठी तुमच्या राहण्याच्या ठिकाणाचे पुरावे.
  • तुमच्याकडे पुरेशे पैसे आहेत याचे पुरावे.

व्हिसा आणि पासपोर्ट यातील थोडक्यात फरक:

  • आपण पहिले आपल्याला बाहेर देशात जायचे असेल तर आपल्याला दोन गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे पासपोर्ट आणि दुसरी म्हणजे व्हिसा.
  • पासपोर्ट म्हणजे आपण देशाचे नागरिक आहात आणि तुम्हाला तुमच्या देशाच्या बाहेर जाण्याची परवानगी दिली जाते.
  • Visa म्हणजे आपल्याला ज्या देशात जायचे आहे त्यांची परवानगी घ्यावी लागते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने