नैराश्य Depression म्हणजे काय : कारणे,लक्षणे आणि उपाय.
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या नोकरी ,व्यवसाय,रोजच्या कामात व्यस्थ आहे. यात अनेक किचकट कामे,गुंतागुंत यामध्ये अनेकांना नैराश्य आणि मनवर दडपण येते. अशा वेळी काय करावे असा प्रत्येकाला प्रश्न पडतो,आपल्याला नैराश्य म्हणजे काय याविषयी थोडक्यात माहिती या लेखाच्या माध्यामतून घेणार आहोत.
नैराश्य म्हणजे काय, What is Depression?
नैराश्य या शब्दाला इंग्रजीमध्ये Depression असे म्हणतात.
Depression च्या तीन स्टेप असतात. Mild, Moderate, Saver Depression च्या सुद्धा टेस्ट असतात. ज्यामधून आपल्याला Depression आहे कि नाही हे समजते. Depression हा आजच्या जगातील सर्वत्र आढळणारा मनोविकार आहे.
नैराश्य हा एक मानसिक आजर असून त्याला नैराश्य म्हणतात.
Depression चे प्रमाण इतिहास काळापासून आजपर्यंत सतत वाढत चालले आहे.आपल्या आजूबाजूची ओळखीची उदाहरणे घ्यायची झाली तर जगभरात आज 35 ते 40 कोटी लोक याची शिकार झाले आहेत. हि संख्या दरवर्षी वाढत चालली आहे.
नैराश्यग्रस्थ व्यक्ती असहाय जीवन जगत असते, तिला जीवन नकोशे झालेले असते. तिला कोणत्याही गोष्टीमध्ये रस किंवा आनंद घेता येत नाही.अशा व्यक्तींना तातडीने उपचार करण्याची गरज असते पान आपल्याकडे नैराश्य लवकर लक्षात येत नाही त्यामुळे उपचार लवकर होत नाहीत.
बऱ्याच वेळा त्या व्यक्तीला लक्षात आले कि आपण नैराश्यग्रस्थ आहोत तरी त्या व्यक्तीला लवकर उघडपणे बोलता येत नाही.कारण नैराश्य व्यक्त करण्याची आपल्या समजात रीतच नाही. ते व्यक्त करणे वेडेपणाचे आणि कमीपणाचे समजले जाते.
निराशा आणि नैराश्य यातील फरक.
निराश आणि नैराश्य या वेगवेगळ्या गोष्टी आहेत;म्हणजे मला निराश किंवा उदास वाटते हे शक्यतो तात्पुरते असते.जसे कि आपल्या घरातील सगळे जन गावाला गेले आणि आपण घरी एकटे राहत असलो तर आपल्याला उदास किंवा निराश वाटते,पान परत सगळे आले कि आपण पाहिल्यासारखे होतो.यालाच तात्पुरती आलेली उदासीनता किंवा निराशा असे म्हणू शकतो.परंतु हि उदासीनता जास्त काळ राहिली तर त्याला आपण नैराश्य असे म्हणायला हरकत नाही.
हे सुद्धा वाचा: Browser Cookies म्हणजे काय?
नैराश्य हे जवळची प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेली,आपल्या मनाविरुद्ध सतत काही घटना घडल्या असतील,प्रेमभंग,जवळच्या व्यक्तीचा मृत्यू अशा काही गोष्टीमुळे नैराश्य येत असते,जर एखादी व्यक्ती 6 आठवडे किंवा 6 महिने या कालावधीपेक्षा जास्त दिवस नैराश्यामध्ये असेल तर त्या व्यक्तीला औषोधोपचार किंवा मानसशास्रज्ञ यांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
नैराश्याचे: लक्षणे
दिवसभर हे व्यक्ती त्यांच्या विचारात मग्न असतात,इतर कामात रस दाखवत नाहीत.
नैराश्याची लक्षणे म्हणजे सतत चिंता वाटणे,झोप न लागणे,कधी कधी गरजेपेक्षा जास्त काळ झोपून राहतात.
कायम कटकट किंवा थकवा जाणवत राहणे.एखादी गोष्टीबद्दल कायम अपराधीपणा वाटत राहणे.आपण कोणालाही उपयोगी नाही असे विचार सारखे येणे.
कोणतेही काम करताना उस्ताह न वाटणे,मनात वेगवेगळे वाईट विचार येणे. हे लक्षणे जर जास्त काळ राहिली तर मानसशास्रज्ञ मेजर डिप्रेशन डीसओर्डर म्हणून घोषित करतात.
नैराश्यावरील:उपाययोजना
आपल्याला नैराश्य हा आजार झाला तर खचून जाऊ नये कारण जसे आपल्याला ताप येतो औषधे घेतल्यास किंवा डॉक्टर कडून सल्ला घेतल्यास बरे होतो.त्याप्रमाणे नैराश्यमधून बरे होता येते. परंतु नैराश्य हा जंतूमुळे होणारा विकार नाही. हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
नैराश्य हि एक अवस्था आहे,नैराश्य मधून बाहेर येण्यासाठी औषधे आणि काही आपल्या सभोवताली असणारी परिस्थिती यांचा मेळ घालणे आवश्यक असते.मेंदूत असणार्या काही घटकांच्या कमतरतेमुळे नैराश्य विकार निर्माण होत असतो.म्हणजे मेंदूत असे काही घटक असतात कि ते आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी कारणीभूत असतात.
आपल्या सभोवताली असणारे वातावरण आनंदी आणि आपल्या मनाप्रमाणे असेल,तसेच काही औषधोपचार घेतल्याने नैराश्यग्रस्थ व्यक्ती Depression मधून बाहेर येते.
इतर आजाराविषयी जशी लोक जागृत झाली आहे, तसे नैराश्य Depression बद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे.जागतिक जरोग्य संघटनेने सुद्धा नैराश्य आजाराविषयी चिंता व्यक्त केलेली आहे. नैराश्य Depression हे लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणालाही येऊ शकते.