Good Friday History।गुड फ्रायडे इन्फॉर्मेशन इन मराठी.

Good Friday History Information In Marathi.


नमस्कार,या पोस्ट मध्ये आपण "गुड फ्रायडे (Good Friday) या विषयी माहिती" घेऊया.गुड फ्रायडे (Good Friday) म्हणजे काय,गुड फ्रायडे (Good Friday) साजरा करण्यामागील कारण,गुड फ्रायडे (Good Friday) चे महत्व काय आहे.या सर्व गुड फ्रायडे (Good Friday) याविषयी माहिती या पोस्ट मध्ये घेऊया. 


गुड फ्रायडे इन्फॉर्मेशन इन मराठी
Good Friday

Table Of Content :

Table Of Content (toc)


गुड फ्रायडे (Good Friday) हा ख्रिस्ती धर्मातील महत्वाचा दिवस आहे.ईस्टर च्या आगोदर येणारा शुक्रवार गुड फ्रायडे (Good Friday) हा दिवस साजरा करतात. 


गुड फ्रायडे(Good Friday) या दिवसाला ब्लॅक फ्रायडे,ग्रेट फ्रायडे असेही संबोधले जाते. 

 

गुड फ्रायडे(Good Friday) या दिवसाबाबत अनेक लोकांमध्ये गैरसमज पाहायला मिळतात.अनेक लोकांना हेच माहिती नसते की हा दू:खाचा दिवस आहे.त्यामुळे काही लोक सोशल मीडियावर या दिवसानिमित्त शुभेच्छा देताना दिसून येतात.ख्रिचन धर्मातील समजुतीप्रमाणे याच दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉस वर चढवण्यात आले होते.याची आठवण ठेऊन ख्रिस्ती धर्मात हा दिवस शोक दिवस म्हणून साजरा केला जातो. 


भारतामध्ये गुड फ्रायडे(Good Friday) च्या दिवशी सर्व सरकारी कार्यालये,शाळा,यांना सुट्टी असते.काही ख्रिस्ती पारंपारिक देशात हा दिवस राष्ट्रीय दुखवटा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कोणताही आंददायी कार्यक्रम साजरा केला जात नाही.ख्रिस्ती बांधव चर्च मध्ये जाऊन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. 


🔰Good Friday History काय आहे. 

गुड फ्रायडे का साजरा करतात? तर ख्रिस्ती धर्मानुसार येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र होते.लोकांना ते अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी शिक्षित करत होते. त्यावेळी काही कट्टरपंथी लोकांनी येशू ख्रिस्तांचा विरोध केला. त्या काळच्या रोमन गव्हर्नर कडे येशू ख्रिस्त यांची तक्रार केली.येशू ख्रिस्तांची शिकवण रोमन सत्ताधारकांसाठी धोक्याची ठरत होती.


यहुदी म्हणजे ज्या लोकांनी क्रांती करू नये.आपली सत्ता अबाधित राहावी,यासाठी गव्हर्नर ने येशू ख्रिस्ताला क्रॉस वर लटकवून जीवे मारण्याचा आदेश दिला.रोमन सैनिकांनी येशू ख्रिस्त यांना अतिशय क्रूर पणे मारले.त्यांचे अनुयायी आक्रोश करत होते.क्षमा याचना करत होते. कर्मठ लोक मात्र येशू ची अवेहलना करत होते. 


आपल्या शेवटच्या क्षणी येशू ख्रिस्त यांनी 


"हे परमेश्वरा,हे लोक काय करत आहेत,ते हे जाणत नाहीत,या सगळ्यांना त्यांच्या पापांसाठी क्षमा कर."


असे स्वर्गातल्या परमेश्वराला विनवत आपले प्राण त्यागले असे ख्रिचन बांधव मानतात. त्यामुळे येशूच्या बलिदानाचा हा दिवस गुड फ्रायडे(Good Friday) म्हणून साजरा केला जातो. गुड फ्रायडे(Good Friday) नंतर येणारा दिवस हा ईस्टर संडे हा येशू च परत प्रकटण्याचा दिवस असतो. त्यामुळे ईस्टर संडे हा दिवस ख्रिस्ती बांधव मोठ्या आनंदात साजरा करतात. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने