हनुमान जयंती इंफॉर्मेशन इन मराठी
रामभक्त हनुमान जयंती ही संपूर्ण भारतात साजरी केली जाते.कारण हिंदू धर्मात रामभक्त हनुमान या देवतेला खूप उच्च स्थान असून,हनुमानाची ओळख रामभक्त अशी आहे.श्री प्रभू राम यांचे हनुमान परमभक्त मानले जातात.
![]() |
हनुमान जयंती |
Hanuman Jayanti Information in Marathi.
प्रभू श्री रामाच्या नावाशी भक्त हनुमानाचे नाव आपल्याला वेगवेगळ्या पौराणिक रामायण यामध्ये तसेच विविध पौराणिक कथांमध्ये उल्लेख केलेला आढळून येतो.हिंदू धर्मात अनेक विविध देवता असून त्यांचे वेगवेगळे महत्व आहे.प्रभू श्री राम,लक्ष्मण,सीता हे वनवासात असताना रामभक्त हनुमान यांनी खूप महत्वाची भूमिका पार पडली असे आपण रामायनातून पाहू शकतो.
रामभक्त हनुमान जयंती माहिती मराठी.
चैत्र शुद्ध पौर्णिमाला रामभक्त हनुमान यांचा जन्म अंजनीमातेच्या पोटी झाला म्हणून चैत्र शुद्ध पौर्णिमा या दिवशी
हनुमान जयंती साजरी केली जाते.हनुमानाची विविधनावे आहेत.
बजरंगबली, रामभक्त, पवनपुत्र, पवनसूत, अंजनीपुत्र, केसरी नंदन अशा अनेक नावांनी संबोधले जाते.
हनुमंताला मारुति म्हणण्याची पद्धत फक्त महाराष्ट्रात आहे.रामभक्त हनुमान पूजेसाठी तेल,रुईची फुले व पाने तसेच शेंदूर आवश्यक असतो,रामभक्त हनुमान यांच्यासाठी शनिवारी विशेष पुजा करण्याची पद्धत आहे.कारण हनुमान यांचा अवतार रुद्र अवतार समजला जातो.शनिवारी रामभक्त हनुमान यांची पुजा केली जाते.रामभक्त हनुमान यांचा अवतार हा शनि अवतार आहे,त्यामुळे शनिवारी रामभक्त हनुमानाची पुजा प्रत्येक हनुमान मंदिरात मोठ्या प्रमाणात करतात.
रामभक्त हनुमान यांचा हनुमान चालीसा खूप प्रसिद्ध असून हिंदू धर्मात हनुमान चाळिसा खूप वाचन व पठन केला जातो.हनुमान चालीसा जवळ जवळ सर्वच हनुमान मंदिरात दिसून येतो. रामभक्त हनुमान जन्म यांच्याविषयी पौराणिक कथेत विविध रहस्ये संगीतलेली आहेत,हनुमानाच्या जन्माविषयी विविध मान्यता आहेत.रामभक्त हनुमान यांच्या जन्म स्थळाविषयी नेमकी स्पष्टता दिसून येत नाही. त्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारत याठिकाणी हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी करतात.
वाल्मिकी ऋषि च्या रामायण नुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला.हनुमानाच्या गळ्यातील जाणवे हे ब्राम्हतेजाचे प्रतीक संगितले जाते व हनुमान अवतार हा रुद्रावतार समजला जातो.
रामभक्त हनुमान जन्मकथा.
रामभक्त हनुमान यांची जन्माची जन्मकथा सांगितली जाते,हनुमान जन्मताच त्याने नुकत्याच उगवत्या सूर्याचे दर्शन केले होते त्यावेळी आपण पाहतो नुकताच डोंगराच्या आडून उगवणारा सूर्य आपल्याला लाल गोळ्याप्रमाणे वाटतो. तेव्हा सूर्याला गिळण्यासाठी त्याने उड्डाण केले.अशी दंतकथा सांगितली जाते.त्यातून वायुपुत्र हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जातो.शरीरसौष्ठव कमविण्याची आवड असणार्यांनी हनुमानाची आराधना करावी असे मानले जाते.
हनुमान स्त्रोत व हनुमान चालीसा म्हणणार्या भक्तांना आत्मिक समाधानासाठी प्राप्ती होते असे म्हटले जाते.साडेसाती सुरू असलेल्या व्यक्तीने दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यावे असे सांगितले जाते. हनुमानाला शक्ती स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानण्यात आलेले आहे.
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान।एक मुखाने बोला,बोला जय जय हनुमान हनुमान।
असे हनुमानचे भजन केले जाते.
हनुमान जयंती कशी साजरी करतात.
हनुमान जयंती ही दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमाला येते,त्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ केली जाते.नारळ,फुले,अगरबत्ती,शेंदूर,तेल,फुलांचा हार,भिजवलेली हरभरा डाळ,खरबूज,टरबूज,घेऊन गावातील हनुमान मंदिरात सर्व लोक एकत्र जमतात,सर्वजण हनुमान मंदिरामध्ये एकत्रित भजन करतात.हे भजन पहाटे पासून सकाळी सूर्य उगेपर्यंत सुरू असते.सूर्याचे पहिले किरण पडताच हनुमान जन्माला सुरवात होते.
सर्वच मारूतीचे मंदिरे भक्त मंडळींनी भरून जातात.हनुमानाला फुले वाहतात,अगरबत्ती लावतात,पुजा करतात,त्यानंतर नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करतात.टरबूज,हरभरा भिजलेली डाळ,खरबूज,साखर हे सर्व एकत्र करून त्याचे प्रसाद म्हणून वाटप केली जाते,हनुमान जन्माला या सर्व पदार्थाचा एकत्रित जो प्रसाद केला जातो त्याला "खिरापत" असे म्हणतात.
हनुमान जयंतीला खिरापत कशी बनवतात.
खिरापत ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवतात,खिरापत म्हणजे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणारा पदार्थ असतो त्याला खिरापत असे म्हणतात.खिरापत वेगवेगळ्या खायद्यपदार्थाची एकत्र सरमिसळ असते,खिरापत बनवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थ वापरतात येतात,हनुमान जयंतीला आमच्याकडे खिरापत बनवण्यासाठी नारळ,भिजलेली हरभरा डाळ,साखर,टरबूज,खरबूज,इ पदार्थ एकत्रित करून प्रसाद म्हणून वाटप केला जातो.