Sri Ram Navami Information In Marathi.
राम नवमी ही एप्रिल महिन्यात म्हणजे मराठी पंचांग नुसार चैत्र शुद्ध नवमी ला म्हणजे राम नवमी असे म्हणतात. चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच राम नवमी होय.राम नवमी ही भारतात तसेच परदेशात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
![]() |
रामनवमी |
राम नवमी माहिती मराठी.
रामनवमी कशाला म्हणतात किंवा रामनवमी म्हणजे काय आणि राम नवमी का साजरी करतात तर या सर्व प्रश्नाचे उत्तर म्हणजे ज्या दिवशी या पृथ्वीतलावर श्री प्रभू रामचंद्र यांनी जन्म घेतला,तो दिवस म्हणजे रामनवमी होय.म्हणजे चैत्र शुद्ध नवमी या दिवशी प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला,तो दिवस संपूर्ण भारतभर रामनवमी म्हणून साजरा केला जातो.
ज्यावेळी या पृथ्वीवर अधर्म,अन्याय इत्यादी संकटे निर्माण झाली.तेव्हा तेव्हा देवाने अवतार धारण केले असे सांगितले जाते भगवान श्री विष्णूचा सातवा अवतार म्हणून श्री राम अवतार आहे असे समजले जाते.
प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म कधी आणि कोठे झाला?
राणी कौशल्या आणि राजा दशरथ यांना पुत्र प्राप्ती झाली.दुपारी 12:40 वाजता चैत्र शुद्ध नवमीला पुनर्वसु नक्षत्रावर पाच ग्रह उच्चस्थानी असताना अशा शुभमुहूर्तावर श्रीराम यांचा जन्म आयोध्या येथे झाला.श्री प्रभू रामचंद्र यांची जन्म कथा व जीवन कथा ही भारतीय साहित्याला नेहमी उत्कर्ष देत आलेली आहे.
प्रभु श्री राम यांच्या जीवनावर आधारित रामायण या महाकाव्याची रचना महर्षी वाल्मीकी यांनी केली,रामायण आपल्या सांगते की एक पती म्हणून,पत्नी म्हणून,आई म्हणून,सासू,भाऊ,मुलगा प्रत्येक नात्यातील व्यक्तीने आपले जीवन कसे जगावे? हे या रामायणातून पाहायला मिळते.
प्रभू रामचंद्र यांच्या जीवनाचा जीवनातील ते संकटे आली तरी प्रभू रामचंद्र यांनी हार मानली नाही.प्रभू श्री राम यांनी आपल्या पत्नी सितेसह व लहान भाऊ लक्ष्मण सोबत 12 वर्षे वनवास भोगला.त्यांच्या जीवनात अनेक संकटे आणि दु:ख आले.केवळ भारतातीलच नव्हे तर भारतीय भाषेतच नव्हे तर परदेशातील अनेक भाषांमध्ये रामायणाची भाषांतरे झालेली आहेत.
जगातील प्रत्येक देशाला रामायण आदर्श वाटते.आपल्याला घरातील लहान मंडळींना रामायणाची जाणीव करून द्यावी.रामायण कसे होते.राम व सीता यांचे जीवन कसे होते.याविषयी नक्कीच घरातील लहान व्यक्तींना मुलांना सांगणे आवश्यक आहे.
रामनवमी चा दिवस प्रभू रामाचे नुसते स्वागत करण्याचा दिवस नाहीतर,प्रभु रामचंद्रांच्या गुणाचे स्वागत करण्याचा दिवस आहे.त्यांच्याकडे तजे गुण होते ते आपल्याला अंगी उतरण्याचा हा दिवस आहे.श्रीराम नवमी उत्सव आयोध्या,नाशिक,पंचवटी या तीन ठिकाणी खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
रामनवमी ची पुजा विधी:
राम जन्मोत्सव बऱ्याच ठिकाणी श्री राम मंदिरात सामूहिक तसेच प्रत्येक हिंदूंच्या घरी साजरा करण्यात येतो.राम मंदिराची सजावट करून चैत्र महिन्याच्या सुरुवातीलाच रामनवमी ची तयारी सुरू केले जाते.राम नवमीपर्यंत हा एक प्रकारे उत्सव असतो.या दिवशी राम जन्मोत्सव साजरा केला जातो त्या दिवशी राम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव ला हजारो लोक एकत्र येऊन सामूहिक राम उत्सव साजरा करतात.
तसेच श्रीराम यांची मूर्ती पालखी मधून मिरवणूक काढून प्रभू श्री रामाच्या जयजयकार करत सुंठ व साखरेचा सुंठवडा तयार करून प्रसाद म्हणून सर्वांना वाटप केला जातो,त्यानंतर दुसऱ्या दिवशी दशमी या दिवसणे उत्सवाची महाप्रसादाने सांगता होते. प्रभू श्रीरामाने नामजप केल्याने मनाला आनंद व समाधान वाटते.
गावोगावी असणाऱ्या मंदिरात तसेच घरोघरी रामजन्मोत्सव रामनवमीच्या दिवशी 12:40 वाजता शुभ मुहूर्तावर साजरा केला जातो.श्रीराम यांचा जन्मोत्सव पाळणा बांधून त्यामध्ये प्रभू श्री राम यांची मूर्ती किंवा प्रतिमा पाळण्यात ठेऊन पाळणा गायन केले जाते.श्रीराम जय राम जय जय राम तसेच विविध प्रभू श्री राम चंद्र यांचे नाम जप करत साजरा करण्यात येतो.अनेक राम मंदिरात कीर्तन भजन यांचे आयोजन केले जाते.
रामनवमीच्या दिवशी पूजा श्री प्रभू रामचंद्र यांची प्रतिमेला हार,पुष्प वाहून ,नारळ, नैवेद्य दिला जातो,आंनंदाने सर्वांना प्रसाद वाटप केला जातो,काही स्रीया व पुरुष रामनवमीचा उपवास देखील करतात.उपवास करून रामनवमी उत्सव साजरा करण्यात येतो.रामनवमीच्या दिवशी श्रीराम रक्षा स्रोताचे पठण व मंत्र जप तसेच नामजप करून काही लोक घरीच राम जन्म साजरा करतात.