National Flower Information In Marathi।भारताचे राष्ट्रीय फूल कमळ मराठी माहिती.

नॅशनल फ्लॉवर इन्फॉर्मेशन इन मराठी.

National Flower Information In Marathi।भारताचे राष्ट्रीय फूल कमळ मराठी माहिती
कमळ फुलाची माहिती 

भारताचे राष्ट्रीय फूल कमळ मराठी माहिती.

भारताचे राष्ट्रीय फूल कमळ आहे.कमळ हे अत्यंत सुंदर आणि आकर्षक फुल असून,कमळ हेच चिखल किंवा दलदल असलेल्या भागामध्ये उगवते,कमळ हे अनेक निमुळत्या असलेल्या पानांनी बनलेले असते,कमळास 12 इंच ते 18 इंचापर्यंत देठ असतो.कमळाचे पान हे पाण्यावर तरंगत असते.

कमळामध्ये निळसर,पिवळा,पांढरा असे वेगवेगळ्या रंगाच्या छटा दिसतात.कमळ हे अत्यंत प्राचीन असे फुल आहे.आपल्या देव-देवतांच्या हातात नेहमी कमळाचे फूल दिसते.म्हणजे कमळाचे फूल हे अतिशय प्राचीन समजले जाते. 

कमळाचा उपयोग नवरात्रीमध्ये देवीच्या पूजेसाठी तर फुलदाणी मध्ये होतो.ऑगस्ट महिन्यापासून कमळाची लागवड केली जाते .महाराष्ट्रात भिवंडी,ठाणे,नाशिक,सोलापूर,सांगली या भागांमध्ये या फुलाची उत्पादन घेतले जाते.

कमळाच्या फुलाला राष्ट्रीय फूल म्हणून का ओळखले जाते. 

प्रत्येक देशाची स्वतःची राष्ट्रीय प्रतीक म्हणजेच नॅशनल सिम्बॉल्स असतात.जी जगात या देशाची ओळख मानली जाते.राष्ट्रीय प्रतीक देशातील लोकांमध्ये देशभक्ती आणि देशाप्रती गर्वाची भवना जोपासण्यास मदत करतात. देशाची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी राष्ट्रीय प्रतिकांचा महत्त्वाचा वाटा ठरतो. 

कमळाच्या फुलाचे वैशिष्ट्ये.

  • कमळ हे पाण्यात उगवणारे फुल आहे.
  • कमळाच्या जगात 100 पेक्षा जास्त जाती आढळून येतात.
  • कमळाचे फूल हे प्राचीन पुष्प असून प्राचीन काळामध्ये देव-देवता सुद्धा या फुलाचा वापर करत असत.एवढंच नाहीतर पौराणिक कथांमध्ये सुद्धा कमळाच्या फुलाचे विशेष महत्त्व आणि स्थान दिसून येते. 
  • कमळ हे फुल ब्रह्मा,विष्णू आणि सरस्वती,लक्ष्मी यांचे विशेष मानले जाते आणि हे संपत्तीचे आणि समृद्धीचे देखील प्रतीक मानले जाते.
  • कमळाचे फूल दिसायला अतिशय सुंदर असे फुल असून उंच देठाच्या साह्याने ही फुले पाण्यावर तरंगते जातात आणि त्यांचा स्पर्श दूषित पाण्याला होत नाह.म्हणून ते शुद्धतेचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. कमळ या फुलाला भारताचे राष्ट्रीय फूल म्हणून सन 1950 साली स्वीकारले गेले. 
  • कमळ हे फूल गोड्या आणि उथळ पाण्यामध्ये उगवते ही वनस्पती एक मीटर उंच पानाच्या तळाशी पसरत जातात. कमळाची पाने ही मोठ्या आणि गोलाकार आकाराची असतात,ज्यांचा व्यास 7 ते 90 सेंटिमीटर इतका असतो. कमळाची पाने कधीही ओले होत नाहीत आणि पाण्याचा थेंब त्यावर मोत्यासारखा दिसतो.
  • कमळाची फुले देखील पाण्यावरच उगवतात कमळाची फुले अतिशय सुंदर सुगंधित असतात. कमळाची ही फुलं पांढऱ्याचा,निळ्या,गुलाबी,लाल आणि निळ्या रंगाचे असतात.भारतात मुख्यतः पांढरे आणि गुलाबी रंगाची फुले आढळतात .
  • कमळाच्या मुळा चा वापर खाण्यासाठी केला जातो,ज्यात खूप मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात.त्याचप्रमाणे कमळाच्या फुलाचा आणि बी याचा वापर देखील खाण्यासाठी केला जातो.कमळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर,आयर्न आणि व्हिटॅमिन कमळाच्या मुळांमध्ये फायबरचा समावेश जास्त असल्यामुळे ती खाल्ल्याने पचनशक्ती वाढते.त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती त्याच्या डोळे आणि स्कीन चांगले राहते. 
  • आयुर्वेदिक औषधांमध्ये कमळाच्या फुलाच्या वेगवेगळ्या भागाचा उपयोग केला जातो.कमळाचे फूल वेदना नाशक म्हणून उपयोगी ठरते.हृदयरोग,ब्लड प्रेशर,स्ट्रेस या मध्ये कमळाचा विविध भागांचा वापर केला जातो आणि म्हणूनच कमळाला औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते.
  • कमळाच्या फुलांची मागणी सणांच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असते.त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कमळाच्या फुलाची लागवड सुरुवात केली आहे.कमळाची धार्मिक,औषधी,खाद्य आणि त्याची योग्यता ओळखून त्याला राष्ट्रीय फूल म्हणून स्वीकारले गेले आहे. 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने