कुंदा ची फुले माहिती मराठी.
Kunda Flower Information In Marathi कुंदा ही एक वेलवर्गीय मोगरा जातीची वनस्पती असून,कुंदा ची फुले ही देवाच्या पूजेसाठी,महिलांना गजरा करण्यासाठी तसेच,वेगवेगळ्या कार्यक्रमात सजावटीसाठी खूप उपयोगी पडतात. कुंदाच्या झाडाला गजर्याचे झाड असे सुद्धा म्हणतात,कारण या कुंदाच्या वेलीला दाट फुले येतात.
![]() |
Kunda Flower |
कुंदाच्या फुलांचा उपयोग:
Kunda Flower Information In Marathi कुंदाच्या फुलांचा उपयोग लग्न समारंभात महिलांना डोक्याला किंवा केसात गजरा करून लावण्यासाठी,तसेच देवाच्या पूजेला,सुशोभनासाठी,सौंदर्य प्रसाधनात,केला जातो.कुंदाच्या फुलांचा उपयोग विविध सुगंधी अत्तरे,तेल,औषधी म्हणून उपयोग केला जातो.
तसेच कुंदाची वनस्पतीला वर्षभर फुले येतात ते सदाबहार म्हणून ओळखले जाते,त्यामुळे फुलांचे व्यावसायीक या कुंदाच्या झाडाची लागवड करून त्यापासून फुलांचा व्यवसाय करू शकतात.त्यापासून मिळणारे उत्पन्न देखील खूप असते. गच्चीवर किवा घरासमोर कुंदाची वेल लावली तर वातावरण प्रसन्न वाटते.कुंदाच्या फुलांना खूप सुंदर सुगंध असल्याने मनाला प्रसन्न वाटते.
कुंदाच्या झाडाची लागवड कशी करतात?
- कुंदाच्या रोपाची लागवड करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे ती पुढीलप्रमाणे
- कुंदाच्या झाडाची लागवड फेब्रुवारी ते मार्च मध्ये करावी.
- कुंदाची झाड लावण्यासाठी प्रथम चांगले वाढलेली कुंदाची वेल शोधा.
- त्याठिकाणी त्या कुंदाच्या वेलेला असलेली चांगल्या दर्जाची फांदी कट करून तिचे खालील खालील बाजूचे पाने काढून टाका,शेंड्याची थोडी पाने राहु द्या.
- कुंदाच्या फांदीपासून नवीन रोप तयार करण्यासाठी साधारण दोन ते तीन फुटाची फांदी निवडावी.
- कुंदाची फांदी ही स्वच्छ प्लॅस्टिक बाटलीत पाण्यात ठेवावी,ठेवताना आर्धा भाग पाण्यात आणि आर्धा भाग बाटलीच्या वर राहील अशा प्रकारे ठेवा.
- बाटली सावलीत हवेशीर पंधरा दिवस ठेवा.
- पंधरा दिवसानंतर बाटलीत कुंदाच्या फांदीला मुळया फुटलेल्या दिसतील.
- मग एका कुंडीत चांगल्या दर्जाची माती घेऊन ,तसेच नारळाच्या शेंड्या,कुजलेले खत,कंपोस्ट खत,टाका.
- सर्व माती कुंडीत भरा ,कुंडीला खालच्या बुडाकडे 3 ते 4 छिद्र पाडा.
- कुंदाची मुळे फुटलेली फांदी अलगद कुंडीत लावा आणि माती टाकून सर्व मुळया मातीत जातील अशा पद्धतीने लागवड करून पाणी आणि अधूनमधून खत टाका.
- कुंडी सूर्यप्रकाशात ठेवा आणि तिची देखभाल करा.
- काही दिवसात कुंदाच्या रोपची वाढ होईल,त्याची वाढ व्यवस्थित होण्यासाठी छोट्या काडी चा आधार देऊन ते वेल तुम्ही तुमच्या घरावरील छतावर सुद्धा नेऊ शकता.
आमचा What's App group जॉईन करू शकता: