जाई च्या फुलाची माहिती मराठी
![]() |
जाई मराठी माहिती |
Jai Flower Information In Marathi जाईचे फुल हे सुगंधी फूल म्हणून ओळखले जाते.जाई ही वेलवर्गीय वनस्पती असून जाईच्या फुलांचा उपयोग देव-देवतांच्या पूजेसाठी होतो.जाईचे वेलीचे खोड साधारण मनगटाएवढे होऊ शकते.जाई मांडवावर चांगल्या प्रकारे वाढते व पसरते.
जाई हे संयुक्तपर्णी वनस्पती असून पाच ते सात कर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान तयार होते.जाईची फुले पांढरी शुभ्र रंगाचे असून,नाजूक असतात.जाईच्या फुलाच्या पाकळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात व खालच्या बाजूस निळसर फिकट रंगाच्या असतात.
जाई चे फूल नेहमी सायंकाळी फुलते.जाईच्या फुलाचा सुगंध लांबपर्यंत हवेत दरवळत असतो.हे फुल अल्पायुषी असून हे फूल नाजूक असते. झाडापासून किंवा वेली पासून वेगळे झाल्यास जाई चे फुल लवकर कोमेजून जाते.
जाईच्या फुलाचा किंवा जाई वनस्पतीचा उपयोग .
- Jai Flower Information In Marathi जाई चा उपयोग शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी किंवा तोंडाला लाल चट्टे किंवा तोंड आल्यास जाईचा पाला चावला तर त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
- जाईचा पाला चावला तर आलेले तोंड कमी होते.
- जाईच्या फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात.
- जाईचे वेल हे अंगणात किंवा बगीच्यामध्ये लावले जाते.
- जाईच्या फुलापासून पांढरेशुभ्र गजरे तयार केले जातात.
- जाईच्या फुलांचा उपयोग व सौंदर्यप्रसाधने साठी करतात.
- जाईच्या फुलापासून विशिष्ट प्रक्रिया करून तेल काढले जाते.
- जाईच्या फुलांपासून हार,तुरे तयार करून विक्री करून पैसे मिळवता येतात.
- देव पुजा करताना जाईचे फुले वापरू शकता.
- घरच्या समोर जाईचा वेळ लावला तर घर सुशोभित व त्याच्या फुलांचा सुगंध लांबपर्यंत वातावरण सुगंधित करतो.
- जाईच्या फुलांचा वापर हा वेगवेगळ्या ठिकाणी औषधी व जाईच्या पानांचा वापर देखील आयुर्वेदामध्ये केला गेला आहे.त्यामुळे जायला प्राचीन काळापासून खूप महत्त्व आहे.
जाईच्या झाडाची किंवा जाईच्या वेलीची लागवड कशी करावी.
- जाईच्या झाडाची लागवड करण्यासाठी एक लांब म्हणजेच कमीत कमी सहा ते दहा फुटापर्यंत जाईचा चांगला प्रतीचा वेल कापून घ्यावा.
- कापून घेतलेल्या वेलीच्या बुडाकडील भागाची गोल चुंभळ करून घ्या.
- जाईचा शेंडा तीन ते चार फूट वरती राहील असे वेलची गोल चक्री करा.
- गोल केलेली तुंबळ चांगल्या दर्जाच्या माती मध्ये खड्डा घेऊन गाडून घ्या.
- खड्ड्यात पाणी व शेणखत घाला.
- दहा ते पंधरा दिवसानंतर जाईच्या जमिनीत पुरलेल्या भागाला मुळ्या फुटलेल्या दिसतील व जाईचे झाड रोपलेले दिसते.
- त्यानंतर पुढे जसे जाईला नवीन आगारी (शेंडा)फुटेल.
- आता अधून मधून पाणी घालत राहावे,जाईच्या फुटलेल्या नवीन फांद्यांना आधार देण्यासाठी काठ्या चा आधार द्यावा.
- जाईच्या वेलीची लागवड शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात कळत करावी जेणेकरून जाईचे झाड सहजपणे रोपून येईल.
वरील पोस्ट मध्ये आपण जाईच्या फुलाची मराठी माहिती घेतली,जाईच्या फुलाचा उपयोग,जाईच्या वेलीची लागवड याविषयी माहिती घेतली.