हिमोग्लोबिन (Hemoglobin) म्हणजे काय मराठी माहिती.
![]() |
हिमोग्लोबिन।Hemoglobin |
हीमोग्लोबिन विषयी मराठी माहिती.
Hemoglobin कमी होण्याचे कारणे, हिमोग्लोबिन कमी होण्याचे लक्षणे,शरीराला हिमोग्लोबिन आवश्यक असण्याचे कारणे, Hemoglobin वाढवण्यासाठी काय करावे? या सर्व प्रश्नाची उत्तरे या पोस्ट मधून जाणून घेऊया.
हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने होय. Hemoglobin कमी होणे म्हणजे लोह कमी होणे होय. मानवी शरीरातील लाल रक्तपेशीत हीमोग्लोबिन असते.
Hemoglobin आपल्या शरीराचा एक प्रकारे प्राण आहे. कारण जर Hemoglobin शरीरात कमी झाले तर आजाराला बळी पाडण्याचे प्रमाण जास्त असते,रोगप्रतिकारशक्ति कमी होते.
शरीरातील Hemoglobin कमी होण्याचे कारणे पुढीलप्रमाणे.
- Hemoglobin कमी झाल्यास अनेमिया सारखे लक्षणे दिसतात.
- काही कारणास्तव अधिक प्रमाणात रक्तस्राव झाला तर शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात,त्यामुळे हीमोग्लोबिन कमी होते.
- गरोदरपनात स्रियांच्या शरीरात अनेक बदल होतात, त्यावेळी बाळाची वाढ होत असते अशावेळी शरीरातील ऊर्जा खर्च होते,म्हणून शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते व हीमोग्लोबिन चे शरीरातील प्रमाण कमी होते.
- वारंवार प्रमाणापेक्षा जास्त रक्तदान करणे,यामुळे शरीरातील हीमोग्लोबिन कमी होताना दिसते.
- आहार कसा आहे यावर मानवाचे हीमोग्लोबिन चे प्रमाण अवलंबून असते.
- आहारात लोहयुक्त पदार्थ कमी असणे उदा. पालक,बीट,टोमॅटो,सफरचंद इ.
- Vitamin c अधिक कमी प्रमाणात असेल तर हीमोग्लोबिन कमी प्रमाणात आढळून येते.
शरीरातील Hemoglobin कमी होण्याचे लक्षणे.
हीमोग्लोबिन चे शरीरातील प्रमाण कमी होण्याचे लक्षणे पुढीलप्रमाणे.
- शरीरावरील त्वचा मध्ये बदल दिसून येतो,त्वचेच्या मूल रंगात बदल होतो,त्वचा निस्तेज दिसू लागते.
- शरीरातील ऑक्सीजन कमी होतो. कारण रक्तामार्फत शरीराला ऑक्सीजन पुरवण्याचे काम हीमोग्लोबिन करते.
- हृदयाचे ठोके प्रमाणापेक्षा कमी होणे अथवा जास्त वाढणे.
- हीमोग्लोबिन कमी झाल्यास धाप लागते.
- हीमोग्लोबिन कमी झाल्यास वारंवार डोकेदुखी,थकवा,चक्कर येणे अशा समस्या दिसू लागतात.
- कधी कधी छातीत दुखू लागते.
- हीमोग्लोबिन कमी झाल्यास भूक लागत नाही.भीती वाटते,श्वसन क्रिया व्यवस्थित होत नाही.
Home Remedies to Increase Hemoglobin in Marathi
- रक्तातील Hemoglobin increases करण्यासाठी आपला आहार समतोल आणि चांगल्या दर्जाचा असावा .
- रक्तातील hemoglobin increases साठी आहारात पालक, गूळ, शेंगदाने, पिनट बटर, दूध व दुधाचे पदार्थ वाढवावे.
- सफरचंद खाल्याने सुद्धा शरीरातील रक्तातील हीमोग्लोबिन चे प्रमाण वाढते.
- बीट हे आहारात समावेश केल्याने रक्तातील हीमोग्लोबिन चे प्रमाण वाढते.
- टोमॅटो ,डाळिंब,सुकामेवा,दूध,मध,खजूर,मनुके,नियमित घेतल्याने शरीरातील रक्तातील हीमोग्लोबिन चे प्रमाण स्थिर होण्यास मदत होते.
What is the normal range of Hemoglobin in Marathi?
शरीरातील रक्तातील हीमोग्लोबिन चे प्रमाण हे ग्रॅम।डेसिलिटर मध्ये मोजतात. आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी साधारणपणे सर्वसामान्य शरीरातील रक्तातील मानवी शरीरासाठी Hemoglobin normal range किती असावी?
- नवजात बालके यांच्या रक्तातील Hemoglobin normal range साधारपणे 17 g. ते 22g. प्रती डेसिलीटर इतके असावे.
- लहान बालके यांच्या रक्तातील Hemoglobin normal range साधारपणे 12 g. ते 13 g. प्रती डेसिलीटर असावे.
- प्रौढ पुरुष यांच्या रक्तातील Hemoglobin normal range 13.5 ते 17.5 g. प्रती डेसिलीटर असावे.
- प्रौढ स्रीयांच्या रक्तातील Hemoglobin चे प्रमाण साधारपणेस्रियांसाठी 12.0 ते 15.5 g. प्रती डेसिलीटर इतके असावे.
- शक्यतो सर्व व्यक्तींच्या रक्तातील Hemoglobin चे प्रमाण लिंग,वय यानुसार कमी अधिक प्रमाणात आढळून येत.
- अशा प्रकारे आपण या पोस्ट मध्ये Hemoglobin विषयी माहिती घेतली आहे काही बदल असल्यास आपण संपर्क करू शकता.