Term Insurance म्हणजे काय?
Term Insurance |
Term Insurance चे फायदे:
Term insurance Information In Marathi टर्म इन्शुरन्स हा एक विमा आहे.जो काही कालावधीसाठी कव्हरेज देतो.टर्म इन्शुरन्स जीवन विम्याचा एक प्रकार आहे.टर्म इन्शुरन्स ला मराठीमध्ये मुदत विमा असे म्हणतात.या विम्यात जीवन विम्याचा मूळ उद्देश दडलेला आहे.या विम्यातुन आर्थिक संरक्षण मिळते.
Term Insurance का,कसा, कधी,काढावा?
सध्या च्या काळात आपण पाहत आहोत की माणसाचे जीवन हे खूप व्यस्त आणि धावपळ दगदगीचे झालेले आहे,त्यात कोरोनासारखी महामारी ने थैमान घातले,अनेक संकटे समोर उभी राहत आहेत.त्यामुळे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षितेसाठी आपल्याला विमा खूप महत्वाचा आहे.
Insurance is very important for the financial security of children and family,मी काही एजंट नाही परंतु सांगण्याचा उद्देश हाच आहे की माणसाची सध्या खूप वाईट अवस्था झालेली आहे.
तुमचा परिवार तुमच्यावर अवलंबून असेल तर,तुमचे मासिक अथवा वार्षिक उत्पन्न खूप कमी असेल तर टर्म इन्शुरन्स एक लाइफ इन्शुरन्स पॉलिसी असून,टर्म इन्शुरन्स योजनेत विमाधारकाचा आकस्मित आजाराने,अपघाताने,मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे असणारे कुटुंब यांना आर्थिक संरक्षण मिळण्याची हमी विमा कंपनी देत असते.जेणेकरून विमाधारकच्या कुटुंबाला आर्थिक आणीबाणीला सामोरे जावे लागत नाही.
टर्म इन्शुरन्स हा कुटुंब प्रमुखाला खूप महत्वाचा आहे.जर कुटुंब प्रमुखाला अपघाती दुर्दैवी मृत्यू आल्यास,त्याच्या पाठीमागे असणार्या कुटुंबाला विम्याचे पैसे मिळतात.त्यामुळे जर मुलांचे शिक्षण,मुलांचे आरोग्य,तसेच लग्न,राहण्यासाठी घर इत्यादी विविध गरजा पूर्ण करताना मागे असणार्या कुटुंबाची हाल होणार नाही.
कारण टर्म इन्शुरन्स Term insurance काढायला तुम्ही जितका उशीर कराल तेवढा, तुमचा प्रिमियम वाढत जातो.टर्म इन्शुरन्स करताना तुम्हाला कोणता आजार असेल किंवा कसलेही व्यसन असेल तर तुम्हाला निरोगी किंवा निर्व्यसनी व्यक्ती पेक्षा जास्त प्रीमियम भरावा लागतो.उदाहरण समजा एखाद्या व्यक्तीने तीस वर्षाचा असताना एक करोड रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढला वत्याचा कालावधी साठ वर्षापर्यंत असेल तर दुर्दैवाने वयाच्या चाळीसाव्या वर्षी या व्यक्तीचा मृत्यू झाला.आता त्याच्या परिवाराला टर्म इन्शुरन्स एक करोड रुपये मिळतील.
Term insurance टर्म इन्शुरन्स ही सर्व लाइफ इन्शुरन्स पैकी Cheap policy स्वस्त पॉलिसी आहे. टर्म इन्शुरन्स मध्ये कुठलाही मॅच्युरिटी मिळत नाही.मॅच्युरिटी बेनिफिट जितक्या जास्त कालावधीसाठी तुम्ही टर्म इन्शुरन्स घेता तितक्या कालावधीसाठी तुमचे परिवार सुरक्षित होतो.पण जितक्या जास्त कालावधीसाठी तुम्ही टर्म इन्शुरन्स घेता तेवढे तुमचे वार्षिक प्रिमियम ची किंमत सुद्धा वाढत जाते.
टर्म इन्शुरन्स Term insurance तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या कमीत कमी वीस पट जास्त असावा,म्हणजे समजा तुमचे उत्पन्न वर्षाला एक लाख आहे तर तुमचा टर्म इन्शुरन्स कव्हर कमीत कमी 20 लाखाचा असला पाहिजे आणि समजा तुमचे वार्षिक उत्पन्न दहा लाखापर्यंत आहे तर तुमचा टर्म इन्शुरन्स कव्हर दोन करोड रुपये पर्यंत असला पाहिजे.
टर्म इन्शुरन्स Term insurance प्रीमियम तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकता.जसे की म्हणजे प्रत्येक वर्षाला, प्रत्येक सहा महिन्याला, किंवा प्रत्येक महिन्याला अशाप्रकारे टर्म इन्शुरन्स घेऊ शकता.
टर्म इन्शुरन्स कव्हर म्हणजे तुमच्या नंतर तुमच्या परिवाराला मिळणारी रक्कम होय.
Online Term insurance काढण्यासाठी पॉलिसी बाजार प्लेटफार्म उपलब्ध आहे. पॉलिसी बाजार वर टर्म इन्शुरन्स काढायला सोपे आहे.
Term Insurance मुदतीनंतर लाभ मिळाला नसला तरीही आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना जोखीम कमी करणाऱ्या म्हणून महत्त्वाचा असा हा प्रकार आहे.
तो घेण्याचा निर्णय झाल्यावर या गोष्टीवर जरूर लक्ष द्या इथे एक जरी हप्ता चुकला तरी Term Insurance रद्द होण्याची भीती असते. त्यामुळे हप्ता नेहमीच भरावा लागतो.
Term Insurance घेताना फॉर्म भरा तंबाखू किंवा सिगरेटचे व्यसन असेल तर तसे न चुकता लिहा. आपली माहिती Term Insurance घेताना व्यवस्थित भरली तर त्यामुळे नॉमिनी ला पैसे मिळताना अडचण येणार नाही. स्वतःविषयी खरीखुरी माहिती लिहा.