Demit Account And Trading Account Information In Marathi.

Demat Account म्हणजे काय।Trading Account म्हणजे काय?


Demat Account म्हणजे काय।Trading Account म्हणजे काय
डिमॅट अकाऊंट


या पोस्ट मध्ये Demit Account म्हणजे काय मराठी आणि Trading Account म्हणजे काय तसेच त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत,डिमॅट अकाऊंट वापरणे सुरक्षित आहेत का याची माहिती घेऊया.आपण सर्वात प्रथम आपण डिमॅट अकाऊंट मेअनिंग इन मराठी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया.

 

Demat म्हणजे Dematerializations of shares.

What Is Demat Account Information In Marathi या विषयाची संपूर्ण माहिती या लेखात घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.


डिमॅट अकाउंट ची गरज का असते?


डिमॅट अकाऊंट म्हणजे काय मराठी जेव्हा आपल्याला एखादा शेअर विकत घ्यायचा असतो किंवा विकायचा असतो किंवा आपल्या अकाउंट मध्ये ठेवायचा असेल त्यासाठी Demat Account ची गरज पडते.आपण शेअर मार्केट मध्ये काम करत असाल तर आपल्याला शेअर स्टॉक करून ठेवावे लागत असतात.आपले शेअर सुरक्षित ठेवण्यासाठी डिमॅट अकाउंट ओपन करावे लागते.


जर मी एखादा शेअर विकत घेतला तर तो ट्रेडिंग नंतर दोन दिवसांनी माझ्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होणार असतो आणि मी जेव्हा विकेल तेव्हा डिमॅट अकाउंटमधून नाहीसा होईल,म्हणजे जेव्हा शेअर मार्केट मध्ये शेअर खरेदी विक्री आपण व्यवहार करतो तेव्हा ,ते शेअर्स साठवण्यासाठी डिमॅट अकाउंट वापरले जाते. तसेच ट्रेडिंग अकाउंट मधून आपण खरेदी विक्री करू शकतो.डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट एकमेकांना जोडलेले असतात.


पूर्वी जेव्हा इंटरनेट नव्हते तेव्हा शेअर खरेदी विक्री केले जायचे ते सर्व व्यवहार कागदपत्राद्वारे केले जायचे.त्या पेपर वर किती शेअर घेतले आणि किती तारखेला घेतले सर्व शेअर खरेदी विक्रीच्या नोंदी असायच्या.अलीकडे भारतात शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांची संख्या वाढायला सुरू झाली,तशी तशी ही प्रोसेस आणखीनच कठीण व्हाऊ लागली.परंतु डिमॅट अकाउंट मुळे हे किचकट काम सगळं सोपं झालं.


1996 पासून भारतामध्ये डिमॅट अकाउंट वापरायला सुरुवात झाली.सध्या तुम्हाला भारतामध्ये शेअर्स खरेदी करण्यासाठी आणि शेअर्सची विक्री करायची असेल तर डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे.


ऑनलाइन व्यवहारामुळे आपण क्षणात शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकतो.ज्याप्रमाणे पैसे ठेवायचे असेल तर आपण बँक अकाउंट वापरतो.त्याचप्रमाणे शेअर ठेवायचे असतील तर डिमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे.


थोडक्यात काय? तर ,तुम्ही जे पण शेअर्सची खरेदी-विक्री करता त्याची कुठलीही कागदावर नोंद होत नाही.तर त्याची इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सर्व नोंद Server वर ऑनलाईन स्वरुपात केली जाते.याची कुठही तुम्हाला पावती किंवा कागद दिला जात नाही.


जसे आपण बँकेमध्ये पैसे भरल्यावर आपल्याला पासबुक वरत नोदं करून मिळते.तसेच Demat Account वरील केलल्या व्यवहारची नोंद ऑनलाइन च्या माध्यमातून आपल्या खात्यावर असलेली रक्कम बघू शकतो.यालाच आपण डिमॅट अकाउंट असे म्हणतो.


Demat Account आणि Trading Account मधील फरक.


आपण घेतलेले शेअर्स Demat Account मध्ये स्टॉक होत असतात,तर ट्रेडिंग अकाउंट मधून व्यवहार केले जातात.आपण हे उदा . च्या माध्यमातून समजून घेऊ , समजा तुम्ही एक बॅग घेऊन शॉपिंग करण्यासाठी गेले.तुम्ही तुमचे पैसे देऊन एखादी वस्तू खरेदी केली आणि तुमच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये ठेवली तर तुमची बॅग होईल डिमॅट अकाउंट,आणि तुम्ही स्वत:व्हाल Trading Account शेअर खरेदी-विक्री करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट लागते.आपले बँक अकाउंटला ट्रेडिंग अकाउंट Demat Account लिंक असते, म्हणजेच आपण आपले ट्रेडिंग अकाउंट मधून Demat Account मध्ये ट्रान्सफर केले जातात, हे तीनही अकाउंट एकमेकांना लिंक असतात.  


How to open Demat Account information in Marathi.


Brokerage firm ज्यांच्या द्वारे स्टॉक एक्सचेंज मधून व्यवहार केला जातो,ते एकाच वेळी डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट Open करून देतात.त्यामुळे ते वेगळे काढण्याची प्रश्न नाही.ऑनलाइन डिमॅट अकाउंट ओपन करायचे असेल तर खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते.  


मोबाईल नंबर लिंक असलेले आधार कार्ड आवश्यक असते,म्हणजेच आधार कार्ड स्कॅन केलेला फोटो आवश्यक असतो.   पॅन कार्ड चा स्कॅन केलेला फोटो. स्वतःचा पासपोर्ट साईजचा फोटो .आपल्या स्वतःच्या स्वाक्षरी किंवा सहीचा फोटो स्कॅन केलेले ,सही नसलेला कॅन्सल असलेला चेक .सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट आवश्यक आहे . पूर्वी Demat Account ओपन करण्यासाठी 60 ते 70 पाने असलेला व खूप सह्या असलेला फॉर्म भरावा लागत असे.


या फॉर्ममध्ये जवळजवळ शंभर च्या आसपास सह्या कराव्या लागत होत्या.परंतु आता घरी बसून Demat Account अगदी सहजपणे ओपन करू शकतो.ऑनलाईन Demat Account ओपन करण्यासाठी सध्याच्या काळात Brokerage firm साईट जास्त प्रमाणात वापरण्यात येतात.


भारतातील, Zerodha, Upstox, Angel Broking, Groww साईट सध्या प्रसिद्ध आहे. Demat Account ओपन करण्यासाठी किती खर्च येतो तर Demat Account Open करण्यासाठी तीनशे रुपये व त्याचे सोबत GST खर्च येतो.तसेच Upstox मध्ये मोफत Demat Account Account तयार करू शकता. 


डिमॅट अकाउंट चे फायदे.

  • डिमॅट अकाउंट मधील असलेले शेअर्स कोणी चोरी करू शकत नाही.
  • शेअर साठवून ठेवण्यासाठी टमाटा कोणता फायदा होतो. 
  • डिमॅट खाते शेअर साठवण्यासाठी अतिशय सोपा मार्ग आहे.
  • डिमॅट खाते मधून जगभरातून कोणतेही ठिकाणावरून शेअर खरेदी आणि विक्री करता येतात.
  • एका सेकंदामध्ये शेअरची खरेदी आणि विक्री करता येवू शकते.
  • शेअर खरेदी करताना ट्रांजेक्शन वरती कॉस्ट व स्टॅम्प ड्युटी मध्ये बचत होते.
  • हे वापरने सुरक्षित आहे.तसेच आपल्याला काही गैरव्यवहार आढळून आल्यास आपण सेक्युरिटी एक्सटेंज ऑफ बोर्ड (SEBE) कडे तक्रार करू शकतो. 


डिमॅट अकाउंट चे तोटे.

  • डिमॅट अकाउंट चे वर्षाला चारशे ते पाचशे रुपये चार्ज असतो.
  • आपण आपले शेअर्स कोणाला विकले ते समजत नाही.
  • आपण कोणाकडून शेअर विकत घेतले ते कळत नाही.

सूचना- वरील माहिती प्राथमिक असून तिचा वापर करण्यापूर्वी अधिकृत कार्यालयात खात्री करून मग वापर करावा. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने