What is Nifty All Information In Marathi.

निफ्टी म्हणजे काय?


What is Nifty All Information In Marathi।निफ्टी म्हणजे काय
निफ्टी म्हणजे काय

What is Nifty 50 All Information In Marathi (निफ्टी 50 म्हणजे काय?) Nifty (निफ्टी 50) मधून आपल्याला काय माहिती मिळते?  Nifty (निफ्टी 50) चे फायदे काय आहेत? Nifty (निफ्टी 50)  चे गणित काय आहे? Nifty (निफ्टी 50) मध्ये कोणकोणत्या कंपनी आहेत? याविषयी माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेऊया.अधिक  किंवा सखोल माहिती आपण संबंधित कार्यालयात जाऊन घ्यावी ,ही माहिती प्राथमिक माहिती म्हणून समजून घेऊयात. 


Nifty चा Full From The National Stock exchange Index Fifty असा आहे.

 

Nifty (निफ्टी 50)कशाला म्हणायचे तर, Nifty (निफ्टी 50) हा भारतीय स्टॉक एक्सचेंज चा महत्वपूर्ण इंडेक्स आहे.शेअर च्या किमती मधील तेजी आणि मंदी याची माहिती हा इंडेक्स देतो.


National Stock Exchange(नॅशनल स्टॉक एक्सचेंज)ची स्थापना 1993 मध्ये झाली.भारतातील सर्वात जास्त लोकप्रिय असा स्टॉक एक्सचेंज आहे. खरेदी-विक्री हा भारतात सर्वप्रथम स्टॉक एक्सचेंज समजला जातो. 


Nifty (निफ्टी 50) मधून आपल्याला काय माहिती मिळते?

  • ज्या कंपनीचे शेअर लिस्टेड आहेत त्या कंपन्या कशा काम करत आहे,ते आपल्याला निफ्टी इंडेक्स मुळे समजते.
  • जर कंपनी चांगली कामगिरी करत असेल तर त्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढते आणि शेअर निफ्टी ची किंमत त्यामुळे वाढते.
  • यामधील असलेल्या शेअर किमती कमी होत असतील तर, निफ्टी फिफ्टी चा इंडेक्स Nifty Fifty Index सुद्धा कमी होतो.
  • निफ्टी चा इंडेक्स Nifty Fifty Index  जर वर जात असेल तर बाजारांमध्ये तेजी आहे असे समजले जाते.
  • निफ्टीचा इंटेक्स खाली येत असेल तर माझ्या मध्ये मंदी आहे असे समजले जाते.
  • निफ्टी वर जात असेल तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुरळीत आणि वेगाने चालत आहे असं समजलं. 
  • याउलट कंपन्या कमी कामगिरी करत असतील तर शेअर ची किंमत खाली असेल तर अर्थव्यवस्था वाटचाल खाली येत आहे असे समजले जाते.हे सर्व आपण निफ्टी फिफ्टी इंडेक्स वरून समजू शकतो.


निफ्टी 50 चे फायदे काय आहेत?

  • NSE च्या कामगिरी विषय आपल्याला एका नजरेत माहिती मिळते.
  • शेअर मार्केट मधील Boom and bust तेजी आणि मंदी या विषयी माहिती मिळते.
  • देशाच्या अर्थव्यवस्थेची माहिती मिळते.


निफ्टी 50 चे गणित कसे असते?

  • National Stock exchange नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये दोन हजार पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत,परंतु निफ्टी इंडेक्स मध्ये फक्त पन्नास कंपन्या आहे.त्याचे काय कारणे काय आहे ते पाहू.
  • इंडेक्स मध्ये 50 कंपनीचे शेअर सर्वात जास्त खरेदी विक्री केले जातात.
  • या कंपनीचे Market capitalization हे National Stock exchange च्याएकूण Market capitalization च्या जवळपास पन्नास टक्के पेक्षा जास्त आहे.
  •  या कंपन्या वेगवेगळ्या सेक्टर किंवा इंडस्ट्री मधून निवडले जातात.
  • त्या सेक्टरमधील या सर्वोत्तम कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. 
  • या कंपन्यांना ब्ल्यू चीप कंपन्यासुद्धा म्हणतात.
  • Nifty (निफ्टी 50) मधील कंपन्या कोणाकडून निवडल्या जातात.तर यात सरकारी बँक आणि मोठ मोठ्या अर्थशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने