शेअर बाजार विषयी माहिती मराठी.
शेअर मार्केट।Share Market |
नमस्कार, या पोस्ट च्या माध्यमातून आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये शेअर मार्केट म्हणजे काय,शेअर मार्केट बद्दल मराठी माहिती समजून घेणार आहोत. प्रथम आपण मार्केट म्हणजे काय ते समजून घेऊया.
मार्केट म्हणजे काय?
मार्केटला मराठी शब्द बाजार आहे,जेथे वस्तूंची खरेदी-विक्री होते.
आपण पाहोतो जसे वेगळ्या प्रकारचे मार्केट असतात.जसे की, कपड्यांचे मार्केट, मच्छी मार्केट, भाजीपाला मार्केट, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट वगैरे वगैरे आता तुम्हाला समजले असेल मार्केट म्हणजे काय जेथे वस्तू आपण खरेदी करतो आणि विक्री करतो.
शेअर मार्केट म्हणजे काय?
शेअर मार्केटला मराठीत शेअर बाजार म्हणतात.
शेअर मार्केट मध्ये दोन शब्द येतात. शेअर आणि मार्केट आपण दोन्ही शब्दांचे अर्थ घेऊयात आणि नंतर दोन्ही शब्द एकत्र करून शेअर मार्केट म्हणजे नक्की काय हे बघूया.
शेअर मार्केटसाठी आवश्यक माहिती.
शेअर मार्केटचे सखोल ज्ञान संपादन करणे.
कुठल्याही फुकट मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका.
Investor की Trader बनायचे हे आधी ठरवा.
मित्रांनो शेअर मार्केट मध्ये दोन प्रकारचे लोक काम करतात त्यांना Investor आणि Trader असे म्हणतात.
इन्वेस्टर म्हणजे काय? तर इन्वेस्टर म्हणजे लॉंग टर्म साठी शेअर्स विकत घेणारे.याचा हेतूच हा असतो काही वर्षांनी त्यांना आपल्या गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्स मिळाले पाहिजे.
बँक मध्ये एफडी किंवा दुसर्या कुठल्याही ठिकाणी पैसे गुंतवले ऐवजी शेअर्समध्ये पैसे गुंतवले की त्याचा परतावा बाकीच्या पेक्षा अनेक पटीने चांगला मिळत असतो .रोज रोज ट्रेडिंग करणे शक्य नाही.
दुसऱ्या प्रकारचे लोक असतात, ते म्हणजे Trader हे खूप कमी कालावधीसाठी एक आठवडा किंवा एक दिवसासाठी पैसे गुंतवतात.तुम्ही ट्रेडिंगमध्ये मर्जिन च वापर करून कमी पैशांमध्ये जास्त शेअर घेऊ शकता.पण Investor मध्ये तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतात.
ट्रेडिंग मध्ये मार्जिन चा वापर करून कमी पैशांमध्ये जास्त शेअर घेऊ शकता. पण इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतात.Trader मध्ये रिस्क खूप असते.Investor मध्ये रिस्क कमी असते.
शेअर मार्केट चे किंग वारेन बफेट यांनी सुरुवात Investor म्हणूनच केली होती.सुरुवात नेहमी Investor पासून करावी.ज्यामध्ये आपण Equity Shares पूर्ण पैसे देऊन विकत घेऊ शकतो.आता तुम्हीच ठरवा,तुम्हाला Investor म्हणून काम करायचे आहे का? Trader बनायचे आहे.
झटपट पैसे मिळवण्यासाठी लोक शेअर मार्केटमध्ये येतात , मला लवकर पैसे मिळाले पाहिजे आणि झटपट पैसे मिळवण्याच्या नादात त्यांचे खूप मोठे नुकसान होते.या मध्ये सुद्धा संयम ठेवायची वृत्ती नसेल तर शेअर मार्केट तुमच्यासाठी नाही.
आपल्याला शाळेत असताना वेगळे विषय होते.इतिहास,भूगोल,गणित,तसा शेअर मार्केट सुद्धा एक मोठा विषय आहे.त्याचा चांगला अभ्यास करून मग नफा कमवणे ह्या गोष्टीला संयम लागतो.
मित्रांनो वर सांगितलेल्या गोष्टी तुम्ही अमलात आणले तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकता.आता तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय समजले असेल.
शेअर्स म्हणजे काय?
शेअर्स ला मराठी मध्ये हिस्सा असे म्हणतात.
आता हा हिस्सा नक्की कोणाचा असतो? तर हा हिस्सा असतो,वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांचा,या कंपन्यांना जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा, ते मार्केटमध्ये येतात,आपले काही शेअर्स विकून ते पैसे उचलतात.उदाहरण द्यायचे झाले तर टाटा खूप मोठी कंपनी आहे.आता टाटा ला तिच्या नवीन प्रोजेक्ट साठी एक लाख रुपयाची गरज आहे.
आता टाटा चे मॅनेजर तुमच्याकडे आले आणि म्हणाले की,आम्हाला दोन हजार रुपयांची गरज आहे.आम्हाला दोन हजार रुपये द्या आणि आमचे दोन टक्के शेअर्स घ्या.
तुम्ही सुद्धा सहमती दाखवली आणि दोन हजार रुपये दिले आणि दोन टक्के साठी त्यांच्या नवीन कंपनीचे मालक झाले.आता मित्रांनो येथे तुम्ही जे दोन टक्के विकत घेतले, त्याला म्हणतात शेअर म्हणजे हिस्सा.
आपण शेअर्स आणि मार्केटला एकत्र करूया .शेअर मार्केट ही अशी जागा आहे, जिथे शेअरची खरेदी विक्री केली जाते. तिथे तुमच्यासारखीच लोक येतात ते, वेगळ्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी-विक्री करतात.आता तुमच्याकडे टाटांचे नवीन कंपनीचे दोन टक्के शेअर्स आहे. त्यची किंमत दोन हजार रुपये आहे.
आता टाटांचे नवीन कंपनीने खूप चांगला व्यवसाय केला आणि प्रोजेक्टवर काम केले, ज्यामुळे त्यांना खूप चांगला नफा झाला आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे पहिली याची किंमत एक लाख रुपये होती.आता ती झाली दोन लाख रुपये. म्हणजे तुमच्या दोन हजाराच्या शेअरची किंमत झाली चार हजार रुपये, म्हणजे तुमचे पैसे दुप्पट झाले.
आता तुम्हाला तुमचे शेअर विकायची आहे. मग तुम्ही शेअर मार्केट मध्ये जाता आणि तिथे जाऊन घोषणा करता की माझ्याकडे टाटांचे कंपनीचे चार हजार रुपयांचे शेअर्स आहे.विकत घ्यायचे आहेत का?
तिथे एका व्यक्तीने तुमची ही घोषणा ऐकली आणि त्याने विचार केला की त्यांची ही कंपनी चांगली आहे आणि भविष्यकाळात या शेअरची किंमत नक्की वाढेल. तेव्हा त्या व्यक्तीने तुमच्या कडून ते शेअर चार हजार रुपयांमध्ये विकत घेतले.
आता तुमचा चांगला फायदा झाला. कारण तुम्हाला दोन हजरच्या बदल्यात मिळाले चार हजार रुपये आणि भविष्यकाळात त्या शेअरची किंमत वाढेल किंवा कमी होईल ह्यावरून त्या व्यक्तीचा नफा-तोटा अवलंबून असणार आहे.त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत समजले असेल, की शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट ही अशी जागा आहे. जिथे शेअरची खरेदी विक्री होते.
तुम्ही अजून खोलात जाल तर, शेअर मार्केट मध्ये भरपूर नवीन गोष्टी आहे .शेअर मार्केट बद्दल काहीच माहित नाही. त्यामुळे अनेकजण शेअर मार्केट विषयी अज्ञान आहेत.प्रत्येकाच्या मनात शेअर मार्केट विषयी काहीतरी प्रश्न असतात.
शेअर मार्केट कुठून सुरुवात करू?
- माझ्याकडे पैसे नाहीयेत तर मला शेअर मार्केट शिकायची आहे? काय करू?
- शेअर मार्केट मधून रोज खरच पैसे कमवू शकतो का?
- शेअर मार्केट जुगार आहे का ?
मित्रांनो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत.
शेअर मार्केटमध्ये खरंच पैसे कमवता येतात का? तर त्याचे उत्तर आहे , हो.. तुम्ही शेअर मार्केट मधून पैसे कमवू शकता.माझे अनेक मित्र शेअर मार्केट मधून चांगले पैसे कमवत आहे. खालील काही मुद्याच्या आधारे आपण तुमच्या प्रश्नाचे उत्तरे आहेत का ते पहा.
विचार करा की, आपल्याला वीस हजारांची नोकरी मिळवण्यासाठी पंधरा वर्षे शिक्षण घ्यावे लागते. मग शेअर मार्केटमध्ये काहीही ज्ञान न घेता,आपण कसे पैसे कमवू शकतो?त्यामुळे 90% लोकं त्यांचे शेअर मार्केटमध्ये नुकसान होते.
त्याचे कारण म्हणजे ही लोक कोणतेही ज्ञान न घेता शेअर मार्केट मध्ये पैसे कमवायचा प्रयत्न करतात आणि जेव्हा त्यांच्या तोटा होतो, म्हणजे नुकसान होते तेव्हा सगळ्यांना सांगतात की शेअर मार्केट हे जुगार आहे.
समजून घ्या , शेअर मार्केट हे जुगार त्या लोकांसाठी आहे, ज्यांना कोणतेही ज्ञान न घेता शेअर मार्केट मधून पैसे कमवायचे आहे.
शेअर मार्केट चे जादूगार असणारे वारेन बफेट रोज सहा ते आठ तास वाचन करायचे, ज्ञान संपादन करायची. म्हणून या जगामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक आहे.
त्यामुळे नॉलेज न घेता तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरायचा विचार करत असाल तर तुम्ही स्वतः तुमच्या हाताने नुकसान करायची तयारी करत आहात.
शेअर मार्केट मध्ये सुरुवात कुठून करायची?
सुरुवातीला तुम्ही शेअर मार्केटमध्ये इंडेक्स समजून घ्या.
सेन्सेक्स आणि निफ्टी त्याबद्दल माहिती घ्या.
सेन्सेक्स मध्ये 30 कंपनी असतात,त्याची माहिती घ्या.
Nifty मध्ये 50 कंपनी असतात. त्याची माहिती काढा.
स्टॉप लॉस, टारगेट, लॉन्ग टर्म, शॉर्ट टर्म, डीमैट अकाउंट,गुंतवणूक अकाउंट अशा अनेक विषयांची सखोल माहिती घ्या.
तुम्हाला असे अनेक लोक आढळून येतील आणि सांगतील तुम्ही हे तु शेअर मार्केट विकत घ्या.याबद्दल सल्ला देण्यासाठी तयार असतील.
तिथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ,जर एखाद्याला खरंच चांगले Investment किंवा Trading calls काढता येत असतील तर,तो दुसऱ्यांना सांगण्याऐवजी स्वतः पैसे कमावून श्रीमंत नाही का होणार ?
असल्या लोकांचा उद्देश तुमच्याकडून शेवटी पैसे उकळणे हाच असतो.सुरुवातीला तुम्हाला मोफत कॉल देतात आणि नंतर पैसे काढून घेण्यात पटाईत असतात.त्यामुळे असल्या मोफत आणि निरर्थक मिळणाऱ्या साल्यांना अजिबात बळी पडू नका.
पण तुम्हाला वाटतं एखाद्या व्यक्ती शेअर मार्केटमध्ये अनेक वर्षे आहे एक्स्पर्ट आहे आणि तो चांगले कॉल देऊ शकतो.मग त्याने दिलेले कॉल एक किंवा दोन महिने पेपर ट्रेडिंग Paper trading करून बघा.पेपर ट्रेडिंग चे कॉल्स 80 टक्के च्या वर यशस्वी झाले आहेत.तर ते स्वीकारायला हरकत नाही.
जे लोक शेअर मार्केट मध्ये नवीन आहेत त्यांना Paper Trading करण्याचा सल्ला दिला जातो.पेपर ट्रेडिंग हे एक Mock Trading असते.या ठिकाणी खर्या पैसे ऐवजी काल्पनिक पैसे दिले जातात व शेअर सुद्धा काल्पनिक असतात.
पेपर ट्रेडिंग करण्यासाठी बर्याच वेबसाइट आहेत,तुम्ही याविषयी अधिक माहिती जाणून घ्या आणि मग सुरवात करावी.