डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम: बालपण, जीवनपरिचय, शिक्षण, पुस्तके, कार्य, प्रेरणादायी विचार.


डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम: बालपण, शिक्षण,पुरस्कार, कार्य.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम : भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून ओळख असणारे, तसेच मिसाईल मॅन म्हणून जगामध्ये वेगळीओळख निर्माण करणारे, स्वप्न पूर्ण करण्यासाठी दृढनिश्चय असणारे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम (Information of Dr. APJ Abdul Kalam in Marathi) यांच्याविषयी आपण पुढील काही मुद्द्यांच्या आधारे माहिती घेऊया.


डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे बालपण मराठी माहिती.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम शहरामध्ये, तमिळनाडू राज्यामध्ये, एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे वडील जे जैनुलब्दीन यांचे जास्त शिक्षण झालेले नव्हते. तसेच ते कोणी मोठी व्यक्ती ही नव्हती,परंतु डॉक्टर अब्दुल कलाम यांची आई अशिअम्मा ही डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आदर्श होत्या.अब्दुल कलाम यांना एक छोटी बहिण आणि चार भाऊ होते.



कुटुंबातील सर्वात लहान सदस्य डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम होते. डॉक्टर अब्दुल कलाम हे गरीब कुटुंबात जन्मले होते.डॉक्टर अब्दुल कलाम यांनी लहान वयामध्ये आपले घर खर्च चालवण्यासाठी वर्तमानपत्रे विकली.रामेश्वरम येथील प्रसिद्ध शिवमंदिर या पासून दहा मिनिटाच्या अंतरावर असलेल्या मास्जिद वाली गल्लीत आपल्या वडिलोपार्जित घरात राहत असत. त्यांचे वडील कुटुंब खूप प्रामाणिक होते,वडील कष्टाळू होते.



डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे शिक्षण.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे शिक्षण रामेश्वरम प्राथमिक शाळेमध्ये झाले.त्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी Schwartz High School in Ramanathanpuram मधून पूर्ण केले, त्यानंतर त्यांनी पुढे अभ्यास करण्याचा निर्णय घेऊन व्यावसायिक शिक्षणाच्या संभाव्य त्याची माहिती नव्हती.म्हणून त्यांनी 1950 मध्ये इंटरमीडिएट हे शिक्षण घेण्यासाठी तिरुचिरापल्ली च्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये बी एस सी पूर्ण केली,त्यांना भौतिकशास्त्र या अभ्यासाचा विषयाचा विषयाची आवड नव्हती.



त्यांनी दक्षिण भारतातील तांत्रिक शिक्षणासाठी खास संस्था असलेल्या मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रवेश घेऊन एम आय टी मध्ये उड्डाण संबंधी मशीनचे विविध कार्य करण्यासाठी समजण्यासाठी नमुने म्हणून ठेवलेल्या दोन विमानांची विमानांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.



पहिले वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एरोनॉटिकल इंजिनीअर ला आपला विशेष विषय म्हणून निवडले आणि पदवीनंतर ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड,बेंगलोर येथे गेले.त्या ठिकाणी त्यांनी टिमचे सदस्य म्हणून विमानाच्या इंजिनच्या देखभालीचे काम केले,त्यांनी पिस्टन आणि टर्बाइन इंजिन वर देखील काम केले.



त्यानंतर काही दिवसानंतर अब्दुल कलाम यांनी भारताचे सर्वात महान वैज्ञानिक म्हणून संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण करून दिली.डॉ.अब्दुल कलाम यांना भारतातील सर्वोच्च पद असणारा देशातील पहिला नागरिक म्हणून गौरवण्यात आले.त्यांनी 11 वे भारताचे राष्ट्रपती पद भूषवले होते.ते पहिले असे राष्ट्रपती होते की ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची काही पुस्तके.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी खूप पुस्तके लिहिली आहेत परंतु मी या ठिकाणी काही निवडक पुस्तकांचा उल्लेख करत आहे.

  • अदम्य जिद्द
  • इग्नायटेड माईंड
  • इंडिया माय ड्रीम
  • अग्निपंख
  • उन्नयन फोर सोशल ट्रान्सफॉर्मेशन
  • दीपस्तंभ इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार .

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या 79 व्या जन्मदिवशी संयुक्त राष्ट्रसंघात द्वारे जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला.भारत सरकारने पद्मभूषण तसेच पद्मविभूषण व 1997 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे.तसेच डॉक्टर



अब्दुल कलाम यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले असून त्यासाठी त्यांना भारत सरकारने वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे.


इ1991 मध्ये पद्मभूषण भारत सरकार यांच्याकडून त्यांना देण्यात आला.1990मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला.1997 मध्ये भारतरत्न,1997 मध्ये इंदिरा गांधी पुरस्कार,1998 मध्ये वीर सावरकर पुरस्कार, 2000 मध्ये रामानुजन पुरस्कार,2012 मध्ये डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग,2014 मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स वेगवेगळे पुरस्कार त्यांना भारत सरकारकडून मिळालेले आहेत.



डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य.

डॉ. अब्दुल कलाम यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर,संशोधन आणि विकास संस्था (TRTO) याठिकाणी वैज्ञानिक म्हणून काम केले.त्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये एका छोट्या हेलिकॅप्टर ची डिझाईन तयार केली.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी भूषवलेली पदे म्हणजे त्या ठिकाणी काही काळ नोकरी केल्यानंतर इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च सदस्य काही दिवस राहिले.



1962 मध्ये भारताचे महत्त्वपूर्ण संघटना असलेल्या Indian Space Research Organization सोबत कामकाज केले अग्नि आणि पृथ्वी या मिसाईल ची निर्मिती करणे मागे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती असताना केलेले कार्य हे उल्लेखनीय मानले जाते.



ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते,त्यावेळी डॉक्टर अब्दुल कलाम यांनी भारताचे रक्षा मंत्री यांचे रक्षा सल्लागार म्हणून काम केले होते.डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम यांनी आपल्या जीवनामध्ये अध्यापन,संशोधन,लेखन तसेच सार्वजनिक सेवा इत्यादी कामगिरी मध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.



डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती पद सोडल्यानंतर भारतीय व्यवस्थापन संस्था शिलॉंग ऑफ मॅनेजमेन्ट अहमदाबाद आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथे प्राध्यापक बनले.



डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी विश्वविद्यालय मध्ये एरोस्पेस इंजिनियरिंग चे प्राध्यापक तसेच भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था तिरुवनंतपुरम चे कुलगुरू म्हणून शैक्षणिक आणि संशोधन यासाठी कार्य केले त्याचबरोबर बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि अण्णा विश्वविद्यालय येथे माहिती तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था हैदराबाद येथे शिक्षण देण्याचे काम केले.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार.

"स्वप्न सत्यात उतरण्या अगोदर स्वप्न पाहावे लागतील."

"यशस्वी कथा वाचू नका,त्याने केवळ संदेश मिळतो अभ्यासाच्या कथा वाचा त्यांनी यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात."

"वाईट लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे राहिलेलं कधीही बरं!"

"लहान लक्ष ठेवणे गुन्हा आहे,महान उद्दिष्टे असली पाहिजे."

"सज्जनशीलता ही भविष्यातील यशाची गुरुकिल्ली आहे आणि प्राथमिक शिक्षण ही अशी वेळ आहे जेव्हा शिक्षक त्या स्तरावर मुलांमध्ये सज्जनशीलता आणू शकतात."

"माझ्यासाठी नकारात्मक अनुभव असे काहीही नाहीत. "

"राष्ट्र लोकांपासून बनले आहे आणि त्यांच्या प्रयत्नांनी राष्ट्राला हवे ते मिळवून शकते."

"शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील चौकशीची भावना सर्जनशीलता उद्योजकता आणि नैतिक नेतृत्व निर्माण केले पाहिजे. आणि त्यांचे आदर्श बनले पाहिजे."

"ज्ञान,मेहनत आणि चिकाटी जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही काहीही साध्य करु शकता."

"जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर, अगोदर तुम्ही सूर्यासारखे जळायला शिकले पाहिजे."

"या जगात भीतीला स्थान नाही."

"सामर्थ्य सामर्थ्याचा आदर करते."

"स्वप्ने सत्यात येण्यापूर्वी आपल्याला स्वप्ने पाहिली पाहिजेत."

"समस्या एकच असते पण दृष्टीकोण वेगळा असतो."
 

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे निधन.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे निधन 27 जुलै 2015 रोजी संध्याकाळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग येथे राहण्यायोग्य ग्रह या विषयावर व्याख्याने देत असताना, त्यांच्या हृदयामध्ये तीव्र कळा येऊ लागल्या आणि ते बेशुद्ध पडून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु त्यानंतर दोन दिवसानंतर त्यांचे निधन झाले.



डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यावर रामेश्वर मधील पैतृक या गावांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण योगदान व संपूर्ण जीवन वेगवेगळ्या कार्यामध्ये खर्च करणारे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कार्याला सलाम!



(माहितीमध्ये काही त्रुटि आढळली तर नक्की कमेंट करा आथवा आमच्याशी संपर्क साधा, धन्यवाद.)

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने