Cryptocurrency (क्रिप्टोकरन्सी) समजून घेण्याची सोपी पद्धत.
क्रिप्टोकरन्सी |
What Is Cryptocurrency?
क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे का? आपण या Cryptocurrency मध्ये किती रुपयापासून गुंतवणूक करू शकतो? Cryptocurrency चे फायदे-तोटे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे या पोस्ट मध्ये आपण एकदम सोप्या भाषेत माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Cryptocurrency।क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय तर क्रिप्टो -Crypto म्हणजे गुप्त आणि करन्सी -Currency म्हणजे चलन, म्हणजे गुप्तचलन.
Cryptocurrency।क्रिप्टोकरन्सी डिजिटल चलन आहे.डिजिटल चलन म्हणजे आपण हे चलन फक्त ऑनलाइन वापरू शकतो.
जसे आपण बाजारामध्ये नोटा किंवा नाणी घेऊन वस्तू विकत घेतो,तसे हे चलन नोटा किंवा नाणे मध्ये रुपांतरीत करता येत नाही.सध्या मार्केटमध्ये पाच हजार पेक्षा जास्त Cryptocurrency।क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत. सर्वात पहिली Cryptocurrency।क्रिप्टोकरन्सी ही Bitcoin होती बिटकॉईन सारखेच इतर काही Cryptocurrency।क्रिप्टोकरन्सी आहेत.
आपण जेव्हा मोबाईल वर वेगवेगळे ब्लॉग,Youtube वरील videos पाहत असाल तर आपल्या सुद्धा वाचनात आलेले असेल Bitcoin तसेच Cryptocurrency हे नेमके काय आहे.मलाही माहीत नव्हते म्हणून मी ते समजून घेण्यासाठी प्रयत्न केला.
तर सध्या जगात खूप नवीन नवीन गोष्टी उदयास येऊ लागल्या आहेत.यातीलच एक नवीन म्हणजे तशी जुनीच परंतु पद्धत नवी असे म्हणाला काही हरकत नाही.Cryptocurrency,Bitcoin हे शब्द आपल्याला माहिती करून घेणे आवश्यक झालेले आहे.
कारण ज्याप्रकारे आपण यापूर्वी व्यवहार करण्यासाठी रोख रक्कम वापरत होतो त्याची जागा आता काही देशात Cryptocurrency ,Bitcoin यासारख्या डिजिटल चलन घेऊ लागलेले आपण वाचत असाल,भारतात सुद्धा या वापरला सुरुवात होऊ शकते.फक्त शासनाने याला परवानगी दिली पाहिजे कारण अनेक देशामध्ये डिजिटल चलन वापरले जात आहे.
Cryptocurrency।क्रिप्टोकरन्सी हे एक गुंतवणूक करण्याचे साधन झालेले आहे.Cryptocurrency।क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक केली तर व्याजदर खूप आहेत म्हणजे परतावा खूप जास्त मिळतो.
क्रिप्टोकरन्सी चे प्रकार:
- Ripple
- Ethereum
- Lite coin
- Tether
- Dogecoin इ.
यातील सर्वात जास्त लिकप्रिय असलेली Cryptocurrency मध्ये Bitcoin आहे. Bitcoin चा शोध 2009 नध्ये लागला होता परंतु शोधकर्ता कोण आहे यामध्ये संभ्रम आहे. Bitcoin ला सध्या सुरक्षित आणि वापरायोग्य करण्यासाठी प्रयत्न केला जात आह. Bitcoin ही जगातील सर्वात जुनी Cryptocurrency आहे.
क्रिप्टोकरन्सी समजून घेऊया .
- क्रिप्टोकरन्सी आपण उदाहरणातूनाटुन्न समजून घेऊ.रमेश आणि सुरेश दोन मित्र असतात. आता रमेश 0.02 बिटकॉइन सुरेश ला पाठवतो,आता ही प्रक्रिया Cryptocurrency मध्ये कशी करते ते बघूया.
- जेव्हा आपण पैसे एकमेकांना देतो, तेव्हा काय होते ,आपण आपल्या पाकिटातून पैसे काढून दुसऱ्याला देतो तेव्हा ते दुसऱ्याच्या पाकिटात ते जाते.तसे आपल्याकडे पाकीट असते.
- तसेच येथे Cryptocurrency।क्रिप्टोकरन्सी एकमेकांना देण्यासाठी वॉलेट असते.रमेश वॉलेट मधून 0.02 बिटकॉइन सुरेश वॉलेटमध्ये जातील, अशी वॉलेट हे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असतात.जसे की तुम्ही वापरत असलेल्या कम्प्युटर,लॅपटॉप,पेन ड्राईव्ह,क्लाउड गुगल ड्राईव्ह इत्यादी अनेक ठिकाणी आपण Cryptocurrency।क्रिप्टोकरन्सी चे चलन जमा करू शकतो.
- आता रमेश कडे किती Bitcoin उपलब्ध आहे,सुरेश कडे किती Bitcoin उपलब्ध आहे दोघांची अकाउंट valid आहेत की नाही, ती सर्व कामे जे लोक करतात त्यांना मायनर असे म्हणतात.
- आता जेव्हा रमेश आपले पैसे सुरेश ला Bitcoin च्या स्वरुपात पाठवतो तेव्हा, ट्रांजेक्शन ची कुठेतरी नोंद होत असेल.ज्याला आपण ट्रांजेक्शन हिस्ट्री म्हणतो ,हा व्यवहार Ledger मध्ये नोंदवला जाते,आता ही Transections Crypto format मध्ये असल्यामुळे येथे कोणी फेरफार करू शकत नाही.
- हाच व्यवहार पब्लिक लेजर मध्ये पब्लिक ब्लॉक असतात आणि पब्लिक ब्लॉकमध्ये अनेक प्रत्येक ब्लॉकमध्ये ट्रांजेक्शन असतात.याला आज Blockchain सिस्टीम असे म्हणतात आणि हे Blockchain कम्प्युटरवर असतात.या सर्व प्रक्रियेला म्हणजे व्हॅलिडेशन मेंटेनन्स वगैरे त्याला मायनिंग असे म्हणतात.
- मित्रांनो, मला वाटते तुम्हाला थोडक्यात क्रिप्टो करेंसी कशी काम करते हे समजले असेल,आता cryptocurrency मध्ये गुंतवणूक करण्यासाठी भरपूर पैशाची गरज असेल तर तसे अजिबात नाही.
- तुम्ही शंभर रुपयांपासून सुरुवात करू शकता.Cryptocurrency।क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही Coinswitch Kuber app वापरू शकता.सध्या हे App वापरुन अनेक लोक यात गुंतवणूक करत आहेत.
- Cryptocurrency चा वापर हा भारतातील रुपयांच्या स्वरुपात कागदी नोटा मध्ये,किंवा अमेरिकेच्या डॉलर मध्ये करू शकत नाही कारण Cryptocurrency हे एक electronic चलन आहे. हे एक डिजिटल मालमत्ता असून यावर कोणाचे ही जसे सेंट्रल बँक किंवा इतर संस्थेचे नियंत्रण नसते. हे वापरण्यासाठी अभ्यास असावा लागतो.
क्रिप्टोकरन्सी चे फायदे -तोटे.
- Cryptocurrency डीसेंट्रलाइज म्हणजे केंद्रीकृत आहे. म्हणजे ह्याच्यावर कोणत्याही सरकारचे,देशाचे अथोरिटी चे नियम नाही Blockchain सिस्टिम मुळे ती करन्सी सुरक्षित मानली जाते.आपण जर सोन्यात गुंतवणूक केली तर खूप कमी व्याजदर दिला जातो. परंतु Cryptocurrency मध्ये गुंतवणूक केली तर 65% पेक्षा जास्त व्याजदर मिळू शकते.
- अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी क्रिप्टोकरन्सी चलन म्हणून स्विकार केली आहे.क्रिप्टोकरन्सी डिजिटल आणि गुप्त असल्यामुळे चुकीच्या गोष्टींसाठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो.
- Cryptocurrency मध्ये गुंतवणूक करणे सोपे आहे परंतु तेवढेच धोके सुधा असू शकतात.यात अनुभव खूप मोठा गुरु असतो. या क्रिप्टोकरन्सी चे फायदे आणि तोटे सुद्धा आहे.जसे मी सांगितले कुठल्या सरकारचे नियम नसल्यामुळे तुमच्याकडून काही चूक झाली तर त्याची तक्रार करता येत नाही.
- तुमचा पुढचा प्रश्न असेल आपल्या भारतामध्ये अशी क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आहे का? तर ह्याचे उत्तर आहे हो आपल्या भारतामध्ये त्या Cryptocurrency आपल्या सरकारने मान्यता दिली आहे.सध्या भारतात करन्सी चा वापर करून कोणत्याही वस्तूची खरेदी विक्री ला अजून परवानगी नाही.