राष्ट्रीय विज्ञान दिवस माहिती मराठी।विज्ञान दिन मराठी निबंध.
आ(caps)पण या पोस्ट मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजे काय।राष्ट्रीय विज्ञान दिन का व कसा साजरा करतात,शाळेतील मुलांना राष्ट्रीय विज्ञान दिन मराठी माहिती,राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण,इत्यादि विषयी माहिती हवी असते.म्हणून आपण याच पोस्ट मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे महत्व याविषयी माहिती घेणार आहोत.
राष्ट्रीय विज्ञान दिन |
National Science Day Marathi Information.
आपण या पोस्ट मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजे काय।राष्ट्रीय विज्ञान दिन का व कसा साजरा करतात,शाळेतील मुलांना राष्ट्रीय विज्ञान दिन मराठी माहिती,राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण,इत्यादि विषयी माहिती हवी असते.म्हणून आपण याच पोस्ट मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे महत्व याविषयी माहिती घेणार आहोत.
विज्ञान म्हणजे सुसंघटित विशेष ज्ञान होय.
विज्ञान ला इंग्रजी मध्ये Science असे म्हणतात.विज्ञान विषयाचा अभ्यास करणाऱ्यांना व शोध लावणार्याना वैज्ञानिक असे म्हणतात.विज्ञान विषयाचे वेवगवेगळे भाग पाडतात.अलीकडील काळात विज्ञानाचे प्रमुख चार भागात विभागणी केली आहे.
विज्ञानाचे प्रमुख चार भागात विभागणी.
- भौतिकीय विज्ञान
- जिवाविषयक विज्ञान
- सामाजिक विज्ञान
- गणित आणि तर्कशास्त्र
विज्ञान दिनाचे महत्व.
विज्ञान हे असे साधन आहे की ते प्रत्येक वेळी प्रत्येक सजीवांना जीवन जगताना उपयोगी पडते.विज्ञान हे आपल्या जगण्याचे साधन झालेले आहे.विज्ञानाचे महत्व सर्वांना समजावे यासाठी भारतामध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस "राष्ट्रीय विज्ञान दिन" म्हणून साजरा करतात.
राष्ट्रीय विज्ञान दिन इतिहास किंवा विज्ञान दिन का साजरा केला जातो तर ज्यावेळी वसंतराव गोवारीकर यांच्या मनात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करायची कल्पना मनात आली,त्यावेळी भारतातील डॉ. सी व्ही रामन यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
त्यावेळी विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जो दिवस निवडला जाईल तो डॉक्टर सी व्ही रामन यांच्याशी संबंधित असावा मग काही विचार केल्यानंतर डॉ. सी व्ही रामन यांचा जगप्रसिद्ध निबंध नेचर याला 1930 सली नोबेल पुरस्कार देण्यात आला.ती तारीख म्हणजे 28 फेब्रुवारी ठरली.म्हणून राष्ट्रिय विज्ञान दिन कधी साजरा होतो तर त्याचे उत्तर आहे. 28 फेब्रुवारी राष्ट्रिय विज्ञान दिन साजरा होतो.
राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो .
राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो तर, भारतीयांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन,तसेच विज्ञानविषयक जागृती,आयुष्यात विज्ञान किती महत्वाची भूमिका पार पाडत असते,विज्ञानाचे फायदे,तोटा,विज्ञानाचा वापर,नवीन तंत्रज्ञान,नवीन वैज्ञानिक शोध याविषयी माहिती म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.
राष्ट्रिय विज्ञान दिवस कुठे व कसा साजरा करतात.
राष्ट्रीय विज्ञान दिन हा दिवस भारतात शास्त्रीय,शैक्षणिक,तांत्रिक व वैद्यकीय संशोधन संस्था तसेच शाळा महाविद्यालय वेगवेगळे विद्यापीठे,शैक्षणिक संस्था,शास्त्रज्ञ आणि संशोधक मोठ्याआनंदात साजरा करतात.
या दिवशी विज्ञानविषयक चर्चासत्र ,शाळा ,महविद्यालये या ठिकाणी मोठे विज्ञानविषयक प्रदर्शने,विद्यार्थ्याकडे असणारे नवीन सांधोधन तसेच कल्पना यांना समाजासमोर आणण्यासाठी तसेच वैज्ञानिक,शाश्रज्ञ यांचे स्वागत समारंभ व चर्चा सत्र आयोजित केले जातात.
काही दिवसापूर्वी आपल्या भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.आपल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाच वेळी 104 उपग्रह अंतराळात सोडून नवीन विक्रम जगासमोर आणलेला आहे.खरंतर एकविसावे शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची शतक असे आपण मानतो ते खरोखरच भारताने जगासमोर दाखवून दिली आहे. विज्ञानामुळे आपले जीवनमान उंचावण्यास मदत झाली असून वेगवेगळे कामे आणि शोध हे गतीने होत चाललेले आहेत.
विज्ञानानामुळे झालेले बदल.
विज्ञानामुळे आपल्या जीवनात अनेक बदल झालेले आहेत,विज्ञान दिन विशेष महत्व म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत छोट्या छोट्या गोष्टी मध्ये विज्ञान आहे हे सर्वांच्या लक्षात आले पाहिजे.विज्ञानामुळे अंधश्रद्धा नष्ट होत चाललेले आहेत,विज्ञानामुळे रूढी,परंपरा यामध्ये बदल झालेले आहेत.
विज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आणि नवनवीन प्रयोग व शोध लागल्याने मानव प्रजाती च नाही तर संपूर्ण सजीव सृष्टी ला फायदा झालेला आहे.विज्ञानामुळे मानवी जीवन सुखी झालेले दिसून येत आहे वेगवेगळ्या विज्ञान घटकांमध्ये विभागलेले दिसून येते.
शेती क्षेत्रामध्ये विज्ञानाचा प्रभावी वापर झाल्यामुळे शेतीमध्ये प्रगती दिसून येते तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा विज्ञानाने प्रगती केलेली असून वेगवेगळे प्रयोग आणि संशोधन होताना दिसत आहे.औद्योगिक क्षेत्रांमध्ये विज्ञानाने खूप मोठी प्रगती केली असून अनेक वेगवेगळी मोठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने प्रगती केली आहे.विज्ञानाच्या वापराने सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
आज आपण एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी व या जगाची भ्रमंती तसेच अवकाश भ्रमण सुद्धा विज्ञानामुळे शक्य झाले आहे.विमान,रेल्वे,विविध वाहने,जहाजे,रॉकेट इत्यादी शोध लागल्याने मानवी जीवनात चमत्कार घडवून आणण्यासाठी विज्ञान कारणीभूत आहे.वेगवेगळ्या रोगावर उपचार तसेच मोबाईल आणि इंटरनेट च्या मदतीने अशक्य गोष्टी शक्य केल्या जात आहेत.
आमचा What's App group जॉईन करू शकता:
या सर्व विषयाची माहिती सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.