एस आय पी (SIP): गुंतवणूक, फायदे, तोटे.
एस आय पी (SIP) |
What is SIP all information in Marathi गेल्या काही वर्षात sip investment हा गुंतवणुकीचा मार्ग प्रसिद्ध झाला आहे. Mutual fund सोबत SIP (Systematic Investment Plan) आज घराघरात पोहचली आहे.सिप म्हणजे Mutual Fund नसून ती एक गुंतवणुक करण्याची पद्धत आहे.किंवा SIP हे एक पैसे गुंतवणूक करण्याचे साधन आहे.एस आय पी मध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला भविष्यात नक्कीच चांगला परतावा मिळत असतो.त्यासाठी आपण योग्य सल्लागार चे मार्गदर्शन घेणे फायद्याचे ठरते.
SIP full form
Systematic Investment Plan.
पद्धतशीर गुंतवणूक योजना.
असे म्हणतात.
SIP (Systematic Investment Plan) मध्ये थोडी थोडी गुंतवणूक करून आपण मोठी संपत्ती किंवा योग्य प्रकारे गुंतवणूक करू शकतो.म्हणजे SIP च्या सहाय्याने आपण Mutual Fund मध्ये गुंतवणूक करू शकतो,ज्यांना शेअर मार्केट विषयी आजिबात ज्ञान नाही असे लोक Sip च्या सहाय्याने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकतात,त्यामुळे आपल्याला रोजचा शेअर मार्केट तपासणे आवश्यक नसते.
पूर्वी पोस्टाची आर डी (RD) केली जात असे परंतु आता SIP हे एक गुंतवणूक करण्याचे चांगले पर्याय असून त्यातील फडा जास्त आहे.यामध्ये गुंतवणूक आणि चांगला परतावा असल्याने जोखीम असतेच.
एस आय पी (SIP) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी अगोदर कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या?
एस आय पी मध्ये अनेक चांगले प्रकारचे रिटन्स आपल्याला मिळत असतात.आपण कधीही कोणत्याही क्षणी एसआयपी मध्ये गुंतवणूक करू शकतो का?तर अशी परिस्थिती नाही.त्यासाठी आवश्यक अभ्यास करणे आवश्यक आहे.जेव्हा आपण एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो.त्यावेळी कोणत्या बाबी लक्षात घ्यावा घ्यावे हे महत्त्वाचे असून सर्वप्रथम एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची या मुद्द्याची माहिती घेऊया.
एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची?
आपल्याला भविष्यात घर घ्यायचे असेल?मुलांचे शिक्षण करायचे आहे,गाडी घ्यायची आहे,मोठा व्यवसाय करायचा आहे किंवा इतर काही जीवनात मोठे कामे करायचे असल्यास आपण Sip मध्ये Investment करू शकता.त्यामुळे आपल्या SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची आहे?या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे असणे आवश्यक आहे.त्यानंतरच आपण एसआयपी चा विचार करू शकता.
एस आय पी (SIP) बाबत महत्वाच्या बाबी.
जेव्हा आपण एस आय पी ची निवड करतो त्यावेळी आपल्याकडे Future planning असणे आवश्यक आहे.म्हणजे आपल्याला भविष्यात काय करायचे याचे Future planning करणे गरजेचे असते.त्या अनुषंगाने आपण SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे.कारण इन्व्हेस्टमेंट करताना प्रॉपर प्लॅनिंग जर आपल्या जवळ असेल तर नेमका आपल्याला किती कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे? हे ठरवता येते.
Investment कालावधी ठरवणे आवश्यक असते.किती रक्कम इन्व्हेस्टमेंट करायची आहे? याची देखील स्पष्टता येते. तुम्ही जर सेवानिवृत्त झाले तर एस आय पी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे का?या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे.
तुमचे सध्याचे उत्पन्न किती आहे भविष्यात हे उत्पन्न वाढणार आहे का कमी होणार याचा अंदाज घ्यावा लागतो.तसेच एस आय पी मध्ये गुंतवणूक करण्याअगोदर तुमची जोखीम घेण्याची तयारी किती आहे?हे अभ्यास करणे आवश्यक आहे. सेबी चा अभ्यास असणे आवश्यक आहे,कारण सेबीच्या नियमात सतत छोटे मोठे बदल होत असतात.
एस आय पी (SIP) चे प्रकार किती आणि कोणते?
- Regular SIP
- Top Sub SIP
- Flexible SIP
- Preparatory SIP
- Trigger S.I.P.
- SIP and insurance
- Multi S.I. P
एस आय पी मधील गुंतवणुकीचा कालावधी कसा ठरवावा?
Daily SIP Investment- Daily SIP Investment मध्ये तुम्ही तुमची Fix Amount व Fix time मध्ये गुंतवणूक करू शकता. यात शक्यतो दुकानदार,व्यवसाय करणारे इ.गुंतवणूकदार येतात.
Weekly SIP Investment - Weekly SIP Investment या प्रकारात तुम्ही आठवड्याच्या कालावधी ने Invest करू शकता.
Monthly SIP Investment- Monthly SIP Investment मध्ये काही महिन्याचा कालावधी sip गुंतवणुकीसाठी निवडू शकता.या प्रकारात पगारदार,नोकरदार वर्गातील लोक गुंतवणूक करतात.
Quarterly SIP Investment- Quarterly SIP Investment मध्ये काही Quarterly कालावधीची निवड करू शकता.
Semi annual SIP Investment- यात तुम्ही सहा सहा महिन्याचे टप्पे पडून पैसे गुंतवणूक करू शकता.
Annually SIP Investment- वर्षाला ठराविक रक्कम एस आय पी मध्ये गुंतवणूक करू शकता. यात शेतकरी,बागायतदार गुंतवणूक करू शकतात कारण पिकाचे पैसे जेव्हा येतात तेव्हा गुंतवणूक करणे सोपे पडते.
एस आय पी(SIP) मध्ये गुंतवूकीचे तोटे.
- एस आय पी(SIP) मध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे सुद्धा आहेत.
- एस आय पी(SIP) मध्ये गुंतवणूक करताना प्लॅन चांगला निवडावा.कोणता निवडावा हे आपण तज्ञाचा सल्ला घेऊन करू शकता.
- एस आय पी (SIP) मधील जास्त परतावा देणार्या स्कीम असतात किंवा प्लॅन असतात,याची खात्री करावी अन्यथा तुमची मुद्दल रक्कम सुद्धा धोक्यात येऊ शकते.कारण जास्त परतावा देणार्या स्कीम या जास्त जोखमीच्या असतात.
एस आय पी (SIP) गुंतवणूकचे फायदे.
- एस आय पी (SIP) मध्ये आपण 500 रुपया पासून गुंतवणूक करू शकतो.
- एस आय पी(SIP) मध्ये गुंतवूकीची शिस्त व नियमितता लाभते.
- एस आय पी(SIP) मध्ये दीर्घ कालीन व नियमित गुंतवणूक केल्याने शेअर बाजारातील अस्थिरतेचा आपण फायदा घेऊ शकतो.
- एस आय पी(SIP) मध्ये नियमित गुंतवणूक केल्यास शेअर बाजार जेव्हा महाग असतो तेव्हा आपल्याला Mutual Fund चे कमी यूनिट मिळतात.तसेच बाजार मूल्य जेव्हा बाजार मूल्य तुलनेने कमी असते तेव्हा Mutual Fund चे अधिक Units मिळतात.
- एस आय पी(SIP) एक दिघाकळीन आर्थिक उदिष्ट सध्या करण्याचे चांगले साधन आहे.