पैसे कसे कमवण्याच्या 5 सोपे मार्ग.

पैसे कमवण्याच्या 5 व्यवसाय कल्पना.

5 व्यवसाय कल्पना 

पैसे कसे कमवण्याच्या 5 सोपे मार्ग:

Part Time Business 5 Idea In Marathi नोकरी करता करता कुठला साइड बिझनेस Side business करता येईल,मी तुम्हाला सांगणार आहे.नोकरी करता करता सुद्धा तुम्ही करू शकता.तर एक लक्षात ठेवा मित्रांनो हे 5 साइड बिझनेस करायचे असेल,तर तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल.

तुम्ही नोकरी करता करता करायचे आहे.हे सोपे वाटत असले तरी सुद्धा जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा अनेक आव्हाने येतील.तुम्हाला कदाचित काही गोष्टींचा त्याग करावा लागेल.

पैसे कमवण्यासाठी कधी कधी कधी निर्णय घ्यावे लागतात.प्रामाणिकपणे पैसे कमवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. पैसे कमवन्यासाठी कोणतेही शॉर्ट कट नाहीत कष्ट हाच एक पर्याय असू शकतो. 

1.रेफरल बिजनेस करा.

रेफरल बिजनेस।Referral Business च्या माध्यमातून व्यवसकाला आणि ग्राहकाला दोघामध्ये जोडणारा दुवा बनवून कमी वेळात तुम्ही जास्त पैसे कमवू शकता.एक उदाहरण पाहूया आमच्या सोसायटी मध्ये एक माणूस राहतो.त्याचा मित्र रत्नागिरीमध्ये हापूस आंब्याचा व्यवसाय करतो.या सोसायटीमध्ये अंदाजे 600 च्या वर तरी माणसे असतील त्या माणसाने सोसायटी च्या सगळ्या व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज टाकला.

रत्नागिरीचा हापूस आंबा थेट तुमच्या दारात बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये .तुम्हाला सांगतो या माणसाला पूर्ण आंब्याच्या सीझनमध्ये शेकडो ऑर्डर्स मिळाल्या.या माणसाने काय केले आपल्या रत्नागिरीच्या मित्राकडून आंबे घेऊन आम्हाला विकले आणि मध्ये प्रत्येक डजण मागे पन्नास ते शंभर रुपये कमिशन कमवले असेल असा आमचा अंदाज आहे.

मी स्वतः कॉलेजमध्ये असताना माझा मित्र अशाप्रकारे पैसे कमावले आहे.एक मित्र होता कम्प्युटर असेंबल करणारा तो कम्प्युटर सायन्स ला असल्यामुळे मला अनेक जण कम्प्युटर विकत घ्यायच्या आधी विचारायचे.तो त्या सगळ्यांना हे त्या मित्राकडे पाठवायचं प्रत्येक कम्प्युटर मागे त्याला हजार रुपये कमिशन द्यायचा.

त्यामुळे तुम्ही विचार करा तुमचा कोणी मित्र असेल,तो व्यवसाय करतोय का नसेल तरी तुम्ही कोणत्याही व्यवसायिक का बरोबर ओळख काढू शकता.तुमच्या संपर्कात येणाऱ्या ना रेफर करू शकता.हा व्यवसाय तुम्ही नोकरी करता करता आरामात करू शकता.

2.कन्सल्टेशन.

तुम्ही एखाद्या क्षेत्रांमध्ये एक्सपर्ट असाल,त्या क्षेत्रासाठी तुम्ही कन्सल्टेशन Consultation हा पार्ट टाईम व्यवसाय सुरू करू शकता.

जर तुम्हाला Financial ज्ञान असेल तर गुंतवणूक कशी करायची? याचा सल्ला देऊ शकता.तुम्हाला फिटनेस ची आवड असेल तर त्यासाठी लोकांना सल्ला देऊ शकता.तासिका मार्फत ज्ञान देऊ शकता.तुम्ही Consular बनू शकता.

चांगले पालक कसे बनावे ,रागावर नियंत्रण कसे करावे,Meditation कसे करावे इत्यादी विषयावर Counseling करू शकता. Consultation असा मुद्दा आहे की दिवसातील दोन तास जरी तुम्ही दिले तरी पुरेसे पडतात.

3.तुमचे प्रॉडक्ट ऑनलाईन विका.

आता  तुम्ही तुमच्या वस्तू अमेझॉन, OLX वर विकू शकता.तुम्ही घरी बसून त्या वस्तू बनवल्या असतील किंवा मग तुम्ही असं प्रॉडक्ट शोधा जे फक्त तुमच्या शहरात उपलब्ध आहे.

हे पण देशाच्या अन्य भागात सुद्धा त्याची मागणी आहे किंवा तुम्ही जिथे राहता तिथे होलसेल मार्केट असेल तर त्या ठिकाणाहून सुद्धा तुम्ही प्रॉडक्ट घेऊन ऑनलाईन विकू शकता.पूर्वी वस्तू विकण्यासाठी तुम्हाला दुकानाची गरज लागत होती.पण आता तुम्ही सर्व काही ऑनलाईन विक्री करू शकता.

ॲमेझॉन किंवा कुठली ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईटवर रजिस्टर करण्यासाठी एक प्रोसेस असते ती प्रोसेस पूर्ण करण्याबाबत माहिती तुम्हाला गुगल वर किंवा युट्यूबर सहज मिळेल. 

4.ट्युशन्स घेणे.

पूर्वीपासून चालत आलेला पण आत्ता सुद्धा तेवढाच डिमांडमध्ये असलेला पैसे कमवायचा मार्ग म्हणजे ट्युशन घेणे तुम्ही ट्युशन बद्दल अशा अनेक गोष्टी ऐकली असतील की, सुरुवातीला पार्ट टाईम म्हणून लोकांनी ट्युशन घ्यायला सुरुवात केली आणि नंतर फुल टाईम या व्यवसायामध्ये उतरले.त्यांनी भरपूर पैसे कमावले.तुम्ही कोण कोणते ट्युशन घेऊ शकता.संगीत,गणित ,इंग्लिश,इत्यादी.

तुम्ही 100 पेक्षा जास्त लोकांच्या वस्तीत राहतात.मग तुम्ही ट्युशनला उत्पन्नाचा दुसरा मार्ग बनवू शकतात.दिवसातील फक्त दोन ते तीन तास घेऊन घरातून ट्युशन घेऊन तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.तुम्हाला जो विषय प्रभावी शिकवता येत असेल त्या विषयाच्या तसिका तुम्ही घेऊ शकता. 

5.ऑनलाईन कोर्स बनवून विकणे.

या पुढील जग हे ऑनलाईन चे असणार आहे.पण प्रश्न येतो की तुमचे कौशल्य कशामध्ये आहे? तुम्ही कोणत्या क्षेत्रात एक्सपर्ट आहात तुमचे कौशल्य लोकांची समस्या सोडवत असेल तर तुम्ही ऑनलाईन कोर्स बनवून भरपूर पैसे कमवू शकता. 

मग ते योगा असेल,मायक्रोसोफ्ट एक्सेल,असेल गिटार वाजवणे असेल, प्रोग्रामिंग असेल,डान्स असेल, शेअर मार्केट असेल,डिजिटल मार्केटिंग असेल,काही लोकांची समस्या या आपल्याला ऑनलाईन जसे सोशल मीडिया च वापर करू शकता. तुम्ही ऑनलाईन भेटू शकता.मित्रांनो तुम्ही नोकरी करता करता सुद्धा करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने