महाशिवरात्री इन्फॉर्मेशन इन मराठी.
महाशिवरात्री शिवशंकराची उपासना,पूजेचा सर्वात मोठा दिवस आणि आध्यात्मिक दृष्टीने भारतीय सणांमध्ये हिंदू घरातून साजरा होणारा सर्वात मोठा सण समजला जातो.
महाशिवरात्री |
महाशिवरात्री ची माहिती.
माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात.
शास्त्र वचनानुसार सांगितले जाते की,द्वापर युग आणि कलियुगाच्या समयास रात्र म्हटली जाते.वास्तविक रात्रही अज्ञान पवित्रता पापाचार यांचे प्रतीक मानले जाते.या कालखंडात सारी सृष्टी अज्ञान अंधकार यामध्ये बुडून जाते आणि ती अत्याचार, भ्रष्टाचार यांचे साम्राज्य सृष्टीवर पसरते.
असुरी लक्षणे अपप्रवृत्ती वाढीस लागतात.त्यामुळे मानवी जीवनातील शांती नाहीशी होऊन मनुष्य मन अशांत व दुःखी बनते.याकरता शिवशंकर महाशिवरात्रीच्या वेळी या लोकी अवतरतात. आपल्या भक्तांचे दुःख नाहीसे करतात.असे पुराणात सांगितले जाते आहे.
महाशिवरात्री ची कथा:
शिवपुराणात महाशिवरात्रीच्या उत्पत्तीविषयी कथा प्रचलित आहेत.विंध्य पर्वताच्या घनदाट अरण्यात एक शिकारी शिकार करत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवीत होता.एकदा सारा दिवस भटकून देखील त्याला शिकार मिळाली नाही.तेव्हा रात्र झाल्यावर तो एका झाडावर तळ ठोकून बसला.
त्याच वृक्षाखाली एका शिवलिंग होते.वृक्षा नजीकच एक तलाव होता.बऱ्याच वेळानंतर एक हरीण तलावावर तृष्णा शांत करण्यासाठी आले आणि शिकारीच्या तावडीत सापडले.परंतु मृत्युलोकात जाण्यापूर्वी आपल्या आप्तेष्टांची भेट घेण्याची विनंती हरणाने शिकाऱ्याला केली आणि सूर्योदयापूर्वी परत येण्याचे वचन दिले.
तेव्हा हरणाच्या वचनाचा विश्वास ठेवून शिकाऱ्याने त्याला परवानगी दिली.हरीण परत येईपर्यंत शिकारी रात्रभर वृक्षावर बसून राहिला.त्याच्या प्रतीक्षेत त्यांनी संपूर्ण रात्रभर वृक्षाची पाने तोडून नकळतपणे मुखातून ओम नमः शिवाय मनात वृक्षा खालील शिवलिंगावर टाकत राहिला.तो वृक्ष बेल वृक्ष होता.
सकाळी हरणाला आप्तस्वकीयांच्या भेटी घेऊन परतलेले पाहून शिकाऱ्याची हृदय द्रवले.हरणासारखा प्राण्याचे सत्यवचन पाहून शिकाऱ्याच्या अंतकरणात प्रेम भावना जागृत झाली.दिवसभरातील उपवास,रात्रीचे जागरण तसेच शिकारी कडून बेल पत्रामुळे घडलेल्या सर्व घटना पूजनीय होत्या.हरिण आणि शिकारी यांना शिवलोक प्राप्त झाला.ते सर्वजण तेथेच सुखात राहू लागले.
ही झाली पौराणिक कथा मी नेहमीच आपल्याला सांगत आलो आहे आणि आजही सांगेल की पौराणिक कथामागे एक विशिष्ट विचार दडलेला असतो.ऋषी-मुनींनी पुराणात गोष्टी रंगवून सांगितल्या,त्या सर्वप्रथम माणसांची अध्यात्म गोडी निर्माण व्हावी यासाठी सांगितल्या आहेत.जसे आपण आपल्या लहान मुलांना चांगला बोध घेण्यासाठी ससा कासवाची गोष्ट सांगतो अगदी त्याचप्रमाणे.
मित्रांनो शिवरात्रीच्या कथेविषयी देखील असच आहे.येथे हरिण संभाषण करत असल्याचे आढळते,तसेच तो प्रामाणिक असल्याचे दिसून येते,शिकारीकडून कडून नकळत शिवपूजा घडलेली असते.त्यामध्ये चांगली वृत्ती जागृत होते आणि तो हरणांना मारता त्याच्यासोबत गुण्यागोविंदाने राहू लागतो.आता यामागील ऋषीमुनींना काय सांगायचं आहे ते आपण पाहूया.
मित्रांनो येथे हरीण म्हणजे आपल्यात असलेले विकार आहेत बरेच जण म्हणतात काम क्रोध मद मोह मत्सर यांना मारून टाका पण मित्रांनो यांना मारून टाकण्यासाठी नाही आणि ते योग्य देखील नाही या आपल्या जीवनात काहीतरी महत्व असेल म्हणूनच तर देवाने आपल्याला दिलेली आहे देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट चांगली आहे आणि तिचा एक विशिष्ट उद्देश असतो.
मित्रांनो काम क्रोध मद मोह मत्सर हे मारू नका तर थोडा संयम ठेवा जशी शिकाऱ्याने ते हरणाची वाट पाहिली अगदी तसाच जीवनी सत्यासाठी नाहीतर चव येण्यासाठी आहे आपण उपवास करतो याचा अर्थ सीएम ठेवतो मारून टाकले तर आपले जीवनच निरर्थक होईल आपण भगवंताची काम नाही करू शकलो तर भगवंतापर्यंत देखील पोहोचू शकत नाही.
म्हणूनच मित्रांनो संयमाने योग्य नियोजन करा.एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर तिथे राग यायलाच हवा. वाईट विचारांचा मत्सर करा.जगाच्या उत्पत्तीसाठी संयमित काम करा.म्हणून काम,क्रोध,मद,मोह मत्सर हे सर्व मूल्याचे योग्य नियोजन करा.असं झालं तर नकळत तुमच्याकडून कितीतरी चांगली कामे होतील आणि हे सहा विकार तुमचे गुण बनतील आणि तेव्हा तुम्ही त्या शिकारीच्या गोष्टी मधील हरणा सोबत म्हणजे या सहा गुण सोबत गुण्यागोविंदाने राहू शकाल.
ते हरिण प्रामाणिक व होते म्हणजेच ते सर्व विकार प्रामाणिक आहेत.तुम्ही सांगाल ते तेव्हा चतुर्दशीला शंकराची पूजा करत बेलाची किंवा बेलाची पाने वाहतात.महाशिवरात्री चे महत्व खूप आहे.शरण येणार त्यांना अभय द्यावे. दुसऱ्याचे वाईट चिंतू नये,सत्य आणि प्रामाणिक वागावे चांगले विचार आचारणात आणावे.त्यामुळे सृष्टीतील अपप्रवृत्ती नष्ट होतील.असं झालं तर आपण खऱ्या अर्थाने शिवरात्र साजरी केली असे म्हणता येईल.
महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रथा:
महाशिवरात्री च्या दिवशी घरातील सर्व लहान थोर लवकर उठतात,शंकर म्हणजे शिवाची उपासना ,आरती करतात,महाशिवरात्री च्या दिवशी लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत घरातील सर्वजण उपवास करून शिवाची आराधना करतात,महाशिवरात्रीच्या दिवशी शिवालय म्हणजे भगवान शंकरच्या मंदिरात जाऊन तेथे असणार्या शिवलिंगाचे,महदेवाच्या पिंडीचे दर्शन घेतात,शिवलिंगावर बेलपत्र वाहतात,दूध आणि तूप तसेच गंगेच्या पाण्याने अभिषेक केला जातो,वेगवेगळ्या भगवान शिवशंकराचे मंदिर व शिवलिंग असणार्या ठिकाणी यात्रा भरतात.