ई-श्रमिक कार्ड।e-SHRAM Card कसे काढावे.
e-SHRAM Card |
ई-श्रमिक कार्ड।e-SHRAM Card विषयी सर्व माहिती मराठी.
भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी ई श्रम पोर्टल सुरू करण्यात आलेले असून याद्वारे सर्व कामगारांची माहिती गोळा केली जाते,यामध्ये कामगारांना स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात.
भारताचे केंद्रीय रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी e-SHRAM Portal द्वारे e-SHRAM Card सुविधा तयार केले आहे. 38 कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करून जो आधार वरून सीड केला जाईल, यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी असलेले मजूर, रस्त्यावरील वेगवेगळे विक्रेते आणि घर कामगार यांना एकत्र जोडले जाईल.
e-SHRAM Card योजना ही ऑगस्ट 2021 मध्ये देशात सर्वत्र सुरू झालेली असून ही योजना नवीन आहे.
ई श्रमिक कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन भारत सरकारने सन 2021 ला ई-श्रमिक कार्ड ऑनलाईन रजिष्ट्रेशन सुरू केलेली योजना देशातील वेगवेगळ्या कामगारांसाठी महत्त्वाची असून ई-श्रमिक कार्ड योजना अंतर्गत वेगवेगळे कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
e-SHRAM या पोर्टल वरून नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता आणि त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल्याचा प्रकार तसेच कौटुंबिक माहिती इत्यादी माहिती भरून घेतली जाते.
कामगारांना एकमेकांशी जोडणे सोबतच त्यांना e-SHRAM Cardने अनेक सुविधा दिल्या जातील.ई-श्रमिक कार्ड योजना सर्व नोंदणीकृत कामगारांना बारा अंकी e-SHRAM Card कार्ड दिले जाईल.
देशभरात वैध असेल या ई-श्रमिक कार्ड योजना कार्डच्या माध्यमातून कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
ई श्रमिक कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन साठी लाभार्थी कोण असू शकतात.
- भाजी आणि फळ विक्रेते.
- वृत्तपत्र विक्रेते.
- लेदर काम करणारे.
- घरगुती काम करणारे.
- सुतार.
- इमारत आणि बांधकाम करणारे.
- लेबलिंग आणि पॅकिंग करणारे कामगार.
- कोळी.
- शेतमजूर.
- लहान आणि अल्पभूधारक शेतकरी.
- सीएससी केंद्र चालक.
- आशा कार्यकर्त्या.
- मनेरगा कामगार,
e-shram Registration पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
- पत्याचा पुरावा.
- मोबाईल नंबर .
- वयाचा दाखला .
- शैक्षणिक प्रमाणपत्रे.
- पास बुक.
- आधार क्रमांक.
- बचत खाते.
- उत्पन्न दाखला.
- आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर शी संलग्न असावा.
ई-श्रमिक कार्ड।e-shram card कसे काढावे?
9 सप्टेंबर 2021रोजी श्रमशक्ती भवन, नवी दिल्ली या ठिकाणी एक शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी ई-श्रम पोर्टल वर करण्यात आली आहे.
या कामगारांमध्ये भाजी आणि फळविक्रेते, वृत्तपत्र विक्रेते,लेदर कामकार, घरगुती कामगार, सुतार, इमारत बांधणारे बांधकाम करणारे, पॅकिंग करणारे, कोळी तसेच अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर इत्यादी वेगवेगळे कामगार यामध्ये ई-श्रम कार्ड बनू शकतात. वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात.
ई-श्रम।e-SHRAM Card योजना ही 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी आहे.e-SHRAM Card पोर्टल वर ज्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे. त्यांना भारत सरकार यांच्यामार्फत विम्याचे संरक्षण दिले जाते.
ई श्रमिक कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन नोंदणीकृत कामगारांचा अपघात झाल्यास तसेच त्यात त्यांना मृत्यू आला असेल त्यांना दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. नोंदणीकृत कामगाराला अपघातामध्ये अपंगत्व आले असेल तर त्याला संरक्षण विमा म्हणून दोन लाख रुपयांची मदत केली जाते. तसेच अंशिक अपंगत्व आल्यास एक लाख रुपये देण्याची तर सुद्धा ई-श्रमिक कार्ड ऑनलाईन रजिष्ट्रेशन द्वारे करण्यात येते.
ई श्रमिक कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन साठी रजिस्ट्रेशन कसे करावे.
- सर्वात अगोदर तुम्हाला e-SHRAM ऑफिशियल वेबसाइट वर जावे लागेल, त्यानंतर मुख्य पानावर तुम्हाला e-SHRAM Card रजिस्ट्रेशन नोंदणी या पर्यायाला क्लिक करून यावर दूसरे पृष्ठ दर्शवले जाईल.
- या पृष्ठावर तुम्हाला तुमचा आधार कार्ड ची लिंक असलेला मोबाईल नंबर तसेच Captcha code टाकून EPFO आणि ESIC सदस्य स्थिती ची माहिती भरावी लागेल.
- ही माहिती भरून झाल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर ओटीपी पाठवला जाईल. तुमचा मोबाईल क्रमांक वरील ओटीपी त्या ठिकाणी असलेल्या बॉक्समध्ये भरून त्याखाली असणाऱ्या रजिस्टर पर्यायावर क्लिक करून तुमची e-SHRAM पोर्टलवर नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली जाईल.
e-SHRAM पोर्टलवर e Sharm Card ऑनलाइन डाउनलोड कसे करायचे.
- सर्वात आगोदर e-SHRAM ऑनलाईन पोर्टल या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला उजव्या दिशेला रजिस्टर आणि e-SHRAM Card असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.
- क्लिक केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल या फॉर्ममध्ये तुमच्या आधार कार्डची लिंक असलेला मोबाईल नंबर भरावा लागेल
- त्यानंतर Captcha कोड भरायचा भरावा आता तुम्हाला EPFO आणि ESIC सदस्य स्थिती ची माहिती भरावी लागेल.
- नंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून ओटीपी बॉक्स मध्ये ओटीपी भरावा लागेल.
- नंतर summit या बटनावर क्लिक करून, नवीन पान दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून summit करावा लागेल.
- यानंतर आधार लिंक मोबाईल वर परत ओटीपी पाठवला जाऊन बॉक्समध्ये तो भरून व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमचा आधार कार्डचा डेटाबेसमधील तुमचा फोटो आणि आधार कार्ड वरील माहिती स्क्रीनवर तुम्हाला दिसेल, त्यानंतर सर्व तपशील भरून summit पर्यायावर क्लिक करावी लागेल .
- तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक पात्रता, व्यवसाय कौशल्य, तपशील याबरोबर आवश्यक वेगवेगळी विचारलेली डॉक्युमेंट्स अपलोड करून सर्व माहिती भरुन झाल्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन या पर्यायावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला त्याठिकाणी दिलेली माहिती किंवा घोषणा पत्र वाचावे लागेल आणि बॉक्समध्ये टिक मार्क करून कन्फर्म बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर e-SHRAM Card ओपन होईल डाव्या साईडला तुम्हाला कार्ड डाऊनलोड असा एक पर्याय दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करून e-SHRAM Card Download करून घ्यायचे आहे.
ई-श्रमिक कार्ड चे फायदे।e-SHRAM Card चे फायदे:
- प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
- राष्ट्रीय पेन्शन योजना
- मनेरगा रोजगार योजना
- सामाजिक सुरक्षा कल्याण योजना
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
- प्रधान मंत्री आवास योजना - ग्रामीण
- आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
- कामगार पुनर्वसन सहय्यक कार्यक्रम
- राष्ट्रीय सफाई कामगार योजना इत्यादि अनेक योजना आहेत.
- ई श्रमिक कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन खूप महत्वाचे आहे. वरील माहिती ही आपण संबंधित कार्यालयात अथवा संबंधीत https://eshram.gov.in/home वेबसाईट वर जाऊन खात्री करावी कारण काही नवीन बदल वारंवार शासनाकडून केले जाऊ शकतात.