मोबाईल हॅंग का होतोय।मोबाईल हॅंग झाल्यावर काय करावे.

मोबाईल हँग होण्याची कारणे काय असतील।What causes mobile hangs

मोबाईल हॅंग का होतोय।मोबाईल हॅंग झाल्यावर काय करावे
मोबाईल हॅंग होतो?

आपण सर्वजण Android Mobile वापरत असाल.कधी कधी आपण घेतलेला नवीन अँड्रॉइड मोबाईल देखील वारंवार हँग होतो.या समस्येचे निराकरण काय असेल किंवा आपला मोबाईल हँग होऊ नये यासाठी काय करता येईल? असा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतो.तर मोबाईल हँग होण्याची काय कारण आहेत याविषयी सविस्तर आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

मोबाईल हँग होण्याची काय कारणे।What Causes Mobile Hangs 

1.मोबाईल मध्ये जास्त ॲप्लिकेशन इन्स्टॉल करणे।Installing more applications in mobile

Android Mobile मध्ये RAM (मोबाईल मधील जागा)  ही महत्त्वाची असून जर आपण नवीन विकत घेतलेला मोबाईल कमी किमती मधील असेल तर,त्याला RAM कमी असतो 1GB, 2 GB  रॅम असलेले मोबाईल हे शक्यतो Hang होत असतात. कारण मोबाईल मध्ये आपण सतत वेगवेगळे ॲप्लिकेशन मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्याने मोबाईल ची रॅम जास्त प्रमाणात व्यापली जाते आणि त्यामुळे मोबाईल hang  होण्याची समस्या वाढत जाते किंवा रॅम कमी असेल तर मोबाईल स्लो होतो.

2.मोबाईलचे इंटरनल स्टोरेज जास्त भरल्याने।Excessive internal storage of mobile

प्रत्येक Android Mobile ला Internal storage असते,हे स्टोरेज किती आहे त्यानुसार आपण आपल्या मोबाईल मध्ये वेगवेगळ्या Apps व Files ठेवणे आवश्यक असते.कमी स्टोरेज असलेले मोबाईल हे हॅंग होताना दिसतात. 

3.मोबाईल मध्ये व्हायरस आल्याने।Due to virus in mobile

आपण आपल्या मोबाईल मध्ये इंटरनेट चालवत असाल तर आपण खात्री असलेल्या website चा वापर कारणे आवश्यक असते,कारण इंटरनेट मुले mobile मध्ये व्हायरस येण्याची शक्यता असते. 

4.मोबाईल मध्ये अनेक वेगवेगळे ॲप्स एकाच वेळी चालवल्याने।Running multiple different apps simultaneously in mobile

मोबाईल मध्ये अनेक वेगवेगळे ॲप्स एकाच वेळी चालवल्याने मोबाईल हॅंग होतो.तुम्ही जर मोबाईल मध्ये मल्टीटास्किंग करत असाल तर तुमचा मोबाईल हॅंग होऊ शकतो. 

5.जास्त वेळ मोबाईलचा वापर करणे।Excessive use of mobile

मोबाईल चा जास्त वेळ सलग रोजच वापर करत असाल तर कालांतराने मोबाईल स्लो किंवा हॅंग होण्याचे प्रमाण वधू शकतो. वेगवेगळ्या गेम खेळणे,ऑनलाईन videos पाहणे,सतत वायफाय किंवा Hotspot चा वापर करत असाल तर. 

6.मोबाईल मध्ये Unknown Application Install करणे।Installing Unknown Application in Mobile

आपण जर आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला माहिती नसलेले Unknown Application Install करत असाल तर मोबाईल हॅंग होतो. हे सर्व Android Mobile Hang होण्याचे कारणे आहेत. 

मोबाईल हँग झाल्यानंतर काय करावे।What to do when mobile hangs

1.मोबाईल मधील RAM आणि Storage हे जास्त भरून देऊ नये.मोबाईल मधील आपल्याला आवश्यक नसलेल्या files Delete करून टाकाव्यात. 

2.शक्यतो मोबाईल जास्त RAM असणारा असावा,म्हणजे त्यातील जागा वापरण्यासाठी शिल्लक राहील. 

3.मोबाईल मधील Photos ,Videos , Files या कामाच्या असतील तर मेमरी कार्ड मध्ये भराव्यात.

4.आपण वापरत असलेले Browser ,Social Apps यातील Auto Downloads Option बंद करावेत. 

5.आपण वापरत असलेले Android Apps मधील Clear Cache करावेत. 

6.मोबाईल मधील अनावश्यक Apps Force Stop करून ठेवावेत. 

7.मोबाईल चांगल्या कंपनी चा मोबाईल वापरत असाल तर शक्यतो व्हायरस येत नाहीत परणतु इंटरनेट वापरत असताना खबरदारी घ्यावी नको त्या साईट वापरू नये. 

8.शक्यतो मोबाईल मध्ये वेगवेगळे Apps इंस्टॉल करताना Google Play Store वरुन घ्यावे.

9.आपल्या मोबाईल मधील RAM मोकळा राहील यासाठी खबरदारी घ्यावी, RAM कमी असेल तर Apps कमी ठेवावे.  

10.नवीन Android Mobile असेल तर कंपनी वेळोवेळी Mobile Updates पाठवत असते Setting Option मध्ये जाऊन Check For Updates वर चे वर पाहून अपडेट आलेले असेल तर लगेच अपडेट करून घ्यावे.अपडेट करताना आपल्या मोबाईल ची बॅटरी फुल्ल चार्ज असावी. 

अशा प्रकारे आपण मोबाईल हॅंग होण्याचे कारणे आणि उपाय याविषयी माहिती घेतली. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने